Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्हास आम्ही पुन्हा पहावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्हास आम्ही पुन्हा पहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्हास आम्ही पुन्हा पहावे.

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

बहरतो पुन्हा पुन्हा मी !

read more
बहरतो पुन्हा पुन्हा मी !!

अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी
जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी
**
माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे
तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी
**
घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली
आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी
**
नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे
जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी
**
बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा
तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी
**
नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची
अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी
**
सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ?
तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी
**
प्रकश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !

प्रकाश साळवी

पुन्हा पुन्हा मी बावरतो..

read more
पुन्हा पुन्हा बावरतो

जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो
मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया
देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया
रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया
तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी
 सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी
 या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी
 तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 पुन्हा पुन्हा मी बावरतो..

ज्ञानेश्वर मुसळे

पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा. #poem

read more
तु करतीस नुसती खाना खुणा
अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा.

हसत हसत तुझं सामोरी जाणं
हळुवार मनात उतरत येणं
प्रेम असुनही नसल्या सारखं करण
येता जाता माझ्या अवती भवती फिरणं
मग कसं समजवु मी माझ्या मना
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.



चंद्र चांदणे  नभ हे सारे तुझे
होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे,
तु यावे त्यात बनुन अलगद कळी
इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी,
हे सारे तु समजुन आता घेणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


माझे घर दार वाटेवर तुझ्या असती
येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती,
सुर सनई सारे तालात बोलती
बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती
आता एकदा तरी भेटुन तु जाणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


नको नको तु आता नकोस काही बोलु
चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली
जमलेच तर तु ये आता
 थोडे नयनातच आपण बोलु,
पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु,
गाजत वाजत येणार असे वचन तु 
माझ्या कवितेला तु देणा,
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.

Shubhangi Sutar

पुन्हा #poem

read more
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बगावे
आणि नवीन आयुष्याला सुरवात करावी

पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बघावं
अन उद्याच्या भविष्याची स्वप्न रंगवावित

पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बघावं 
न बोलताच तुझ्या डोळ्यांची 
भाषा समजून घ्यावी

©Shubhangi Sutar पुन्हा

Roshan Sagar

आम्ही नाशिककर

read more
गेलेल्या आठवणी
    रडून मोकळा करतो ..
येणारा प्रत्येक दिवस   
  आनंदात मात्र जगून घेतो.....

भेटला एखादा जुना मित्र
      मिठी त्याला मारून घेतो ..
येणाऱ्या प्रत्येक मुलाला 
 ‌       मित्र मात्र बनवून घेतो.....

आली कधी तिची आठवण 
             कवितेत मांडून घेतो ..
 येणारा प्रत्येक क्षण हा 
     तिचाच म्हणून समजत असतो.....

भेटला कधी वेळ तर 
                भेटून मात्र घेतो..
नसल्यास कधी मोकळा वेळ 
           एकांतात जाऊन बसतो.....

एकांतात त्या आजी बाबांकडे  
                            पहात बसतो
आजी बाबांकडे पाहून आपलेच 
          ‌ म्हणून वेळ घालवत असतो..... आम्ही नाशिककर

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
चांदणं माळल्या स्वप्नांना
तारे नव्याने भेटू लागले 
गच्च भरल्या डोळ्यांना 
ओस किनारे सतावत होते 
एक जीव साता वेशीपलीकडला 
कितीक विषारी भासला तरी
न येणारे फोन आपुलकीचे 
आज अवेळीही वाजू लागले 
प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी 
हवेने मोकळे श्वास घेतले 
एकाच छताखाली दुरावलेले 
चेहरे पंगतीत बसू लागले 
कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख 
फार जवळून पाहू लागले 
चांदणं माळल्या स्वप्नांना 
तारे नव्याने भेटू लागले 
                       .....काव्या #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #Life_experience

read more
अपेक्षांचं ओझं वाढलं की आपलीच माणसं चुकीची वाटू लागतात आणि जेव्हा खरंच बोलावसं वाटतं तेव्हा मात्र हात सुटलेले असतात....काव्या #आम्ही मुक्तछंदी

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #poem

read more
#आम्ही मुक्तछंदी #आम्ही मुक्तछंदी

Ganesh Shewale

आम्ही वारकरी

read more
mute video

Ganesh Shewale

आम्ही शेतकरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile