Nojoto: Largest Storytelling Platform

Best वळीवाचापाऊस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वळीवाचापाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

_*रितं डोळं नी आभाळ*_ 
 *_पाणी पापणी सुकलं*_ 
 *_ओढ कोरड मातीला*_ 
 *_हिरवं सपान लोपलं*_ 

 *_ताफा ढगांचा रुसला*_ 
 *_चौमुलखी पांगयीला*_ 
 *_हात ठेऊनी निढळी*_ 
 *_किती आर्जवू तयाला*_ 

 *_गेला मिरग कोरडा*_ 
 *_काळजाला ओरखडा*_ 
 *_कूस सूनी वांझ माती*_ 
 *_किती उदरी गुताडा*_ 

 *_कोंब कोवळ जळालं*_ 
 _*भेगा दाटल्या मनांत*_ 
 *_सुखं चांदणं तोरणं*_ 
 *_घर राहिलं उन्हांत*_ 

 *_मेघ सावळ्या दयाळा*_ 
 *_आतां बरसं धुधारी*_ 
 *_किती जीव काकुलती*_ 
 *_वात फुलव शिवारी*_ 

 *__सुखं पेरलं मातीत*__ 
 *_ओटी भरीन मोत्यानी*_ 
 *_सारा भार तुझ्यावर*_ 
 *_माळ सजव सोन्यानी*_

©Shankar Kamble #पाऊस #पाऊसधारा #दुष्काळ #वारा #वळीवाचापाऊस #मृग #पाऊस 

#dewdrops

Shankar Kamble

रानमातीला गहिवर
सोसवंना होरपळ
जीव झाला तोळामोळा
किती जोडावी ठिगळं

आस डोळां पाणावाती
करपली तृण पाती
कसा मोहरे अंकुर?
जीव आला काकुलती

कर ठेवूनी निढळी
तुटं आतडीचा पीळ
मागमूस हरपला
कुठं वळीवाची सर?

तनां- मनांची काहीली
कसा वैशाख तापला
ताप निवाराया कोण?
मेघराजाजी कोपला

हिरमुसली पानं- फुलं
रंग नव्हाळी सुकला
सरीसरीचं गोंदण
देह धरणी आसावला

काळ्यां नभांच्या राशींनी
आसमंत हा उजळू दे
मोत्यां- मोत्यांची रांगोळी
रान- शिवारी सजू दे

©Shankar Kamble #पाऊसधारा #सर #वळीवाचापाऊस #वळीव #विरह #पाऊसाततुझीआठवण 

#Beauty

Shankar kamble

mute video

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

Shankar kamble

mute video

Shankar kamble

आल्या वळीवाच्या सरी
 माती न्हाती धुती झाली
 बीजं रुजलं काळजात
 सांज शहारून आली

 भेगाळल्या जीवा
 असं शिंपण सुखाचं
 माळ शिवारात फुलं
 आता सपान मोत्याचं

 वणव्यात वैशाखाच्या
 सुखं करपून गेलं
 करणी त्या परमेशाची
 डोळं नभाचं पाणावलं

 ठाई ठाई पांढरीत
 मेघराशी बरसल्या
 सुपाएवढं काळीज
 बळीराजा हरखला

 फुट मनाला अंकुर
 हात जोडी धरतीला
 सुखं पेरलं मातीत
 सारा भार देवा तुला

 ओटी भरली ओंजळ
 पिकं येवो मायंदळ
 सोन्या मोत्याची ही रास
 आता भरू दे हे खळ

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#शेतकरी 
#पेरणी
#शेती 
#वळीवाचापाऊस 
#धारा 
#पाणी_पाऊस_देगा_देवा

Sachin Zanje

आठवणीतला वळीवाचा पाऊस.

वळवाची आठवण  अशी 
नकळत आलेल्या पावण्यागत जशी.

तप्त करते ती सर , भुमीला येण्या अगोदर
चिंब जाते भिजवून ,भरते कोराडा तो सरोवर.

तुझ्या अशा पाण्याने होतो, मातीचा  ही चिखल
चहुकडे बहरून येते हिरवळ, असे तुझे ते मोल.

तुझ्या आगमनाने जनास कळते
दिवस पावसाळ्याचे सुरू झाले  दाखवते..

कवी :- सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #वळीवाचापाऊस.#पाऊस.#पावसाचीचाहुल.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile