Nojoto: Largest Storytelling Platform

Best मातीचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मातीचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मातीचे घर, मातीचे प्रकार व माहिती, मातीचे प्रकार, मुलतानी मातीचे फायदे, मातीचे उपयोग,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

*तुला आकाश ठेंगणं*
*तुझी गवसणी मोठी*
*माती मधल्या मुळाशी*
*नको बेइमानी खोटी...*

*तुझ्या मुखात असू दे*
*सोन्या मोतीयांचा चारा*
*नगं पुढ्यातलं ओढू*
*जाग आता उपकारा...*

*बोल बोलावा मधुर*
*जशी उसाची साखर*
*परनिंदा स्वैराचार*
*माती पातकं खापर...*

*भुकेल्याची भूक जाण*
*तहानेल्या द्यावं पाणी*
*माया ममता असावी*
*ज्यांना जगी नसं कोणी...*

*मूठ,पसा दान द्यावं*
*झोळी पुण्यानं भरावी*
*देह मातीआड गेला*
*तरी किरत उरावी...*

*जल्म माणसाचा मोठा*
*आरं..परत मिळना*
*पुण्य कर्माची शिदोरी*
*पुरं सरनां उरनां...*

©Shankar Kamble #माती #मातीचे #उपकार #पुण्य #पाप #जीवन #जीवनअनुभव #माणूस 

#standout

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile