Find the Best भास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभासता meaning in hindi, भास्वर के पर्यायवाची, भास्कराचार्य का जीवन परिचय, भासता का मतलब, भासित का अर्थ,
Shankar Kamble
शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा.. थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी? गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी.. पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे? सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा.. हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा.. निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे? ©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम
Shankar Kamble
दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा भरभरणारा वारा देई सांगावा कसला? कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला ©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत
#parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत
read moreShankar Kamble
*रिते राहिले हात अजूनी* *ओंजळ काही भरली नाही* *बंद ओठांआड रुतली* *कळ,वेदना बरेच काही* *सांगूनी का कुणांस कळते?* *जरी पांघरे शुभ्र कवडसे* *सावलीत पोळले उन्हाला* *किती सोसले नको खुलासे* *ज्वार सरता लाट एकटी* *दूर किनारी हरवून गेली* *जखमां देई फुंकर आता* *भास कोरडा अन् कडं ओली* *सांज मिटल्या डोळ्याने मग* *स्वप्न पाहते तरुतळी* *भान येता हूरहूर दाटे* *तरंग उमटे शांत जळी* *रुदन करते मूक मनाने* *पीळ पडता काळजाला* *थांबले मी तिथेच अजूनी* *काळ मात्र पुढे पातला* ©Shankar Kamble #पंख #तू #ती #भास #एकटी #सोबत #रस्ता
Devanand Jadhav
°भास आभास...!° भासातही ते आभास होती की आभासच ते भास होते भासतानाही असे भासले ते भासणे तुझे खास होते मानतो आभासही भास हा असो भास की अभास माझा भासात नि आभासातही तो मनी स्पर्शे खास भास तुझा भास आभास स्वप्न की सत्य भासले मज ते भासो तुज भासूनही ते आभास सारे स्वप्नी नको सत्यात दे मज ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav #भास...आभास...!
#भास...आभास...!
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited