Nojoto: Largest Storytelling Platform

*रिते राहिले हात अजूनी* *ओंजळ काही भरली न

*रिते राहिले हात अजूनी*
         *ओंजळ काही भरली नाही*
*बंद ओठांआड रुतली*
         *कळ,वेदना बरेच काही*

*सांगूनी का कुणांस कळते?*
           *जरी पांघरे शुभ्र कवडसे*
*सावलीत पोळले उन्हाला*
        *किती सोसले नको खुलासे*

*ज्वार सरता लाट एकटी*
          *दूर किनारी हरवून गेली*
*जखमां देई फुंकर आता*
     *भास कोरडा अन् कडं ओली*

*सांज मिटल्या डोळ्याने मग*
          *स्वप्न पाहते तरुतळी*
*भान येता हूरहूर दाटे*
         *तरंग उमटे शांत जळी*

*रुदन करते मूक मनाने*
         *पीळ पडता काळजाला*
*थांबले मी तिथेच अजूनी*
           *काळ मात्र पुढे पातला*

©Shankar Kamble
  #पंख #तू #ती #भास #एकटी #सोबत #रस्ता