Nojoto: Largest Storytelling Platform
harsh7737998481067
  • 109Stories
  • 623Followers
  • 1.3KLove
    3.1KViews

Harsh

poem writter as well as shayar marathi/hindi insta id _harsh_poetry_ |mechanical engineer |

https://www.youtube.com/channel/UCJfOI7OKIqLdQYBtI6kRxYA

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

'फक्त लिहायचा एक छोटासा निबंध'
   (पोर्शे कार अपघात )

पैशाच्या धुंदीपायी डोक्यात यांच्या नशा ,
   पैशाच्या धुंदीपाई उद्धट यांची भाषा .
कोणालाही उडवायचं होऊनिया बेधुंद ,
                 कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

मरणारे मरतात,रडणारे रडतात ,
         जामीनावर हे रात्रीत बाहेर पडतात .
पिझ्झा,बर्गर खाऊन साजरा करतात आनंद ,
            कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

पैशाच्या मोहापायी विकला जातो न्याय, 
         निर्दोष असून आमच्यावर होतो मग अन्याय .
2 बळी घेऊन सुध्या होत नाही दंड, 
                    कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

घरच्यांचा धाक नाही,पैसे द्यायला माप नाही ,
          पोर्शे चालवणार,दारू पिणार मीच आहे भाई.
पैसे देऊन सगळ्यांचे तोंड करणार बंद,
             कारण,फक्त लिहायचा एक छोटासा निबंध...

दारू पिणारे पीत राहणार ,गुन्हे ही होत राहणार .
     निरपराधी माणसांची ,पुन्हा शिकार होणार .
कधी उघडतील आमच्या न्यायव्यवस्थेचे डोळे ?
         कधी थांबतील असे निबंध लिहायचे चाळे !....

                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh #porsche 
#punecrime
#puneaccident 
#pune
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

एकांत 

जशा दुरावती वाटा मना वाटे एक खंत,
    विसरुनी पुन्हा सारे मन होई शांत.
आनंदाला नाही सीमा,दुःख येती अनंत,
             स्वतःलाच जोडू स्वताशी हवा मग एकांत.

मनामनांत फिरत असते विचारांचे चक्र, 
            कधी जाते भरकटून तर कधी एकाग्र. 
विचारांच्या दुनियेचा नाही हो अंत,
                 मन शांत करण्यासाठी हवा मग एकांत. 

जीवनाच्या या समुद्रात पाण्याएवढ्या इच्छा, 
     रोज या मनाच्या नवनवीन अपेक्षा. 
कधी खवले हा जीवनसमुद्र,तर कधी संथ. 
         किनाऱ्यावर येण्यासाठी हवा मग एकांत. 

सतत चिंता-सतत काळजी रोज नवं वेगळं, 
           एकाच चक्रात फिरत आहे बघा जग सगळं. 
सोडा चिंता धनाची,जीवन होईल उत्क्रांत. 
       हर्षित या जीवनासाठी हवा मग एकांत.
   
पाहावे आकाशी-बोलावे सागराशी बसुनिया निवांत, 
     प्रश्न सुटती-उत्तर मिळती हवा मग एकांत,
                                                    हवा मग एकांत...... 

                                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh #alone 
#Soldier 
#EKANT 
#Life 
#jivan
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

विरह 

विरहाचे ते क्षण,अडकलेले माझे मन.
                  मागे राहिली फक्त,एक वेगळी आठवण. 
आठवणींचे ते क्षण जीवनाचा हा प्रवास, 
                  नकळतपणे झाला आज परत तोच भास.

जुन्या जुन्या आठवणी-जुने ते संवाद,
                   चित्र बदललं सारं राहिला फक्त वाद. 
सुरू झाली मग विरहाची ती भाषा,
                  बदलली सारी स्वप्ने बदलल्या साऱ्या दिशा. 

नकळत जीवनात येतात विरहाचे क्षण, 
                 विरहावाचून अधुरे असते आपले जीवन. 
विरह घेतो आपल्या जीवनामध्ये जागा , 
              वेगळा होतो पतंग-वेगळा होतो धागा. 

विरह तो प्रेमाचा,विरह तो नात्यांचा,
                      विरह असतो आपल्यातील वेगवेगळा मतांचा.
विरहाचा प्रवासमुळी असतोच असा वेगळा,
             विरहाचे गीत गाई जणू काही कोकिळा.

विरहाचे ढग जाती जेव्हा फुटून,
                            आनंदाच्या धारांनी कंठ येतॊ दाटून. 
'विरहाचा अंत होई मन शांत'
                            नको देऊ विरहा तु हा एकांत , 
                                                               तु हा एकांत....... 

                                                  -हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh #Chalachal 
#Life 
#alone 
#Love
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

बाप्पा निरोप तुमचा घेता 

साऱ्या विश्वाचा तु आमचा रक्षणकर्ता. 
    तुझ्या मुळेच जीवनात आनंदाची वार्ता. 
बाप्पा तुझ्या चरणी ठेऊनिया माथा, 
    मन आले भरून निरोप तुझा घेता. 

तूच आमचा गणपती, तूच आमचा गजानन,
       तुझ्या भक्तीत देवा सदैव आमचे मन. 
तूच चालक-तूच मालक तु विश्वाचा धनी,
 निरोप घेता तुझा डोळ्यात आले पाणी. 

वर्षातून एकदा तुमचे आमच्या घरी आगमन, 
  आमच्यासाठी बाप्पा हा आनंदाचा क्षण. 
दुःख होतात नष्ट तुमच्या आगमनाने बाप्पा, 
  विसर्जनाच्या दिवशी आम्हा सोडून जाऊ नका. 

कोणी म्हणतो वक्रतुंड,कोणी म्हणतो एकदंत, 
  आमच्या वरील विघ्नांचा करता तुम्ही अंत. 
तुमच्या मुळेच बाप्पा जीवनात आमच्या चैतन्य, 
     तुमच्याविना बाप्पा जिवन आमचे शून्य. 

आशीर्वाद द्यावा आम्हा तुम्ही जाता-जाता, 
  मन आले भरून निरोप तुमचा घेता, 
                               निरोप तुमचा घेता........  

                              हर्षल दत्तात्रय चौधरी.

©Harsh #GaneshVisarjan 
#ganapati 
#GaneshChaturthi 
#ganesha 
#visarjan
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

गावची संथ हवा

गावाची ती संथ हवा,
जणू मला माझा गाव हवा.
हरवून गेले जरी बालपण,
  तिथेच आपले आठवणींचे क्षण.

गाव झाला पडघवली, 
 घरे झाली दुमजली.
तरीपण गाव हवाच हवा,
  कारण गावची ती संथ हवा.

गावची गजबज नष्ट झाली, 
  माणसे निघून शहरात गेली.
आजारपणात सर्वाना गावच हवा, 
 कारण गावची ती संथ हवा.

गावात दुष्काळ-गाव डोंगराळ, 
आनंदाने झोपून पाहावे आभाळ. 
स्वप्नात सुध्दा गावाच यावा, 
  कारण गावची ती संथ हवा. 

पहाटे सूर्याचे दर्शन घ्यावे,
   रात्रीच्या चांदण्यात शीतल व्हावे.
'स्वर्गाचा आनंद' जणू माझ्या गावा, 
  कारण गावची ती संथ हवा, 
       कारण गावची ती संथ हवा.

©Harsh #Journey 
#village 
#mind
#sukh
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

तुमच्या शिक्षणाने जर ,                                                तुमचे विचार बदलत नसतील, 
तर तुम्ही जीवनात सोने कमवू शकता,             सोन्यासारखी माणसे नव्हे !

©Harsh #Gulaab 
#Education 
#life
#Mind 
#motavitonal
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

तुमच्या शिक्षणाने जर ,                                                तुमचे विचार बदलत नसतील, 
तर तुम्ही जीवनात सोने कमवू शकता,             सोन्यासारखी माणसे नव्हे !

©Harsh
  #quetos
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

नवीन वर्ष 

    नव्या वर्षाची नवी पहाट, 
                नवी स्वप्ने, नवी सुरुवात. 
    जुन्या वर्षातील तुटलेले तारे, 
          नव्या वर्षात जोडूया सारे. 

   जुन्या वर्षातील गोड क्षण, 
             सांभाळून ठेऊ त्यांना आपण. 
 जुन्या वर्षातील दुखी मना, 
        नव्या वर्षात लढ म्हणा. 

  जुन्या वर्षाची जी दशा , 
           नव्या वर्षात देऊ दिशा. 
झाले गेलं विसरू या, 
         नव्याने पंख पसरू या. 

नव्या वर्षाची नवी गाणी, 
           नव्या वर्षाची नवी कहाणी . 
नव्या वर्षाचे नवे चित्र, 
         बनवू नवे चांगले मित्र. 

नवी स्वप्ने, नवी आशा, 
  नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

©Harsh #Happynrwyear 
#2023 
#nayasal 
#navvarsh
#navinvarsh
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

रम्य ते बालपण 

कधी इकडे कधी तिकडे भिरभिरणारे मन, 
       कधी दुखी कधी आनंदी कधी मजेचे क्षण. 
असंच लहानपण आज येऊन गेल मनात, 
           रमून गेलो कसं आलंच नाही ध्यानात. 

रम्य ते बालपण रम्य त्या आठवणी, 
              सुंदर माझं गाव येऊन गेल मनी. 
लहानपणीचे विविध खेळ मोकळा असायचा वेळ, 
         कोणी बनायचं धोनी,कोणी बनायचं गेल. 

खेळायचो क्रिकेट,लगोरी,विटीदांडू, 
              लोक म्हणायचे पोरांनो नका तुम्ही भांडू. 
कधी जायचो जांभळांना, कधी जायचो बोरांना,
                काजू-आंबे भरपूर आवडत असत पोरांना. 

जिथे असायची धमाल मस्ती ती आमची शाळा,
            खेळ असो अभ्यास सगळे व्हायचो गोळा. 
मुलगा-मुलगी,धर्म -जात नव्हता भेदभाव. 
            शाळेतील गुणी मुले म्हणत असायचं  गाव. 

टायर चालवणे,पोहायला जाणे नेहमीचेच आमचे उद्योग, 
      गोटया खेळणे, पत्ते खेळण्याचा होता वेगळाच रोग. 
कधी जायची सहल कधी वनभोजन, 
                वाट पाहायचो आम्ही कधी येतात सण. 

आता मात्र चित्र बदललं आहे सारं,  
            लोकांच्या कानात शिरलंय पैशाच वारं. 
आता मात्र कोणाकडे राहिला नाही वेळ, 
             लहानमुले गेम्समुळे विसरलेत आता खेळ. 

असे होते माझे रम्य ते बालपण, 
     पुन्हा-पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन. 

                              - हर्षल दत्तात्रय चौधरी

©Harsh #childhood
#childhood_memories 
#बालपण 
#Life_experience
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

तलवार ज्यांच्या हाती, 

भगवा फेटा ज्यांच्या माथी, 

चंद्रकोर ज्यांच्या लल्लाटी, 

 जे  लढले प्रजेसाठी, 

ज्यांनी नमवले हत्ती, 

ज्यांनी  वाढवली मराठी, 

कधी मानल्या नाही जाती, 

जोडली माणुसकीची नाती, 

जे लढले प्रजेसाठी, 

ज्यांना  वाटली नाही भीती, 

अशी मर्द मराठ्याची छाती, 

असे फक्त नी फक्त एकच,

  'शिव छत्रपती'
         छत्रपती शिवाजी महाराज की जय !

©Harsh #शिवाजी महाराज 
#Chhatrapatishivajimaharaj 
#shivajimaharaj 
#ShivajiMaharajJayanti
loader
Home
Explore
Events
Notification
Profile