Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वातंत्र्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वातंत्र्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutस्वातंत्र्य दिन शायरी मराठी, कितवा स्वातंत्र्य दिन आहे 2019, कितवा स्वातंत्र्य दिन आहे, मराठी शायरी स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश,

  • 7 Followers
  • 11 Stories

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

Shankar kamble

समर शंख फुंकले ,निनादे
झडली नौबत, शिंग, तुतारी
देशप्रेम उसळो धमन्यातून
जयभारत जय द्या ललकारी।१।

वीर सपूतांच्या रक्ताने
पावन स्वातंत्र्याची गाथा
स्मरतो, जपतो पुन्हा नव्याने
त्याग, शौर्या झुकतो माथा।२।

यज्ञकुंड पेटला क्रांतीचा
वाहिली समीधा सर्वस्वाची
बलिदानाच्या वेदीवरती 
शेज सजली नरवीरांची।३।

खळाखळा तोडल्या शृंखला
बंदीवासे मुक्त माता
सप्तकोटी कंठातून घुमती
विजयाचे स्वर अन जयगीता।४।

शपथ तुम्हाला मायभूमीची
आण असें त्या राष्ट्रवीरांची
नको फितुरी अन गद्दारी
नको गुलामी आता कुणाची।५।

जोवर असती नभांगणी
हा चंद्र, सूर्य हे तारे
फडकत राही प्रिय तिरंगा
हिमालयाच्या शिखरे।६।

©Shankar kamble #भारत 
#स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
#स्वातंत्र्य 
#देशप्रेम 
#देश 
#भारतीय 
#बलिदान 
#क्रांती

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile