Nojoto: Largest Storytelling Platform

New बहीण-भावाचं नातं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहीण-भावाचं नातं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहीण-भावाचं नातं.

    PopularLatestVideo

Vikas Jagtap

बहीण #poem

read more
बहीण कोण असते
 
आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी,
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या हो मध्ये हो म्हणणारी,
ती बहीण असते.....

कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो"
असे मायेने बोलणारी,
बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी,
ती बहीण असते....

"लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, 
पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी,
ती बहीण असते....

लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी,
एखादा  दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो"
असे बोलून रागवणारी,
ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप) बहीण

suresh pawar

#बहीण

read more
टॉम अँड जेरी
(प्रिय बहिणीस समर्पित)

मीच हुशार तू ढगोळी
मी साजूक तूप तू पुरणाची पोळी
दप्तर तुझं पण पाठीवर माझ्या
चल म्हणतेस लवकर गाढवा माझ्या

सांडलीस ना भाजी थांब आईलाच सांगते
हाथा पाया पडतो मग ती उगाच भाव खाते
ती टपली मारायची रोज पण रडायला जमायचं नाही
माझ्या साध्या खोडीनेही तिचा भोंगा कधी थांबायचं नाही

एका पानाला २ चॉकलेट असा भाव ती ठरवायची
पण काहीच न घेता बिचारी निबंध लिहून द्यायची
क्लास,धुनी भांडी अन त्यात अभ्यास सारं मी पाहायचो
त्या पूर्णत्वाकडून मी अपूर्ण असलेला 'धैर्य' शिकायचो

अगदी बाप आजारी असताना तिनं सोसलेलं आठवतं
माझ्या शिक्षणापायी तिनं माघार घेतलेलंही आठवतं
हळू हळू संसार नावाच्या जीवनात तू सुखाने नांदतेस
आपल्या गोड कडू अनुभवाच्या गाठोड्यातही तू असतेस

जगात सुंदर नातं आपलं जसं बिस्कीट अन खारी
होय मी आहे टॉम आणि बहीण माझी जेरी
रचनाकार,
सुरेश गोविंद पवार #बहीण

surekha kamble

बहीण

read more
mute video

प्रतिक लोखंडे

#बहीण

read more
#बहीण

उगवतीचा सूर्य शांत भासावा
अनं आमची भांडणे तीव्र व्हावी,
हसून हसून भांडता भांडता
ती माझ्यावर पटकन रुसावी!! 

रुसून फुगून कोपऱ्यात बसलेली ती
मी केलेल्या वाकुल्यांनी खुदकन हसावी,
कधी कधी रडवलेल्या अश्रूंना वाटतं
मलाही एक छानशी बहीण असावी!! #बहीण

Vishnu Jadhav

भाऊ बहीण

read more
 भाऊ बहीण

yogesh atmaram ambawale

Opn collab... मी नवीन विषय घेऊन आलोय आपल्या सगळयासाठी.. नातं कोणतेही असो त्यात विश्वास हवाच, मग ते नातं मैत्रीच असो वा प्रेमाचं किंवा बहीण भ #yqbaba #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #शब्दवैभव

read more
नातं तुझं नि माझं अतूट विश्वासच,
नातं तुझं नि माझं जन्मोजन्मांतरीच.
नातं तुझं नि माझं एकमेकांवरील आधाराच,
नातं तुझं नि माझं कधी न तुटणार. Opn collab...
मी नवीन विषय घेऊन आलोय आपल्या सगळयासाठी..
नातं कोणतेही असो त्यात विश्वास हवाच, मग ते नातं मैत्रीच असो वा प्रेमाचं किंवा बहीण भ

Prafulla Pednekar

बहीण 🙏 #मराठीविचार

read more
mute video

Deepak

माझी बहीण #CloudyNight

read more
महित नाही,                      
 आज खूप रडावस वाटत आहे. 
कुणावर प्रेमही केलो नाही .
पण,                              
 हंबरडा फोडून रडावस वाटत आहे.
बहीणीच लग्न होणार अण ती 
आता सोडून जाणार याच दुःखान
मला खुप रडू येत आहे.
स्वतःला कितीही सावरत आहे,
तरीपण या अश्रूंणा थांबवता येत नाहीय.
वरून हसत हसलो तरी आतून
खूप व्याकूळ झालो आहे.
बहिणी पासून दूर असलो तरी
मन माझ तिकडच आहे.

©Deepak माझी बहीण

#CloudyNight

vikasraje2324

#नातं..

read more
mute video

suresh pawar

#नातं

read more
गाठ
तुटेल इतकं ताणु नये
तुटल्याचा आव आणू नये
वाटले नाते जर महत्वाचे
वाईट मग नात्यात कधी मानू नये

चुकांना कधी गुनू नये
खोट्याची माळ विणू नये
काय केली मदत नात्याने
चुकून कधी म्हणू नये 

मन विषारी बनू नये
चुका भूतकाळाच्या खणू नये
अलगद ओढावे प्रेम नात्यातले
मनाच्या एकोप्यात मग उगा कण्हु नये
©सुरेश गोविंद पवार #नातं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile