Nojoto: Largest Storytelling Platform

Best कष्टकरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कष्टकरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कष्टकरी समानार्थी शब्द, कष्टकरी विरुद्धार्थी शब्द, कष्टकरी कोणाची लेकरे आहेत, कष्टकरी शेतकरी, कष्टकरी माणसे,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

*तीन दगडांची चुल*
           *माय थापते भाकरी*
*निरपते डोळ्यातलं*
          *पाणी, सोसते बिचारी*

*माळ तुडविते सारा*
            *पाय रक्तानं माखलं*
*चोची भरविण्या घासं*
          *मोती उन्हांत वेचलं*

*आता कंबर बांधली*
              *घाव घाली नशिबाला*
*आज इथं ,उद्या तिथं*
             *कुठं विसावा पायाला?*

*किती जळते निखारे*
            *पदरात बांधलेले*
*धग कुणां ना लागते*
            *सारे लांडगे टपले*

*टोलेजंग इमारती*
         *आभाळाला त्या भिडल्या*
*धोंडा घेऊन उशाशी*
         *बेवारशी का निजल्या*?

*मूकपणे ती सोसते*
           *अशी झुंजते वाघीण*
*किती येवू दे वादळं*
            *जायी सामोरा आपणं*

©Shankar Kamble #SuperBloodMoon #आई #माय #कष्टकरी #कामगार #कष्ट #गरिबी #आई_भाकरी #शेतकरी #काम

Vinayak Mahajan

🙏कष्टकरी🙏

संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
निसर्गप्रती मानवाने उचललेले गैर पाऊलांची शिक्षा, 
तू निसर्ग प्रेमी असूनही भोगतच आहे...
शासन दरबारी तुझ्या नावाने राजकीय पोळी भाजतच आहे...
महामारी मधे माणुसकीचं दर्शन दाखवणारा जगाचा अन्नदाता,जग मात्र तुझ ऋणी आहे...
संकटाच्या ओझ्याखाली तुझ जीवन बघून,मात्र काळ्या आईच हिरवरान तुझ्या सन्मानार्थ डोलत आहे...
प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जाऊन फक्त चालत राहण्याची सहनशीलता तुझ्यातच आहे...
संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
या सर्वांना तोंड देत तू मात्र खंबीरपणे उभा आहेस...
      
विनायक महाजन📜🖋️ #अन्नदाता #कष्टकरी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile