Find the Latest Status about जुन्या जुना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुन्या जुना.
roshan
नवलाई नवी पण गंध आहे जुना नाव माझे जिथे मी बसू का पुन्हा वर्ग मित्र सारे अनोळखे इथे झाले प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे? अलगत उतरतो त्या मी वर्गात जुन्या मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा स्वर्गात पुन्हा कविता नवी पण ताल आहे जुना होऊनि पुढे मी हि म्हणू का पुन्हा शब्द मात्र सारे इथे अनोळखे झाले प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे? चाळतो सर्व पाने त्या मी वर्गात जुन्या मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा स्वर्गात पुन्हा आठवेल तुलाही हि सोडशील जागा खंतावेल उद्या हा आजचा तुझा त्रागा तितक्यात जाग येते अंधार दूर होते प्रश्न मनी माझ्या मी इथे नव्हतो का रे? आठवतो सर्व रस्ते जायचे त्या वर्गात जुन्या मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा स्वर्गात पुन्हा रोशन देसाई 29।03।20 स्वर्ग आहे जुना
प्रकाश साळवी
तोच जुना रस्ता आता दिसतो गजबजलेला ना ती भयाण शांतता ना ती सुखद त्या वट वृक्षाची सावली ना कुणाची वाट पहायची जिथे कुणी चिट पाखरू पण फिरकत नव्हते ! आता भरून वाहतोय माणसांनी ! पण खरा माणूस तोच कुठेतरी हरवलाय ! शोधतोय माणूस याच रस्त्यावर जो येता जाता राम राम करणारा ! प्रेमाचे दोन शब्द विचारणारा ! आपला माणूस मायेने चौकशी करणारा ! तोच जुना रस्ता झालाय अनोळखी येथे आता कोणी कुणाला विचारत नाही जो तो फक्त आपल्याच विचारात मग्न असणारा ! तोच जुना रस्ता जिथे शपथा घेतल्या चोरून आलिंगने दिली घेतली प्रेमात आकंठ बुडालो तोच जुना रस्ता आता कुठेतरी हरवलाय !!! *** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ तोच जुना रस्ता !
पद्मवैखरी
माझी पहिली कविता जुन्या डायरीची पाने आज नकळतच मागे वळली आणि माझी पहिली कविता त्यातूनही कशी डोकावली क्षणभर कशी आठवणीतले आसवांची फुलेही तरळली उगाच तिच्या शब्दांवरती बोटे मग हळुवार फिरली मन तिचेही भरेना अन शब्द सुचेना मग मलाही तीच होती त्या क्षणाला अन् माझ्याच सोबतीलाही दुख-सुख कसे सर्व माझे वाटुनी तिनेच मग घेतले धैर्य या लेखणीत आज तिनेच नव्याने कसे पेरले पद्मा शब्दात खेळते फक्त आजही जणू तिच्याचमुळे मनातल्या वैखरीला वाचाही खरी आली पहिल्या कवितेमुळे ©पद्मवैखरी काही जुन्या आठवणी.... #Books