Find the Latest Status about दुष्काळ in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुष्काळ in english.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
चोहीकडे पाणीच पाणी, मात्र माझ्या काळजात तुझ्याविना दुष्काळ पडलाय... भरून जाऊदे जागा आता, हा हृदय क्षणोक्षणी रडलाय.. प्रीत दुष्काळ
Vilas Bhoir
मनमुराद स्वप्न माझे दिवस आले मोहरलेले नक्षत्रही गेले सारे पावसाचे पडसाद ओले निळे पिवळे रान भोवती चैतन्य फुलवित राहिले वाळलेले शिवार सारे चिंब पावसात न्हाले वावरातल्या धन-धान्याचे रंग रुप तू व्यापून घेतले मिळणारे सौख्य सारे पावसाने हिरावून घेतले आयुष्याच्या वळणावरती चांदण्यातही ऊन भासले काबाडकष्ट करून सारे नशिबी ओळे दुष्काळ ओतले! ⛅विलास भोईर ☁ ओळा दुष्काळ!
कविराज धनंजय
लई दिसाचं रान तान्हेल जातंय करपून कोळशावाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! मिरोग संपून महिनाभर झाला न्हाई अजून हित थेंब बरसला अवस्था आमची केविलवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! वाढवेळ झाला पेरणी उरकून बिया बी येऊ लागल्या माती उकरून आग ओकाया लागला सूर्य आगीवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! कोठं कोठं म्हणे तू महापूर आणला आमच्याच माथी का मग हा दुष्काळ हाणला? बरसतुया तिकडं तू ढगफुटीवाणी ये रं पावसा ये रं पावसा हाक आमची ऐक दीनवाणी..! ©कविराज धनंजय #दुष्काळ # #कविराज_धनंजय #KhulaAasman