Nojoto: Largest Storytelling Platform

New राहून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहून.

Related Stories

    PopularLatestVideo

Rohini kadam

राहूनच गेली ...

अथांग सागराची नीरव शांतता अनुभवायची राहूनच गेली ...

प्रेमरूपी  शिखरांची भव्यता मोजायची राहूनच गेली ...

रुक्ष वनाला फुटलेली चैत्र पालवी रेखाटायची राहूनच गेली ...

कळत नकळत विणलेल्या रेशमी वस्त्राची किनार सजवायची राहूनच गेली ..

स्नेहबंधाच्या  विटांनी  इमारत बांधायची राहूनच गेली ...

आपली स्वप्नवत  प्रेमकहाणी लिहायची राहूनच गेली ... राहूनच गेली ...

~ शरद ~ #राहूनच_गेली

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहून गेले... #राहूनगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
राहून गेले खूप सारे
जे स्वप्न रंगवले होते दोघांनी 
आता सुसाट आठवणींचे वारे 
होतात शांत माझ्या आसवांनी ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राहून गेले...

#राहूनगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Roshan Sonawane

#एक राहूनि गेले. #poem

read more
"एक राहूनि गेले..."
सगळी कथा कथित केली 
एक सांगणे राहूनि गेले 
सगळी व्यथा सुटत गेली 
एक मागणे राहूनि गेले 
प्रित अंगणात- प्रितीचा वास
प्रितीस पाहणे राहूनि गेले
प्रितीचा मित-गित प्रितीचे 
प्रेम गित गाणे राहूनि गेले
सकाळ ही की संध्याकाळ 
अण दिप लावणे राहूणी गेले
झोपेच्या तंद्रित गुलाबी थंडीत
स्वप्न पाहणे राहूनि गेले
धुंद मन हे फुंद खेळ ते 
खेळ खेळणे राहूनि गेले
नकार-हो ची ती पुस्ती 
मेळ घालणे राहूणि गेले
प्रित समजुत मनात मोठी म्हणूणी!
तिला विसरणे राहूनि गेले
अजुनही असाच काही
एक सांगणे - एक मागणे 
एकच एक राहूनि गेले.
-अनुराग सोनवणे.
८८७९४१९९४१ #एक राहूनि गेले.

vishal patil

जगायचं राहूनच गेलं...

read more
 जगायचं राहूनच गेलं...

pooja d

खूप काही राहून गेलं
प्रेम माझं हिरावून नेलं
केलेले व्रत वैकल्य सगळे
केलेले संकल्प वायाला गेले

सूर्योदय अन सूर्यास्त होते
बघायचे सोबत तुझ्या
करायचा होता गोड शिरा
किचनमध्ये तुझ्या, राहूनच गेलं......

टीव्ही चा रिमोट लपवायचा
होता उशाला माझ्या
त्यानिमित्ताने जवळ
घ्यायचे होते तुला, ते ही राहूनच गेलं.....

वाऱ्यावर कसे उडतात केस
हे दाखवायचं होत तुला
हळूच साडीचा पदर खाली पाडून
खट्याळपणा करायचा, राहूनच गेलं......

कुलू मनाली, कश्मीर 
फिरायचं होत सोबत तुझ्या,
समुद्रावरच्या लाटांवर 
स्वार व्हायचं, राहूनच गेलं........

संसार, बायको सोबतच 
तुझ्या बाळाची आई होणं हे 
स्वप्नातच राहिलं, अन
माझ्या आधी तूच स्वर्ग पाहिलं........
प्रेम करायचं आपलं राहूनच गेलं......



 #राहून_गेलं #खूपकाही #विरह_वेदना #विरहकविता #विरह #मराठीकविता #yqtaai

Komal Ghadigaonkar

झालं म्हंटल तरी उरून जातं
आयुष्यभर पुरून जातं,
वेगळे होणारे काय ते देह असतात हो....
पण प्रेम मनात मुरून जातं. #प्रेम #yqtaii #मराठीलेखणी #मराठीचारोळी #राहूनजातं #नातं #marathisahitya

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राहून गेले... #राहूनगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मोकळेपणाने जगणे 
स्वच्छंद फुलपाखरा सारखे 
बेधुंद होउनी बागडणे ..
मनाच्या कोपऱ्यात 
नेहमीच ईच्छा असते 
पण खांदी जबाबदाऱ्यांचे
ओझेही नेहमीच असते ..
वेळ खुप कमी असतो 
आपल्याला धीर जराही नसतो 
म्हणून प्रत्येक आनंदी क्षणी क्षणभंगुर व्हावे 
वाईट परिस्थितीतही स्वच्छंदीच जगावे ..


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राहून गेले...

#राहूनगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

dinesh Rajiram gajbhiye

राहून गेले

read more
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले
 लपविलेले मजकूर ते वाचून गेले

 आसवांना मी न दाखविले कधीही
घरटे भावनांचे आज का वाहून गेले

संकटात साथ सोडली न मी कधीही
जात आपली जातांना दाखवून गेले

जीवलग होतो त्यांचा मी  एकेकाळी
ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले






बरं मातून गेले राहून गेले

अश्लेष माडे (प्रीत कवी )

जगायचंच राहून गेलं

read more
mute video

सोपान ओव्हाळ.

जगणे राहून गेले

read more
जगणे माझे राहून गेले
मरण मला जिंकून गेले
राहीले होते स्वप्न अधूरे
भाग आयूष्याचे संपून गेले

sopan जगणे राहून गेले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile