Nojoto: Largest Storytelling Platform

New करामती शेतकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करामती शेतकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करामती शेतकरी.

Stories related to करामती शेतकरी

    LatestPopularVideo

somnath gawade

तुझ्या कारामतीचे ऐकलेले 
सर्वच दावे काही 'फौल' नव्हते.
वेळ हातातून निघून गेली तेंव्हा मात्र
समजून घेण्यात काही 'तथ्य' नव्हते. #करामती

RUDRA Hd

Sachin Zanje

शेतकरी....

read more
विषय - व्यथा शेतकऱ्यांची.

पैसा मिळवण्याचे
सर्व साधन आता थांबले.
जगण्याचे महत्व किती आहे 
हे प्रत्येकाने जाणले.

हौस मज्जेच्या जगण्याचे
सुत्रे गेलीत बदलून.
जगण्यासाठी काय लागते 
हे प्रत्त्येकास आले कळून.

नाही प्रतिष्ठा मोठी आमची
तरी दिन रात्र आम्ही राबतो.
पिकाचा अन त्या भुकेलेल्याचा विचार मनी 
म्हणून समाजाशी आम्ही जास्त नाही लढतो.

नाही करत वाढावे वेतन
असा आम्ही प्रचार.
भाजीपाल्याचा  वाढला दर आमच्या 
 तर समाज चार पैशाला होतो तेव्हा लाचार.

खते,पिक,इत्यादी आर्थिक किंमतीचे
दर असतात तुमच्याच हातात.
त्यावेळी सुचत नाही का ? 
किंवा येत नाही ? हा विचार तुमच्या मनात.

निसर्गाशी लढतो आम्ही
आणि परिस्थितीशी करतो दोन्ही हात.
सांगत नाही कधी कुणाला
आर्थिकतेवर आम्ही कशी करतो तेव्हा मात.

काळया मातीची लेकरं आम्ही
म्हणून जग म्हणत आम्हाला भुमीपुत्र.
अन्नदाता आहे तो सर्वांचा 
समजु नका त्याला एकतीळमात्र.

कवी - कु सचिन सदाशिव झंजे.
          कोल्हापूर.. शेतकरी....

कवी - के. गणेश

शेतकरी...

read more

VishakhaBorkar

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो

जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो

दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून 
आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो

जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो #शेतकरी

उमा जोशी

तो राबराबतो शेतामध्ये फार

अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार

बीज पेरलेले वाया जाते सारे

पण गडी कधीही मानत नाही हार


थांबून राहणे माहित नाही त्याला

अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला

रोवून घट्ट तो पाय उभा मातीत

कामास सज्ज जोडून बैलजोडीला 


राबतात त्याच्या कुटुंबातले सारे

झेलतात सगळे अंगावरती वारे 

थकतो जीव तरी थांबत नाही कोणी

डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे


भाव मिळत नाही इतके करून त्याला

तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला

धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या  

कष्टाने तो सावरतो आवेगाला


सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता

पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता

हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना?

एवढा करा की विचार जाता जाता

--- ३१/०७/२०२३

©उमा जोशी #शेतकरी

Kiran Sabale

शेतकरी #मराठीविचार

read more

Sanika Gaikwad

शेतकरी #मराठीकविता

read more
#शेतकरी राजा 👑

तू लेक काळया मातीचा
मर्द रांगड्या छातीचा

पोशिंदा तू जगाचा 
मानकरी तू कामाचा

कष्ट नशिबी तुझ्या फक्त
 पेरायचंआणि काढायचं तू नुसत

घामाचं शून्य मोल तुझ्या 
बेभाव जातो माल
निसर्गाचा समतोल बिघडला 
की होतात तुझे हाल

अंधाऱ्या राती सोबतीला
 विंचव आणि साप
तरी दुसर्‍याच्या हाती
 तुझ्या किमतीच माप

सर्जा राजाची नादर गाडी 
तुझी वेगळाच थाट
राबतोस कळ्या आईसाठी म्हणूनच 
देशाचा कणा आहेत ताट

©Sanika Gaikwad शेतकरी

Pravin Rathod

शेतकरी

read more

Dipak Khekare

शेतकरी

read more
शेतकरी माझा  बाप


शेतकरी बाप माझा राबे राणा वनात
नाही त्याच्या पोटी तूप रोटी साखर
खातो चटणी भाकरी चालवितो नागर
माझ्या बापाची मात्र नाही कुन्हा रे कदर...

अंगावरी ऊन घेऊन  चाले अनवाणी पायांनी
वाट सजली होती काट्या काळ्या गोट्यानी
त्यांच्या अंगावरील सदरा फाटक फुटका
त्यांच्या नशिबी मात्र ऊन वाऱ्याच्या आसरा

खाऊन चटणी भाकर राबे दिवस रातर
खांद्यावरी रे नांगर जसा नभात इंद्रधनुष्य
अंगावरी घाम त्यात इंद्रधनुष्याचे रंग
त्या रंगानी सजले माझ्या बापाचे रे अंग

कधी भेटणार भाव शेतकऱ्याच्या मालाला
सांगे हमी भाव देऊ मग चुकते कशाला
आम्ही आहो दानादिन म्हणूनच ही गत्ती 
एकवटूनचं आलो तर होईल तुमची सुट्टी
पण एकत्र होण्यात भ्रष्ट आमची बुद्धी

आता तरी एकत्र येवून लढूया
एकमेकांचे सारथी आपण बनुया.....


दिपक खेकारे
खिर्डी,चंद्रपूर-८८८८३२४१५६ शेतकरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile