Find the Best म्हणून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutम्हणून meaning in hindi, म्हणून meaning in english, म्हणून in english, म्हणून meaning in marathi, माणूस म्हणून जगण्यासाठी song download,
Yogesh Hiwrale
"होय तर तुला, म्हणावंच लागेल नाही म्हणून, कसं चालेल रोजची 'ती' सकाळ आजही आठवते पुढे तू ,पाठी मागे मी,असेच दिवस जात होते त्यावेळेस का नाहीस, मला थांबवलं गालात हसून, चार वर्षे सतत फसवलं इतक्या वेळा,प्रेमवेडाच कुणी फसेल म्हणून.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल आहे का काही उपाय सुचव तूच जरा एखाद्या अनोळखी पेक्षा मीच नाही का बरा तुझ्या ,पाषाण हृदयाला आता पाझर फुटू दे, तुझ्या प्रेमाची गाडी, माझ्या दिशेने सुटू दे या रस्त्यानं तुला स्वर्गसुख लाभेल त्यासाठी...होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल तुलाही कळते आहे प्रेम माझे तुझ्याच प्रेमाचे आहे काळजावर ओझे नाही म्हणून, अशी छळू नकोस विरहाच्या अग्नीत, अशी पोळू नकोस एवढ प्रेम तुला कोण गं करेल शेवटी.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल... #nahi#kasa#chalel#
Pallavi Phadnis
तू येतोस कधी दीड,पाच,सात दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती सगळ्यांचा आपलासा होवून जातोस झोपडे असो किंवा महालाचे दार तु येतोस मुषकावर बसून स्वार तुला बसायला सजते मखर पण तुला माहितेयका ह्यासाठी किती मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे घर तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण, आणि साजरा करताततुझा सण, काही जण तर भक्ती कमी आणि लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव सोन्याप्रमाणे तोलतात तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने काहीजण असतात अधाशी नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात तुला खरेच कारे हे सगळे लागते तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला असतोस ,म्हणूनच तर तू अतिभक्तीनेच बुडतोस, कारण तू तर देव आहेस तू का बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील पुन्हा सगळे सोहळे होतील पण , एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला अपघाती गेलेला असे भक्त त्या सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी, मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात पल्लवी फडणीस,भोर✍
अश्लेष माडे (प्रीत कवी )
बरेचदा आपण एखाद्याची स्थिती बघून त्याच्याविषयी नको ते विचार करायला लागतो. तो काय करतो, कसं करतो, कशाला करतो अश्या फालतू आणि निरर्थक बाबीकडे विशेष लक्ष देत फिरतो. ह्या धर्तीवर सगळे आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ज्याचं त्यालाच माहित असतं. तो कसं दिवस काढतो ते. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. म्हणून कुणावरही हसण्याआधी, बोट उचलण्याआधी दहा वेळा विचार करा. कारण, कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही आघात घडतात की, अवघ जीवन बदलून जाते. आणि प्रत्येकाच्या जीवनात असे काही गूढ असतात की, तो कुणाला सांगत नाही. बरेच लोकं समोर हसतात पण डोळ्यातून निघणारे अश्रू लपवतात. माणूस परिस्थिती पुढे हतबल होतो. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिजे तितकी सत्य नसते. म्हणून कोणालाही काहीपण बोलण्याआधी खरंच विचार करून बोला. तुमच्या एका शब्दामुळे समोरच्याला खूप त्रास होऊ शकतो. (प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
अगं सांगना, किती रडत बसायचं, किती आर्जव करायचं, किती हात जोडायचं, पाय पडायचं, तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी अजून किती लहान व्हायचं.. इतकी कशी पाषाण हृदयी तू? तुला खरंच का माझं प्रेम नाही कळायचं, बरोबर आहे ना, सहज मिळतंय ना तुला प्रेम म्हणून त्याचे महत्व तुला नाही कळायचं, मी किती बदलायचं, किती त्याग करायचं अगं तुझं प्रेम मिळवण्यासाठी विसरलो मी मनाप्रमाणे स्वतःसाठी जगायचं, पण थकलो गं मी पार आता, अजून कसं प्रेम मी सिद्ध करायचं. यातना तर भरपुर दिलंस मला अजून होऊ दे सहन करणार मी, प्रेम करून चूक मीच केलं ना, पण म्हणून ठरवलं आता तुला प्रेमाची भीक नाही मागायचं तुला प्रेमाची भीक नाही मागायचं... (प्रीत ) प्रेमाची भीक नाही मागायचं
प्रेमाची भीक नाही मागायचं
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
अगदी सहज बोलणं बंद केलंस गं तू, कारण, मला माहिती आहे, तुझ्या हृदयात माझ्यासाठी कुठेच स्थान नव्हतं, ते माझ्याशी तुझं बोलणं ही फक्त असंच होतं, म्हणून माझ्यासाठी वेळ पण मिळत नव्हतं, म्हणून तुला जमलं ही सहज.. कारण, तुला नातं पुढे न्यायचं नव्हतं, पण, बोलणं बंद केलं म्हणून नातं तुटत नसतं, हृदयात कोरलेलं चित्र सहज मिटत नसतं, एकदा प्रेम झालं की, हे मन देखील मानत नसतं, आणि त्याच वेडीशिवाय जी भाव पण देत नाही, तिच्याशिवाय त्याला कुणीच दिसत नसतं, होईल कधीतरी माझी ह्याच आशेवर तो वेडा जगत असतो.... (प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
आपण जन्माला आल्यापासून आपल्याला ह्या जगात भरपूर माणसे भेटतात, पण तरी फक्त काही ठराविक व्यक्तीच आपल्या आयुष्यात आपले मित्र, परिवार, नातलग, म्हणून भेटतात. आणि त्यातही आपल्याला ठराविक व्यक्तीवरच प्रेम होतं. विचार करा,.. ह्या कोट्यवधी लोकांमधून आपल्याला तीच व्यक्ती अपघात म्हणून कशी काय भेटते आणि त्याच व्यक्तिवर कसं प्रेम होतो आपल्याला. कारण, त्या व्यक्तीसोबत आपलं जन्मोजन्मीचं नातं तो देव च तयार करून पाठवतो. ज्या नात्याला आपण नाकारू शकत नाही. मग आपण कोण हे नातं तोडणारे? म्हणून भेटलेल्या नात्याचा स्वीकार करा. प्रेम करायला शिका. नातं जपा. कोणीच सहज येत नाही आपल्या आयुष्यात.. उगाचच आपण जात -पात, उच्च -निच्च, गरीब -श्रीमंत, ह्या कारणाने एकमेकांपासून दूर जातो. (प्रीत )
Tushar Nevarekar
Tunnel चालायला आवडते म्हणून चालणार नाही मी, यशाच्या उंच शिखरावर जाऊन त्याला कवेत घ्यायचं आहे मला.म्हणून अविरत चालणार मी. माझं चालणं
माझं चालणं
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असेल. आणि अचानक त्यांनी तुमच्याशी बोलणं बंद केलं, तुम्हाला मॅसेज करणं बंद केलं असेल. तर, नक्कीच तुमचं काहीतरी चुकलं असेल. एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहात, किंवा त्या व्यक्तीशी फक्त कामापुरते बोलता, तो तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलतो मात्र तुम्ही त्याला वेळ नाही म्हणून टाळत आहात असं काहीतरी वाटत असते. खरं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला महत्व देतो. तुमच्यावर प्रेम करतो. पण असं झाल्यावर त्या व्यक्तीला खूप दुःख होतो. त्याला खजील झाल्यासारखं वाटतं. आणि पुढे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून न बोलणं च योग्य समजते. कारण तुमच्याविषयी असलेलं आदर कमी कमी होत जाते. आणि आहे ते नातं न बोलण्यामुळे तुटण्याची वेळ येते. तेव्हा आहे ते नातं जपायचं प्रयत्न करा.. (प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
Tunnel 1)स्वतःला एवढं ही स्वस्त होऊ देऊ नका की, लोकं तुम्हाला सहज विकत घेऊ शकतील. 2)इतकं ही साधे राहू नका की, लोकं तुमचा गैरफायदा घेतील. 3)इतकी जास्त कुणाला वेळ देऊ नका की, लोकं तुम्हाला रिकामटेकडा समजायला लागतील. 4)कुणाला इतकं जास्त प्रेम करू नका की, तुमचा पुन्हा दुसरं कुणीच नाही म्हणून तुमची कदर करणारं नाही. 5)आणि इतकं स्वार्थी आणि मतलबी राहू नका की, लोकं तुमच्या मदतीला येणार नाही 6)गरजेपुरतं पैसा आणि चारचौघात बसण्याइतकी इज्जत कमवा. 7)सगळ्या गोष्टी सीमित ठेवा. कारण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो. 8)प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा. भरपूर आनंद घ्या. कारण, कुणालाच आपलं शेवट माहित नसतो.... (प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कळेना काही मला काय बोलू तिला मी, ती मला आवडते पण तिला आवडतो का मी? बोलतो तर रोजच आम्ही तेव्हा भावना मांडतो मी, निशब्द होते ती बोलताना तिला ही जाणतो मी.. तुटू नये मैत्री आमची म्हणून बराच अबोल असतो मी, ती माझ्या दूर नको जायला म्हणून व्यक्त व्हायला घाबरतो मी.. आहे तशी तरी जवळ माझ्या म्हणून मैत्री जपतो मी, प्रेम तर खूप करतोय तिच्यावर पण असलेलं तरी नातं तुटू नये म्हणून प्रेम व्यक्त करायला घाबरतो मी..