Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता आठवण.

Stories related to कविता आठवण

    LatestPopularVideo

राजाराम कंटे

कविता आठवण #clouds #मराठीकविता

read more
सांगायला हवं का 
     तुझं माझं नातं..........
       विझणाऱ्या ज्योतिसाठी
      जशी झुरतेयं वातं......
                          तुझा स्पर्श होता मज
                            मनी जागे प्रीती.....  
                             वळवाच्या सरीने जशी
                            गंधाळते माती........
तुझ्या शब्दामृताची 
     किती चाखावी गोडी....
जशी परीमलाकडे असे 
        भ्रमराची ओढी..........   
                             तुझी येता आठवण 
                                     जीव होई कासावीस.....
                                    पूनव चांदण्याचा जसा 
                                    चकोरा लागे ध्यास.... 
     तुझा हात घेता हाती
        माझे तृप्त होते मन .....
चल जपून ठेवूया
           आठवाचं पिंपळपान.......
                                          @ राजाराम कंटे....

©राजाराम कंटे कविता

आठवण

#clouds

Machindra Dhanwate

कविता आठवण पुर्वजांची

read more

आठवण पुर्वजांची

विशाल साम्राज्याचे दर्शन घडवणारे
खर्या अर्थाने ऊपेक्षित राहिले
या देशाला देऊन सम्रुद्ध इतिहास
हे मात्र झोपडी पाल करून राहिले

एक एका दगडावरती प्राण ओतला
कला आपली आजही जिवंत दिसते ज्यात
तो कलाकार मात्र असुन शिल्पकार
आज कुठेच दिसत नाही तो अस्तित्वात

दगडाला देऊन सुरेख आकार
तो निर्जीव दगडही आमच्यासी बोलतो
हजारो वर्षानंतरही हा दगड कसा
स्थिर स्थावर डौलाने आजही राहतो

जरी बदलला पुस्तकातील इतिहास तरी
ह्या दगडावरिल इतिहास मिटणार नाही
हजारो वर्षानंतरही हा दगड देत राहिल 
विशाल चिरंतन सम्रुद्ध अस्तित्वाची ग्वाही

राष्ट्र सर्व अभिमान बाळगतो पाहून कला
आपल्या पूर्वजांनी घडवलेल्या लेणी शिल्पांची
अरे कदर करा रे आपल्या रक्तातील गुणांची
अभिमान आठवण असुद्या त्या आपल्या पूर्वजांची.

*मच्छिंद्र धनवटे, औरंगाबाद.*
 कविता आठवण पुर्वजांची

shubham

माझी पहिली कविता आठवण

read more

Poonam deelip gosavi

Sushant Kharat

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण

read more
आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #Collab yqt #letters #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
माझ्यासाठी सर्वच कविता ह्या मला खूप प्रिय आहेत,पण माझी प्रिय पहिली कविता "आई" खूप मिस करतो आहे,खूप वर्ष झालेत लिहून म्हणून नक्की काय लिहिले होते हे ही आठवत नाहीये.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों..
कसे आहात??
आजचा विषय आहे
प्रिय माझी पहिली कविता..
#पहिलीकविता 
चला तर मग लिहुया.
#collab #yqt

pooja d

आज तुझी खूप आठवण येत आहे
दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहत आहे,

तुझे प्रत्येक बोल, तो आवाज कानात घुमतो आहे
तुझ्या असण्याचा भास करून देत आहे,

तू म्हणाला होतास,' नाही सोडून जाणार मला '
पण आज चक्क मलाच विसरला

कस रे करमत आहे तुला तिथे
मला तर क्षण जगणं अवघड झाले इथे

वाट पाहीन मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंत
हाच जन्म नाही तर पुढच्या सात जन्मापर्यंत



 #आठवण #विसरणं #उदास #प्रेम #कविता #मराठीकविता

Shabda Kimaya

# रमेश मैंद यांची आठवण ही कविता

read more

Shabda Kimaya

# रमेश मैंद यांची आठवण ही कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile