Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातील दुःख Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातील दुःख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील दुःख.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असं ह्या जगात कुणीच नाही ज्याला दुःख नाही,
पण दुःख आहे म्हणून रडत राहणे हा काही इलाज नाही.
मी तर मनसोक्त हसतो,सोबत इतरांनाही हसवतो,
आनंदी ठेवत सर्वांना,स्वतः मनातील दुःख लपवतो.
आनंदी राहण्या जीवनात,हाच मंत्र जपत राहा.
विसारण्या सारे दुःख,हसा आणि हसवत राहा.
असे नाही की मला काही दुःख नाही,
इतर कुणी दुःखी होऊ नये,म्हणून मी ते दाखवत नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तु

Bhushan Vispute

मनातील भाव अंतरंगी दाटले जेव्हा रूप तुझे नजरेस आले #मनातील

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीप्रेम

read more
अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे  टिपता  आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
उदंड निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती लाभण्यासाठी ईश्वराची सुंदर योजना असावी लागते. 
प्रेमाची अतूट साथ हे तुमचे मनोबल द्विगुणित करण्याचे ऊर्जा स्थान असते.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

कविता पुराणिक

मनातील भावतरंग #मराठीविचार

read more
प्रेम म्हणजे जणू आयुष्यातला सुंदर महोत्सव. अहंकार लोप होऊन स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न उरणे.
 म्हणजे खरी निरपेक्ष प्रेममयी भावना.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

Deepak Landge

पावसाची छप्पराला, कळावी कविता
डोळ्यातून उशीवरती गळावी कविता

बंद व्हावे आता,निरोपाचे येणे जाणे
सांजवेळी दूर देशी ढळावी कविता

तु दिलेला चकवा,मी पावलांना बांधला
का?तुझ्या घराकडे मग वळावी कविता

दिला काळजावर,मी वेदनेचा मुलामा
नि आता पुन्हा नव्याने, छळावी?कविता

सुटका कशी करावी? मी धावतो कधीचा
धमन्यातले रक्त होऊन, पळावी?कविता

नाहीच मोल कळले,जर माझ्या वारसांना
सरणात सोबतीला मग जळावी कविता..



        ✒ ओडिसीयस.
           ८८८८५४२४६० #rain
#मनातील

D S

मनातील भावना

read more
आत्ता तरी जगू द्या???
 तुमच्या वाईट नजरांपायी
घरात मला डांबले...
मुलगी आहे तु??
म्हणून बंधणे माझ्यावर 
लादले...

आत्ता तरी जगू द्या???
स्वतःच्या अस्तित्वाला शोधू द्या .
मनाशी बांधलेले स्वप्नांचे इमले..
सत्यात उतरू द्या. 
उंच भरारी घेऊन...
यशाचा स्वाद 
मला हि चाखू द्या.

आत्ता तरी जगू द्या???
पायातील बेड्यांपासून मुक्त होऊन.... 
स्वच्छंदी,मनसोक्त,मनमुराद उडू द्या.
फुलपाखरा प्रमाणे बागडू द्या. 
सप्तरंगी आयुष्याच्या रंगात .....
मला हि रंगू द्या.

आत्ता तरी जगू द्या???
तुमच्या वाईट नजरांपायी 
घरात मला डांबले ...
मुलगी आहे तु???
म्हणून बंधणे माझ्यावर 
लादले... मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
माझे-माझे करता-करता
सोडायचे आहे जग सारे
तरी किती धडपडतोय तु.....

अंथरुणाशी खेळता-खेळता 
सुन्न पडणार आहे अंग सारे 
तरी किती धडपडतोय तु....

सरणाचे चटके भोगता-भोगता 
हाडांचा सापळा उरणार आहे
तरी किती धडपडतोय तु ....

चार लोक चार अश्रु गाळतील
नंतर त्यांना ही विसर पडणार आहे
तरी किती धडपडतोय तु ....

रिकाम्या हाती आला तु 
अन् रिकाम्या हाती जाणार तु 
तरी किती धडपडतोय तु....

माझे-माझे करता-करता 
सोडायचे आहे जग सारे 
तरी किती धडपडतोय तु!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
अवचित पणे मनाला ठेच लागते.
 असंख्य व्यक्ती त्या दुःखाच्या सागरात स्वतःला सामावून घेतात.
दुःखाच्या खळखळत्या लाटांन सोबत आयुष्य काटतात .
 तर मोजके व्यक्ती नव्याने ऊभारी घेऊन स्वछंद गगनभेदी भरारी घेतात .
अलिप्त कला,गुणांना आत्मसात करून नव्याने स्वप्न रंगवतात .
एक ठेच.........
किती काही शिकवते ना?? मनातील भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile