Nojoto: Largest Storytelling Platform

New वैतागलेला शेतकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वैतागलेला शेतकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वैतागलेला शेतकरी.

    PopularLatestVideo

Freelancer

Sawta Tirgul

रॉयल शेतकरी पॅटर्न #मराठीविचार

read more

उमा जोशी

तो राबराबतो शेतामध्ये फार

अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार

बीज पेरलेले वाया जाते सारे

पण गडी कधीही मानत नाही हार


थांबून राहणे माहित नाही त्याला

अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला

रोवून घट्ट तो पाय उभा मातीत

कामास सज्ज जोडून बैलजोडीला 


राबतात त्याच्या कुटुंबातले सारे

झेलतात सगळे अंगावरती वारे 

थकतो जीव तरी थांबत नाही कोणी

डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे


भाव मिळत नाही इतके करून त्याला

तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला

धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या  

कष्टाने तो सावरतो आवेगाला


सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता

पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता

हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना?

एवढा करा की विचार जाता जाता

--- ३१/०७/२०२३

©उमा जोशी #शेतकरी

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

🙏बैल पोळ्याच्या समस्त शेतकरी बांधवाना तसेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🤗🎉🎊... #मराठीसंस्कृति

read more

Kiran Sabale

कष्टाळू शेतकरी #मराठीविचार

read more

SBR Patil NDN

शेतकरी बेहाल🌧️🌧️ #foryou #foryoupase #Music #Motivation #viral #विनोदी

read more

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:- पहिला पाऊस येता पहिला पाऊस देतो मनाला गारवा, सृष्टी सजताना सारी शालू नेसते हिरवा.! येता पहिला पाऊस #मराठीकविता

read more
येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस
नाचे मोर रानामध्ये,
पिसे गळताना दाटे
रडू सारे मनामध्ये.! 

येता पहिला पाऊस
होतो शेतकरी बाप,
देतो जगाला आधार
दिसे घामाचा प्रताप.!

येता पहिला पाऊस
वारा भरे दान असं
रानी वनी हिरवळ 
तेव्हा ओठी भरे हसं.!

©Sarita Prashant Gokhale शीर्षक:- पहिला पाऊस

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस

Kiran Sabale

शेतकरी #मराठीविचार

read more

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर् #मराठीसंस्कृति

read more

Shankar Kamble

सूर्य कोपला आभाळी ओली लव्हाळी सुकली
जीव मातीचा कोरडा मान धाटाची वाकली

उर उमाशी घामाशी कशी सोसावी काहील?
आत बाहेर वणवा कधी सांगावा जाईल?

भासे सावली पारखी करू कुणाशी सलगी?
घुटमळे वावटळ फेर धरुनी कलगी

झाडां–झुडपांना कसा?भार पानांचा पेलेना
दूर लोटल्या खाईत दैन्य पाचोळा जाईना 

मोटं लागली उचकी तळ गाठला सुखाचा
पोटं हापाटी खिलारं ऐक हंबरा जीवाचा

हात निढळी ठेवून काळ्या ढगाला मागतो
सरो ताप दुनियेचा दिल्या वचना जागतो

©Shankar Kamble #Saffron #सूर्य #उन #ताप #गर्मी #उन्हाळा #उकाडा #विरह #शेतकरी #माती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile