Nojoto: Largest Storytelling Platform

*ll अक्षरक्रांती अभंग महोत्सव ll* ll २०२३ ll l

*ll अक्षरक्रांती अभंग महोत्सव ll*
   ll २०२३ ll
 ll सातवा अभंग ll
ll गुरु दि. ७ सप्टेंबर २०२३ ll

 ll आजचा अभंग ll °मज लागो देवा°

मज लागो देवा l सेवेचिये गोडी ॥*
गाईन आवडी l तुझे नाम ॥ १ ॥

गोड तुझे नाम l असो माझे ओठी ll
आशीर्वाद पाठी l असू द्यावा ॥ २ ॥

भवातूनी मज l तूच आता सोड ll
लागू दे रे ओढ l हरी नाम ॥ ३ ॥

कैवल्याचा राणा l जरी ना भेटला ll
तरीही साठला l भक्तिभाव ॥ ४ ॥

अंतरित ध्यान l रोज करताहे ll
तुज पाहताहे l दाही दिशा ॥ ५ ॥

भवातून मुक्ती l तूच दे रे आता ll
तूचि असे दाता l पामरांचा ॥ ६ ॥

©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav
  अभंग...मज लागो देवा l सेवेचिये गोडी ll 
गाईन आवडी l तुझे नाम ॥ #janmashtami #कविता  #poem  #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral

अभंग...मज लागो देवा l सेवेचिये गोडी ll गाईन आवडी l तुझे नाम ॥ #janmashtami #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #मराठीकविता

67 Views