Find the Latest Status about आनंदाचा पाऊस अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाचा पाऊस अर्थ.
Rasika Chalke
White चित्रातला उष्मांक थंडावण्या साठी बरसतील सखे पावसाच्या सरी तव दुःखाची वादळ सरतील अन सुखाच्या गारव्यात रमशील पावसाचे पाणी तुझ्या चेहर्यावरून ओघळतांना सखे तुझ्या ओंजळीत जरा घे अन दे माझ्या ओंजळीत ओंजळीत साचलेल्या पाण्यात तुझे मुखकमळ बघ कसे दिसते खळखळणाऱ्या झऱ्यावाणी ओठी लाव जरासे पावसाचे पाणी अन घे पिऊन ते जल भागव तहान आपली. मन तृप्त होऊदे तुझे तव ज्यासाठी आसुसलेली होतीस मनमुराद आनंद घे तव त्या क्षणांचा साठवुन ठेव त्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी 🌴🌹घे विसावा क्षणभर अन दे झोकून स्वतःला बरसणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी तू विरघळून जा प्रतीच्या सागरात.💓👌 अन मग बघ जीवन किती सुंदर आहे 🌻 फुलणाऱ्या फुलापरी वेचावे तितकेच थोडे असती जीवनाची रंगत संगत 🌸 जग भरभरून आता याचीच आता तुला खरी गरज आहे दिलखुलास पणे जागतांना ईकडे तिकडे पाहू नको 😀😀 हसायच आणि उल्हासित रहायच हेच जीवनाचे खरे सार आहे... सौ. रसिका चाळके शिर्के स्मृतिगंध कविता संग्रह ©Rasika Chalke #good_night पाऊस
#good_night पाऊस #मराठीकविता
read moreAmisha Asole
हिरवळ तो वृक्षाचा , नाच तो वेलींचा, साज तो धरतीचा, मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा, चाहूल देताहेत आपल्याला निसर्गाच्या आनंदाचा!! ©Amisha Asole #पाऊस
Amisha Asole
मिरुगाचा हा पाऊस येताच मनात पसरल्या उल्हासाच्या गारा, पडला पाऊसाचा थेंब अन् भिजली संपूर्ण वसुंधरा !! ©Amisha Asole #पाऊस
Amita
White पाऊस💦💦 उगाच रिते का मन हे आतुर वर्षा आगमनाची लागे हुरहूर..... पाऊस येता अवखळ, अल्लड तृप्त झाले मन हे चंचल.... वलयांकित नक्षीच्या रेखा उमटून गेल्या जळात पळभर.... वृक्षवेलींवर पाचूंची उधळण अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण.... बिंदू अनामिक बुजरे क्षणभर प्रवाहात ओघळती जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब धरेच्या मिलनासाठी.... उंच तरुवर भिजूनी पक्षी निवांत क्षण वेचती.... मध्येच फडफड, भिरभिर करिती थेंब शिंपण्यासाठी.... उभ्या उभ्या सरींचा जणू आरव घुमतो कानी सप्तसुरांची मैफल जमते नक्षत्रांच्या अंगणी.... ओल्या ओल्या मातीचा गंध भरतो अंतरी जणू कोमेजल्या मनाला लाभावी संजीवनी.... उमलून येई भाव मनीचे जलधारा पाहताक्षणी उमटून जाती अविरत शब्दांचे काव्य लेखणीतूनी काव्य लेखणीतूनी।। अमिता🖋️ ©Amita #पाऊस
Sujata Chavan
White //तुषार // बेधुंद हवा, असा हा गारवा अमृती होईल, वर्षा धारा..... आडोशी का तु, उभा चातका घे अंगावर... तुषार... "जरा"..... Yedu...!! ©Sujata Chavan #पाऊस धारा#
Ganesh joshi
White प्कृति पृथ्वी की सुदंरता है ©Ganesh joshi #Lake #अर्थ #Earth #prakriti #ganeshjoshibkn
nisha Kharatshinde
आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत.. मी ही बाल्कीनीतून हसत त्याला होते न्याहळत दिवसभर बोललो आम्ही सांज व्हायला लागली होती रात्रीही येणार का रे हो...गर्जना ऐकू येत होती कसे गेले वर्ष अखेर त्याने मला विचारले फक्त तुझीच प्रतिक्षा सोड...तूला खूप आठवले गंधाळल्या दाही दिशा आज मी ही मंत्रमुग्ध जाहले त्या चातकासारखीच मी ही आज खरी तृप्त झाले तो ही ऐकून हसू लागला वाट त्यानेही पाहिली होती अंधार सगळीकडे पसरला तितक्यात आईने हाक मारली होती ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)
आज मी अन् तो(पाऊस) #Poetry
read more