Nojoto: Largest Storytelling Platform

Best दुष्काळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दुष्काळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दुष्काळ opposite word in marathi, दुष्काळ meaning in english, दुष्काळ in english, दुष्काळात तेरावा महिना in english, दुष्काळाचा विरुद्धार्थी शब्द सांगा,

  • 8 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Abhijeet Jagtap

mute video

कविराज धनंजय

mute video

Vinod Umratkar

नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे दुष्काळ... #दुष्काळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes अप्रतिम रचना वाचा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्या माझ्या प्रेमात आज
शब्दाचा दुष्काळ पडला।
कारण शब्दांपेक्षा आपण
आज नजरेचा खेळ मांडला। नमस्कार मित्रानों
आताचा विषय आहे
दुष्काळ...
#दुष्काळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes अप्रतिम रचना वाचा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Shankar Kamble

_*रितं डोळं नी आभाळ*_ 
 *_पाणी पापणी सुकलं*_ 
 *_ओढ कोरड मातीला*_ 
 *_हिरवं सपान लोपलं*_ 

 *_ताफा ढगांचा रुसला*_ 
 *_चौमुलखी पांगयीला*_ 
 *_हात ठेऊनी निढळी*_ 
 *_किती आर्जवू तयाला*_ 

 *_गेला मिरग कोरडा*_ 
 *_काळजाला ओरखडा*_ 
 *_कूस सूनी वांझ माती*_ 
 *_किती उदरी गुताडा*_ 

 *_कोंब कोवळ जळालं*_ 
 _*भेगा दाटल्या मनांत*_ 
 *_सुखं चांदणं तोरणं*_ 
 *_घर राहिलं उन्हांत*_ 

 *_मेघ सावळ्या दयाळा*_ 
 *_आतां बरसं धुधारी*_ 
 *_किती जीव काकुलती*_ 
 *_वात फुलव शिवारी*_ 

 *__सुखं पेरलं मातीत*__ 
 *_ओटी भरीन मोत्यानी*_ 
 *_सारा भार तुझ्यावर*_ 
 *_माळ सजव सोन्यानी*_

©Shankar Kamble #पाऊस #पाऊसधारा #दुष्काळ #वारा #वळीवाचापाऊस #मृग #पाऊस 

#dewdrops

संतोष विजय उईके

■ पावसाळा

दावून पाठ पळतो बापास पावसाळा
पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..!

झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे
कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..!

दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा
अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..!

शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो
नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..!

देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या..
मग मारतो दडी का हमखास पावसाळा..!

दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला
करतो असा तसाही उपहास पावसाळा..!

आहेस तूच त्याचा आधार पावसा रे
 देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..!

©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा

Sarita Sawant

रिमझिम रिमझिम बरसत तो हाहाकार माजवतो
चिंबचिंब भिजवुनी जातो
कुठे ओल्याचिंब सुखाच्या सरी बरसवतो
तर कुठे दुःखाच्या लहरी कोसळवतो
कधीतरी वाटतं बरसणाऱ्यालाही कळावं
कधी,कुठे अन किती बरसावं
काळ्या मातीत मोत्याचा दाण पिकांव
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं गूढ संपावं
लेकरांचा त्यांच्या आधार कधी न सुटावा
लेकी सुनांना त्यांच्या कधी ना यावं वैधव्य
बरसणाऱ्याने थोडी दया त्यांच्यावरही करावी
राबतो तो रात्रंदिवस,
त्याच्या हक्काचा न्याय त्याला मिळावा
घराटं त्याचंही आनंदानं बहराव
कोरडं रान त्याच्या स्वप्नीही न दिसावं
बरसणाऱ्याला थोडं तरी समजावं
शेतात घाम गाळून भरतो सर्वांचं पोट
रणरणत्या उन्हात त्याने ना फिरावं
आभाळाकडे आस लावून वाट पाहायची
वेळ त्यावर ना यावी
सुख समाधानी आयुष्य त्याचही व्हावं
आनंदाचं झाड त्याच्या अंगणी वाढावं
बरसणाऱ्याला कळावं कधी,कुठे अन किती बरसावं
निसर्गा पुढे आपण आहोत हतबल सारे
मदतीचे दोन हात आपणही सरकवावे
उपकाराचे दान फेडता आले तर फेडावे
बरसणाऱ्याला कळावे कधी, कुठे अन किती बरसावें.
    
                 सरिता सावंत #पाऊस #शेतकरी#दुष्काळ #मराठीकविता

ॲड. शिवाजी खाडे

दिस सुगीचे येऊदे.. #दुष्काळ जीवघेणा...

read more
mute video

Shashikant Kendre

आर्चीला किती मार्क पडले आहे दिवसभर दाखवतील पण मराठवाड्यांत पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या
 आया-बहिणीची अवस्था एकदाही दाखवणार नाही

#मिडिया रे #मीडिया #मराठवाडा #दुष्काळ #पाणी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile