Find the Latest Status about माझ्याजवळ गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्याजवळ गाणे.
Durga Deshmukh
माझ्याजवळ बस जरा माझ्या जवळ बस जरा बरे वाटते जगण्यात आनंद आहे, हे खरे वाटते अंधारी रात ही ,मज खायला उठते माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते आठवणीचे तुझ्या, मनी काहुर दाटते माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते शिशिर यातना सोसुन, वसंत पालवी फुटते माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते झाली किती दैना, दुःखाने आभाळ फाटते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते सोसुन यातना झळा, भाकरीचे शिखर गाठते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते उफाळून येता आठवणी, मनाचे पंख छाटते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते ©Durga Deshmukh माझ्याजवळ बस जरा
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Rutu
Miss करतेय आहो तुम्हाला खूप .. please माझ्याजवळ परत या