Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपुन्हा शब्द का अर्थ, पुन्हा meaning in english, भेटली तू पुन्हा mp3 song download, 'पुन्हा एकदा कविता प्रतिमा इंगोले', पुन्हा जन्माला या,

  • 86 Followers
  • 179 Stories

Vrishali G

...

read more
तुझ्या बासरी चे सुर ऐकताना 
मी अगदी बेभान होउन जाते 
पुन्हा पुन्हा फिरून 
ते ऐकायसाठी 
मी येत असते 
तु मात्र असतोस  रममाण 
तुझ्याच विश्वात 
अजिबात होत 
नसते तुला 
माझ्या प्रीतीची
 खबरबात ...

Pallavi Phadnis

read more
तू येतोस कधी दीड,पाच,सात 
दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती
सगळ्यांचा आपलासा होवून जातोस
झोपडे असो किंवा महालाचे दार
तु येतोस मुषकावर बसून स्वार
तुला बसायला सजते मखर पण
तुला माहितेयका ह्यासाठी किती
मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे  घर
तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण,
 आणि साजरा करताततुझा सण, 
काही जण तर भक्ती कमी आणि 
लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा 
फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव
सोन्याप्रमाणे तोलतात 
तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि 
थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने 
काहीजण असतात अधाशी
नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात 
गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात
तुला खरेच कारे हे सगळे लागते
तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते
मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला
असतोस ,म्हणूनच तर तू 
अतिभक्तीनेच बुडतोस,
कारण तू तर देव आहेस तू का
बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण 
करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील 
पुन्हा सगळे सोहळे होतील पण ,
एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला
अपघाती गेलेला असे भक्त त्या 
सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना 
आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा 
एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी,
मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही
आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती 
जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप
होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात
स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात

                 पल्लवी फडणीस,भोर✍

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत -प्रिताक्षी

read more
नाही जरी बोलली ती, 
तरी, तिचेच भास होते मला.. 

आठवण येते तिची क्षणोक्षणी 
पण, कळत नाही, 
असं का होते माझ्या मनाला.. 

असं वाटतं भेटावं तिला पुन्हा -पुन्हा 
असा ध्यास लागला तिचाच मला.. 

असा कोणता गुन्हा केलं मी की, 
ती भेटणार नाही मला... 

-प्रीत -प्रिताक्षी.. प्रीत -प्रिताक्षी

Kishor Rokade

सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...! "जय शिवराय"

read more
शिवसुर्य
              
शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार..
            बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार !

साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार..
           महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं  गुंजणार !

प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार..
          भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..!

महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार..
                    यात शंका ही मुळीच नाही उरणार..!

शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार..
  ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार..
       शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..!

"जय शिवराय"
श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा...!
"जय शिवराय"

Manish Kanade

#OpenPoetry पुन्हा पुन्हा प्रेमात पडावे 
मन हिंदोळ्यावर पुन्हा झुलावे 
अवकाशाच्या निळाइतुनी 
पुलपंखांचे सडे पडावे 
अलगद येता खट्याळ वारा 
मुक्तपणे स्वप्ने पसरावे 
नानाविध या रंगांच्या लाटा 
सूर मनीचे छेडत जावे 
 - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Alok Meshram

मराठी

read more
मराठी बोलताना वाटते लाज 
आज काल च्या मराठी मुलांना जास्तच माज 
बोलताना फक्त इंग्लिश चा वापर 
म्हणून मराठी भाषा करते  सफर 
घरचेच मुडी धरतात इंग्लिश मध्ये बोलण्याचा हट्ट 
मग कसला शिकणार मराठी तो मट्ट 
मराठीत बोलणे समजतात लो क्लास 
हिंदीत मात्र बोलतात हमखास 
दुसऱ्या प्रांतातल्या  त्यांचं भाषे बद्दल असतो गर्व 
महाराष्ट्राच्या धर्तीवर  जणू संपला तो पर्व 
आपले हाय क्लास बोलतात फक्त इंग्लिश घरी 
मग मराठी भाषा कशी पडेल त्यांचा मुलांच्या पदरी 
धंद्याची भाषा झाली गुजराती, ऑफिस मध्ये इंग्लिश आणि सहज भेटलं तर हिंदी 
नवल नही वाटेल जेव्हा  अचानक एक दिवस सरकार घालेल मराठी वर बंदी 
वेड अजून गेली नाही मराठी अजून मेली नाही 
विचार जर केला पक्का तर आज हि महाराष्ट्र वर मराठीचा होईल मोर्तब शिक्का 
महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीत बोलायल लागेल 
तेव्हाच ह्या धर्तीवर पुन्हा मराठी जगेल 
संत,  शूर  आणि विद्वानांची हि पावन धर्ती
आता आल्याशिवाय नाही राहत वरती 
पण मराठी माणसाला आधी वाटलं पाहिजे गर्व 
तेव्हाच येईल हा सुवर्ण मराठी पर्व 
महाराजांचे नाव घेऊन आजच करू  प्रन 
मराठी  भाषे ला  करू पुन्हा नंबर वन मराठी

Shashikant Kendre

तु गेलीस तेव्हा 
मी शब्दांना गोंजारत राहीलो 
स्वतःला शांत करण्यासाठी 
एक एक क्षण आपला तो कागदावरती पुन्हा मांडत राहिलो अन तू गेलीस तेव्हा मी पुन्हा सूरवात करण्यासाठी तयार  राहिलो.. शशी केंद्रे #निश्बद #तू#गेलीस #प्रेम #विरह #मराठीलेखणी #nojoto

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

read more
पाहीलस....आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही

Abhang Nair

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #Nojoto #nojotomarathi #Love #Learning #poem तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय..... झाल-गेल सार आता विसरुन जायचय..... पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

read more
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला कसं सांगु कि, तिला जपायचय.....
चिंब पावसात बेधुंद होवुन भिजायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

खोल-आत मनात तिच्या फक्त मलाच रहायचय.....
तिच्या त्या पे्माला मनोमन आठवायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिने पहाव पुन्हा म्हणुन खुप-खुप छान दिसायचय.....
आणी फक्त तिच्यासाठी Gentlemen बनायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला घेवुन लहरीं वर मनसोक्त उडायचय.....
आणि फक्त तिच्यासाठी अवघ्या जगासोबत भिडायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

कधी तिच्या कुशीत पडुन मनसोक्त रडायचय.....
तर कधी तिच्यासोबत दिलखुलास हसायचय..... 

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #NojotoQuote तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
#nojoto #nojotomarathi #love #learning #poem 
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile