Find the Latest Status about चांदणं चांदणं झाली रात lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदणं चांदणं झाली रात lyrics.
Vasundhara Jadhav
तुझ्या मोकळ्या केसांचं गच्च आभाळ दाटलं काठ काजळी गहिरे त्यात तुफान उठलं श्वास थांबती मंदसा झुले मनाचा हिंदोळा वारा खट्याळ धुंदसा घन मनाचा सावळा चाल सावळ्या मनाची फेर धरती भोवती लडीवाळ बट तुझी अशी अधीर सोबती मुग्ध रेशीमस्पर्श रोमरोमात फुलती आडखळणारे ओठ श्वास निशब्द गुंफती शब्द मौनाचे लाजरे रान पिसाट गाठलं तुझ्यामाझ्यातल्या वेळी दूर चांदणं सांडलं वसु ©Vasundhara Jadhav #दूर चांदणं सांडलं#वसुंधरा जाधव