Find the Latest Status about कोणाला सांगू नका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणाला सांगू नका.
Vaibhav Thakre
प्रकाश साळवी
कसे सांगू !! काय करु मी तुला कसे सांगू माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू ** हे मनाचे ओझे झाले परी हलकें करूं कुणाला कसे सांगू ** दाही दिशांना आभाळ काळे संकटांत मी कुणाला कसें सांगू ** कालचे गंध फार लाचार होते आजचे काय असतील कसें सांगू ** शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या मी एकला भाग्यशाली कसे सांगू ** भिजले होते रान आसवांनी तुझ्या अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू ** पंख लावूनी उडायचे बेत होते छाटले तू पंख माझे कसे सांगू ** दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!
Vishvambhar dhavale
कसं सांगू देवा तुला भेटायला आली ती मला वाट बघुन निघून गेली गावा..... काय वाटलं असेल तिच्या मनाला आता सतत प्रश्न मला पडावा......! का तर तिला शब्द दिला होता पुण्यात आल्यावर काहीतरी बोलेल तुला. काय बोलणार होती आता याचा अंदाज कसा बांधावा......! स्टेशनवर तिला भेटायला यावा तर फोन लावायला जावा तर नेमका चोरांनी चोरून न्यावा नेमकी रेल्वे सुटावा.....! काय नशीब माझं देवा तिचा नंबर माझ्या कडे माझा नंबर नाहीं तिच्या कडे असाच एकाने मिळवुन दिला होता. तो पण माझ्या कडून हरवावा.......! कसं असतं प्रेमात पडल्यावर अस होत. रेल्वे गेली निघून काय बोलायचं होतं गेलं राहून आत्ता भावा....! तुम्हीच सांगा काय असेल तिच्या मनांत दडलेलं......! कसं सांगू
Arun Vighne
Vaibhav Masirkar
मित्र कोणाला म्हणायचे ? सुख , दुःखात सहभागी असणारा, सदैव मदतीसाठी तत्पर असणारा , आणि आपले दुःख जाणणारा , हाच तो मित्र असतो... मित्र कोणाला म्हणायचे ? भांडण करूनही सोबत राहणारा, वेळोवेळी दुःख हरण करणारा, समजूत काढणारा, चुका लक्षात आणून देणारा आणि त्या चुका सुधारण्यासाठी प्रेरित करणारा, हाच तो मित्र असतो..... मित्र कोणाला म्हणायचे ? आपल्यातील दुर्गुण सारणारा, सुगुन जोपासणारा , धेय्य वेढा करणारा, कलागुणांना वाव देणारा , हाच तो मित्र असतो.... मित्र कोणाला म्हणायचे ? न बोलताही मन जाणणारा, तो सामोरे बघितल्यास स्मितहास्य करणारा , जीवापाड प्रेम करणारा, सर्व संकटांना, अन्यायांना तोंड देणारा, हाच तो मित्र असतो... _ Vaibhav Masirkar मित्र कोणाला म्हणायचे ?
शितल(गार्गी)
कसं सांगू तुला माझ्या मनातल्या भावना, कधी उमजेल तुला माहित नाही मला, मनातल्या एका कोपऱ्यात सतत तुझी आठवण असते, त्या कोपऱ्यात मात्र अंधाराचे दाट सावट असते, विखुरलेल्या आठवणी नाकोश्या ही वाटतात कधीकधी, विचार केल्यावर कळते आठवणीं शिवाय आहे काय माझ्याकडे, खूपदा प्रयत्न करतो हे मनातून काढण्याचा, पण मन मात्र रस्ता विसरत नाही त्या आठवणीं कडे जाण्याचा, चेहऱ्यावर हसू, डोळयात सारे दाटवून, मनाला पुन्हा समजावे लागते पुन्हा सारे विसरून.... कसं सांगू तुला...