Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणूस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणूस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणूस एक माती, माणूस in urdu, मानसा तू माणूस बन, आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला, माणूस समानार्थी शब्द मराठी,

  • 21 Followers
  • 31 Stories
    PopularLatestVideo

Bitterone_me

White माणसाची वृत्ती
नेहमीच वाईट असते
असे नाही.
कधी कधी
स्त्रीचे कृत्यही
घृणास्पद असते..!!

©Bitterone_me #माणूस #घृणा #जिंदगी #स्त्री #कृत्य #घृणा #viral #Popular #bitteroneme 
My Loquacious World Starry Whispers kajal Nikhil saini Pooja Sharma

Bitterone_me

तुमचा खिसा रिकामा असला
तरी तुम्हाला नकार देताना
मी कधी पाहिले नाही;
मी माझ्या बाबां पेक्षा
श्रीमंत माणूस कधीच 
पाहिला नाही...

©Bitterone_me For You Papa....❤#बाबा #खिसा #रिकामा #श्रीमंत #माणूस #father #Love #viral #Popular #bitteroneme

Shankar Kamble

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन

Shankar Kamble

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

©Shankar Kamble #Grayscale #लढा #युद्ध #अस्तित्व #लढाई #माणूस #संघर्ष #तलवार #टक्कर

Devesh Thakur

mute video

Dileep Bhope

mute video

Dileep Bhope

mute video

शब्दवेडा किशोर

#माणूस चुकतो कधीकधी..
आयुष्याच्या समुद्रातून वाट शोधताना अन् त्यातून उचंबळणारी
प्रत्येक लाट मोजताना
नाती जोडताना अन् प्रसंगी ती तोडताना सुध्दा
दोष नसतो द्यायचा कुणाला
कारण
माणुस चुकतो कधीकधी....
अळवावर पडलेला थेंब अलगत टिपताना
जाणुन बुजून गमतीने गट्टी फू म्हणताना आपल्याच हृदयाची स्पंदने
आपल्याच नकळत वाढतात तेव्हा दोष नसतो त्यात मनाचा
ना त्या स्पंदनांचा
कारण
माणूस चुकतो कधीकधी....
दोष फक्त भावनांचा ज्या येतात समुद्राच्या लाटांसारख्या
अन् मागे उरवुन ठेवतात
फक्त आठवणी वाळुवरच्या ठश्यांसारख्या
पाण्यात प्रेमानी हात फिरावताना लहरी उठतात अन्
हरवून बसतो आपण त्या क्षणिक लहरी शोधताना
मन किती हळवं होतं कधी कधी व
तयार होतं एखाद्यासाठी आयुष्यभर थांबायला
तर कधीकधी पापणी लवेपर्यंतही
दम निघत नाही ह्याच मनाला
हेच मन कधी रमतं वाळुवरच्या रेघात
तर कधी हरवून जातं त्याच रेघाःच्या पुसटशा विश्वात
तेव्हा दोष नसतो द्यायचा कुणाला
कारण
माणूस चुकतो कधीकधी
नशीबाच्या रेघा
घडवताना....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माणूस_म्हणून_जगताना 
#माणूस_चुकतो_कधीकधी

Dileep Bhope

माणूस आहेस ना?

रोज काय हिशोब पाप पुण्याचा?
कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे

घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा?
माणूस आहेस ना? एकवार जोखून घे

©Dileep Bhope #माणूस

Shankar Kamble

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile