Find the Latest Status about hill stations in maharashtra information in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, hill stations in maharashtra information in marathi.
Amita
मी मला शोधले काही मी मला गवसले नाही शोध शोधता थांग लागला गुंतून गेले मन हे काही जुन्या सयी दाटून येता मेघ डोळ्यात बरसू पाही सुटले काही ,उरले काही प्रतिबिंब ते जळात राही आयुष्य सरता सांजवेळी मनात साऱ्या खुणा ठायी दुःख दडले, सुख सजले दरवळ त्याची दिशा दाही मनात अल्लड वारा वाही गुंतून जाशी, दिशा प्रवाही उनाड सारे सरते क्षण हे नभांगणातील चंद्र पाही.. साक्ष क्षणांची कोरून जाई उमलते कधी रित्या दुपारी तप्त भासती किरणे जेव्हा सुप्त गारवा मन गाभारी..... अमिता ©Amita #marathi #मराठीकविता #MarathiKavita #Hill
Nikhil Kashyap
worldofpoetry__
वसुंधरा दिनानिमित्त... पृथ्वीमाता.... माता मनलं की आपण लगेच गृहीत धरायला लागतो.आईवर हक्क गाजवायचा तिच्याकडून आपल्या इच्छा-अपेक्षांचा बोझा आपल्याला हवा तसा अगदी हट्टाने पुरवून घेतो आपण आणि अगदी तसंच धरती मातेशीही तितक्याच हक्काने वागू लागतो.ती बिचारी तिचे कर्तव्य करत राहते आणि आपल्या स्वार्थापोटी तिला प्रदूषण वाढवून suffocate करत आहोत...भूगर्भात खाणी खोदून तिच्या अंतरंगातील हृदयाला वेदना देत आहोत...तिच्या नदीस्वरूप स्वच्छ-निर्मळ मनाला मलीन करून टाकत आहोत.आई आहे ती बोलणार नाही कधीच आपल्याला म्हणून तिला असंच किती काळ गृहीत धरायचं.... वेळीच आईची काळजी घेऊया अन्यथा आपण आपली मुलासारखी काळजी घेणाऱ्या एका मौल्यवान व्यक्तीला आपल्याच नकळत गमावून बसु.🌍🗻🏞️🏝️🏜️ ~श्रेयाG ©worldofpoetry__ #marathi #lekhak #MarathiKavita #maharashtra #EarthDay
silent knight 🤴
Marathi........ Maharashtra 😊😔💔
Vishal Chavan
मी मराठी... माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे.. माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे.... माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार.. वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार... सार्या दर्या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने.. कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने... माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती.. पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती... माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने.. भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने... माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती.. माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती... Vishal/Aadinaath 28-06-21 . . ©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra