Find the Latest Status about बाबांची आठवण कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाबांची आठवण कविता.
राजाराम कंटे
सांगायला हवं का तुझं माझं नातं.......... विझणाऱ्या ज्योतिसाठी जशी झुरतेयं वातं...... तुझा स्पर्श होता मज मनी जागे प्रीती..... वळवाच्या सरीने जशी गंधाळते माती........ तुझ्या शब्दामृताची किती चाखावी गोडी.... जशी परीमलाकडे असे भ्रमराची ओढी.......... तुझी येता आठवण जीव होई कासावीस..... पूनव चांदण्याचा जसा चकोरा लागे ध्यास.... तुझा हात घेता हाती माझे तृप्त होते मन ..... चल जपून ठेवूया आठवाचं पिंपळपान....... @ राजाराम कंटे.... ©राजाराम कंटे कविता आठवण #clouds
कविता आठवण #clouds #मराठीकविता
read moreMachindra Dhanwate
आठवण पुर्वजांची विशाल साम्राज्याचे दर्शन घडवणारे खर्या अर्थाने ऊपेक्षित राहिले या देशाला देऊन सम्रुद्ध इतिहास हे मात्र झोपडी पाल करून राहिले एक एका दगडावरती प्राण ओतला कला आपली आजही जिवंत दिसते ज्यात तो कलाकार मात्र असुन शिल्पकार आज कुठेच दिसत नाही तो अस्तित्वात दगडाला देऊन सुरेख आकार तो निर्जीव दगडही आमच्यासी बोलतो हजारो वर्षानंतरही हा दगड कसा स्थिर स्थावर डौलाने आजही राहतो जरी बदलला पुस्तकातील इतिहास तरी ह्या दगडावरिल इतिहास मिटणार नाही हजारो वर्षानंतरही हा दगड देत राहिल विशाल चिरंतन सम्रुद्ध अस्तित्वाची ग्वाही राष्ट्र सर्व अभिमान बाळगतो पाहून कला आपल्या पूर्वजांनी घडवलेल्या लेणी शिल्पांची अरे कदर करा रे आपल्या रक्तातील गुणांची अभिमान आठवण असुद्या त्या आपल्या पूर्वजांची. *मच्छिंद्र धनवटे, औरंगाबाद.* कविता आठवण पुर्वजांची
कविता आठवण पुर्वजांची
read morepooja d
आज तुझी खूप आठवण येत आहे दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहत आहे, तुझे प्रत्येक बोल, तो आवाज कानात घुमतो आहे तुझ्या असण्याचा भास करून देत आहे, तू म्हणाला होतास,' नाही सोडून जाणार मला ' पण आज चक्क मलाच विसरला कस रे करमत आहे तुला तिथे मला तर क्षण जगणं अवघड झाले इथे वाट पाहीन मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंत हाच जन्म नाही तर पुढच्या सात जन्मापर्यंत #आठवण #विसरणं #उदास #प्रेम #कविता #मराठीकविता
Vinayak Mahajan
#आठवण #विरह #कविता vrinkle २७/७/२०१४
#आठवण #विरह #कविता vrinkle २७/७/२०१४ #poem #nojotophoto
read more