Find the Latest Status about बोलतोय मुख्यमंत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलतोय मुख्यमंत्री.
कवी - के. गणेश
कवी बोलतोय.. फाटक्या झोळीत केविलवाणे शब्द घेऊन, अनवाणी फिरतोय.. माणसात हरवलेली जूनीच माणुसकी नव्याने पेरतोय.. ओस माळरानात जणू पावसाची अशा करतोय.. फळं यावीत सुखाची प्रत्येकाला म्हणून याचना करतोय.. मातीत पाय रोवून एका जाणिवेनं मी थरथरतोय..! @kganesh कवी बोलतोय..
कवी - के. गणेश
मर्द निधड्या छातीची पोलादी ढाल करून डरकाळी वाघाची फोडतोय.. रक्षण करण्या मायभूमिचे छुप्या गनिमी पहाडानाही अख्खं मुळासकट तोडतोय.. नभात उडणाऱ्या गरुडाची रक्तात जिद्द घेऊन मातीवर लोळत नाही.. दुष्ट शत्रूच्या काफिल्यावर शौर्याचा इतिहास रचतो डरपोक खेळत नाही... काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री छुप्या काळ्या शत्रूवर ठेवावा लागतो पहारा.. भयाण गर्द जंगल कधी हिंस्र प्राणी नसतो जीवाला निवारा... व्याकुळ एकांतात जीवाला बायको अन् चिमुकल्यासह गावाकडचा लळा आठवतो.. दिमाखदार तिरंगा पाहून थकलेल्या निष्ठावंत डोळ्यात आसवांचा पूर साठवतो... संकट समयी दऱ्याखोऱ्यातून निस्सीम देशभक्तीचा वारा अंगभर सळसळत राहतो.. वाघ जखमी झाला तरी डोळ्यात आग घेऊन जीव तळमळत राहतो... ऐका माझ्या देशवासीयांनो रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत ओझं देशभक्तीचं पेलतोय.. पाठीवर हात ठेऊन तुम्ही फक्त लढ म्हणा मी फौजी बोलतोय.. कवी-गणेश खरात ९०२८११०५०९ फौजी बोलतोय...
dipak Rathod
मी पाऊस बोलतोय.... खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय, तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय, मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.... अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या, कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.... प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय..... कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय..... लेखक........ दिपक राठोड ©dipak Rathod मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal
Dr Mangesh Kankonkar
हो मी रावण बोलतोय जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं, तपासलं का स्वतःच्या चारित्र्याला मोठ्यानं त्यानं विचारलं. केला आहे मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा, प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. दिवसाढवळ्या रस्त्यावर अब्रुचे लचके तोडतात, सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात. तुम्हा मानवां पेक्षा राक्षस मी ठरलो भारी, केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या, वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा, प्रयत्न करा तुम्हीं स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा, पण पेटवण्या आधी तुमच्यातील राम मला दाखवा...!! ©Dr Mangesh Kankonkar हो मी रावण बोलतोय #Dussehra