Find the Latest Status about कान्होबा खेळ डाव जाऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कान्होबा खेळ डाव जाऊ.
Shankar Kamble
सारीपाट आयुष्याचा डाव रोजचेच नवे फासे फेकतो आशेचे दान मनोचीत हवे.. ओढ मधल्या मधली होरपळ सोंगटीची गुढ अंधार गुपीत भ्रांत असते उद्याची.. बोटावर नाचवितो कधी पाडतो,ताडतो दुवे निखळले तरी तोच नव्याने जोडतो.. घेरलेले चहुबाजी शर भेदती देहाला ढाल करुनी हिम्मत देई आव्हान मृत्यूला.. शह ,मात ठरलेली बाजी यावीन अपुरी लढ वेढ्या प्राणपणे रीत जगण्याची खरी.. ठाम निर्धार मनाचा बळ पेरतो मातीत तरारले किती तृण नाव कोरून छातीत.. ©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध
#Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध #जीवनअनुभव
read moreप्रल्हाद दुधाळ
डाव .......... नियतीने दिलेले पत्ते स्वीकारून डाव खेळावा! डोकावून कधी कुठेही कशाला जीव हा जाळावा? खेळताना पत्त्याचा डाव राखावा हुकमाचा एक्का..! राणी असो किंवा गुलाम विजय आपलाच पक्का..! #डाव
Avinash lad
डाव.. =================== मंतरलेल्या रात्री डाव माझा असावा उधानल्या मनाचा हळवा स्पर्श व्हावा बाहुपाशात तुझ्या जीव माझा असावा अन् चंद्र ताऱ्यांचा मेळ नभी दिसावा बिलगून तुझ्यात श्वास गुंतत जावा शरारती दोघांच्या अंगी रोम हसावा शब्दात खेळतांना ओठ तुझा भिडावा छेडून भावनांना उष्म श्वास गुंतावा मंतरल्या रात्रीस अंगी रंग चढावा शीतल चांदण्यांत हात तुझा मिळावा स्वप्न रंग भरती डाव मनी असावा पहाट वारा येता सूर्यप्रकाश व्हावा ==================== श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ डाव..
डाव..
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
बोगस आदेशाची बेगडी कळ बांडगूळ संघटना देण्या बळ भ्रष्ट मीडियाचे वापरून दळ पैश्यासाठीच रचला हा तळ व्यवस्थेचा हा साठलेला मळ अर्धवटं तुकड्या साठी पळ बहुजनां पाठी उमटला वळ प्रगतीचा बंद करतात हे नळ ©rajendrkumar bhosale डाव #ViratKohli
डाव #ViratKohli
read morepriyanka
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या आवडीचा खेळ आहे; मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ
खेळ #Quote
read moreSujata Chavan
sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan #खेळ#
Kunal Salve
सोडून मला तू खेळ नवीन मांडला अर्ध्यावर बाद मी मेळ ना माझा मला लागला आस होती एक मला खेळात मला तू परत आणशील पास घेऊन मला नव्यानं डाव पुन्हा मांडशील #खेळ
gauri kulkarni
(काल्पनिक) कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ
#मनाचा खेळ
read more