Find the Latest Status about कविता माय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता माय.
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *एक वॅलेनटाईन असा...* तिचा तो गुलाब नको मला तिचा होकार सुद्धा नको मला, एकटाच सुखी आहे आयुष्यात. तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला... तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला, स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच. तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला... तिचे आणा - भाका देणे नको मला तिचे साथ देणे सुद्धा नको मला, मी मलाच साथ देईन सदैव. तिच्या ओठांचा स्पर्श नको मला... तिच्या सोबतीची मिठी नको मला तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला, स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन. तिची प्रेम स्वप्ने नको मला... तिची आठवण परत नको मला तिची मनात साठवण सुद्धा नको मला, एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन. तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला... काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे आर्वी वर्धा, महाराष्ट्र मो. नं.:- 7028426669 ©मयुर लवटे #Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
#Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
read moreAnisha Kiratkarve
White दुखामध्ये माझी माय,तरी हसते ग गाली उन्हामध्ये तिचे लेकरू तिच्याकडे ग पाही.... किती सोसल्या यातना किती आहे तिचे कष्ट तरी सर्वांचे करत गेली ना झाली कधी रुष्ट.... ना उरले काही तिच्या आयुष्यात गोष्ट आहे अशी, जगते ती बापाविणा काय माहित कशी.... विचारते माझी माय बापाविन तुझ्या मी कशी राहू, जग दुनिया दिसते मला सारी पण त्यांना कुठे पाहू.... उरामध्ये तिच्या दडलेले आहेत अश्रु अनेक, दुःख तिचे हलके करते,तिची लाडाची मी लेक..... ©Anisha Kiratkarve #sad_quotes माझी माय....
#sad_quotes माझी माय....
read moreNarendra Vyawhare
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून 'देवी सरस्वती' ची ओळख झाली, पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी. ©Narendra Vyawhare महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
read moreNarendra Vyawhare
Unsplash शेताच्या त्या बांधावर माझं कुडाच ते घर स्वर्गालाही लाजवील ऐस माझ घरदार माय शोभे चुल्ह्या पाशी जैसी रखुमायी वाणी, बाप माझा पुंडलिक करी सुखाची पेरणी ऐसा संसार संसार नाही आनंदाला पार, स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार नाही कधी ताटातूट माझ्या माय नी बापाची, बाप जरी तो कठोर माय हळव्या मनाची नसे पैसा जरी हाती, तरी केल सपान ते पूर घाम गाळून बापानं शेत पीकविल सार घरोघरी असतात बाई मातीच्या गं चुली, लेक करता घरचा, परक्याच धन मुली कष्टा परिस ना वाट, शेतकऱ्याच्या घराला लेकराच्या सुखासाठी बाप स्वतः जुपे नांगरला ऐसा सोन्याचा संसार मला दाखवा जी बर स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार ©Narendra Vyawhare #Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी
#Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी
read moreAnisha Kiratkarve
White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय, चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय...... आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला.... आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे... मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे... आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला, ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला.... ©Anisha Kiratkarve #Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री
#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री
read moreAnisha Kiratkarve
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती, उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती... खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही, कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही..... आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत.... ©Anisha Kiratkarve #SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
read moreकवी - के. गणेश
White माये..... ----------------------------- घराच्या पिढीजात उंबऱ्यात कित्येक माय भगिनींचा गुदमरलेला होता श्वास, अपमानाचे घाट ओलांडताना दगड, शेण अंगावर झेलून खुलं केलंस मोकळं आकाश... छळणाऱ्या, पोळणाऱ्या रुढींशी वाघिणीसारखी झुंज देऊन निर्माण केलीस समतेची वाट, तुझ्याच पाऊलावर पाऊल ठेवत तुझ्या असंख्य लेकींनी गर्दी केलीय अफाट.... परंपरेचं काटेरी कुंपण व्यवस्थेशी झगडा देऊन मोठ्या हिमतीने तोडलंस, "मनु" नं उराशी कवटाळलेल्या त्या विषमतावादी क्रूर धर्माचं पार कंबरडं मोडलंस..... कुणी विमानात, कुणी चंद्रावर कुणी राष्ट्रपतीच्या मानद खुर्चीवर आज भगिनी दिमाखाने मिरवतात, तूच त्यागातून शिकवलेले स्त्री-पुरुष समानतेचे धडे मोठ्या कुतूहलाने गिरवतात... माये तू पेटवलेला न्यायचा दिवा कोणत्याही धर्माच्या वादळात आता कधीच विझणार नाही, तू निर्माण केलेल्या वाटेवरील तुझ्या पावलांचे चिरकाल ठसे पुढे कधीच बुजणार नाही.........!! ----------------------------------------------- ©कवी - के. गणेश माय सावित्री
माय सावित्री
read more