Nojoto: Largest Storytelling Platform

Best swapn Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best swapn Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutswapn ka matlab in hindi, swapn phal hindi me, swapna phal in hindi, swapnanche arth in marathi, swapno in bengali,

  • 22 Followers
  • 125 Stories

kabeer chitransh

Dharmendra Gopatwar

Dharmendra Gopatwar

📖 स्वप्न ..✍️

स्वप्न..! उघड्या डोळ्याने बघतो रोज 
  मी  एकांत आणि मैफिलीत ..
 
सुर्यफुलाच्या फुललेल्या 
स्मित-हास्यात तर कधी 
 चांदणी चंद्र रात्री निद्रेत ..
  तरुण तेज मोहक प्रकाशात 
 तर कधी ..,
  काळया कुट्ट अंधारात 
वरून तेज वर्षेत ; स्वप्न माझे दिवा शोधते..
    स्वप्न बंद डोळ्यात ; घिरट्या घेत वाट शोधते ..

     स्वप्न मध रसाळ डोळ्यात खेळे 
     स्वप्न सावली परी पाठलाग करी 
    निराशेचा चा डंख ; भावनांना सुन्न करी ..
स्वप्न असे जीच्या विरहाने
 कंठ दाटून येई ..

 स्वप्न जिच्या प्रतीक्षेत ;  मन व्याकूळ होई..
        स्वप्न हृदयाला क्षणसुखाचा ओलावा देई ,
     पापणीला क्षणात कोरडे करी . .
 अंतर्मनात स्वप्नाच्या विरह वेदना
अशी ही थैमान घाली -

वादळ निर्माण करी 
समुद्री लाट्यां प्रती वारंवार आघात करी.. 
 हि स्वप्न - माझ्या वर्चस्व आणि अस्तित्वाशी 
लढ़त असताना ;  माझ्याशी आव्हाण करतात ..
   
  कधी एकांतात त्याच्याशी करार करीत ..
तर कधी मैफिलीत 
       याच्याशी सुसवांद करित ; त्याच्यासी मैत्री करितो..मी !
    
स्वप्न जरी छळीले मला
उघड्या डोळ्यांनी रोज बघतो मी.

                             📖  Dharmendra Gopatwar🔖

©Dharmendra Gopatwar #Swapna#marathi#kavita#Sunrise #Swapn #motivation #स्वप्न

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile