Nojoto: Largest Storytelling Platform

New आई माझी मायेचा सागर मराठी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई माझी मायेचा सागर मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई माझी मायेचा सागर मराठी कविता.

    PopularLatestVideo

vaishnavi atkare

आई मायेचा सागर### #poem

read more
दिवस कसे हे सरून गेले
कळत मला नाही
पण माय माझी
तिळभर सुद्धा आटली नाही

कितीक झाले त्याग तिचे
मोजणी त्याची नाही
मला वाटते त्यागाला तिच्या 
जगात उपमा नाही

वैष्णवी अतकरे आई मायेचा सागर###

सौ.अलका माईणकर

#मराठी कवितामाझी कविता

read more
mute video

सौ.अलका माईणकर

#अथांग सागरमाझी कविता#

read more
mute video

Siddhesh Bendre

आई ( माझी कविता ) #raindrops

read more
आई जणू आभाळातील शुक्र तारा, 
सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! 

आई म्हणजे चहातील गोड साखर, 
आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! 

 आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, 
 आई म्हणजे मायेचं हळवं  मन ! 

 किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, 
 अष्‍टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! 

 मिठाईतला पाक म्हणजे आई, 
 प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई  ! 

 अंधारातील प्रकाश म्हणजे आई, 
 नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! 

 चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, 
 दहा हत्तींचे बळ म्हणजे आई !

 आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, 
 अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! 

 अशा या आईची राहो  सर्वांवरती माया,
हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! 
              -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता )

#raindrops

Priyanka Meshram

बहीण...म्हणजे मायेचा सागर #जीवनअनुभव

read more
mute video

pournima sadavarte

# माझी आई ,माझी माऊली,💖 कविता☺️ #MothersDay2021

read more
"आ" म्हणजे "आत्मा"....
"ई" म्हणजे "ईश्वर'......
त्यातुन निर्माण झाली आई।।
देवाची ही साऊली....
तुच माझी माऊली......
तुच माझी प्रेरणा ...
तुच माझी श्रद्धा .....
विश्वास रूप तुच अनंत....
किती ग सोसल्यास तु यातना ....
बसले हातास चटके.....
घेतले तरी स्वतः वर संकटे....
तुच माझी माऊली ...
तुच माझी साऊली....
भीती नसते ,जगाची तु
चालती जेव्हा सोबती.....
माझी आई माझीच प्रेमळ माऊली"....।।

©pournima sadavarte # माझी आई ,माझी माऊली,💖
कविता☺️

#MothersDay2021

nisha Kharatshinde

माझी मराठी #Poetry

read more
माझी मराठी

अमृतात न्हाऊन ‌शृंगारली ती
लपेटून संस्कार माझी मराठी
इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी
मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी
कधी काळजाला ‌कधी माणसाला
मना स्पर्शते  तीच माझी मराठी
इथे राहतो वाघ गर्भांतरी या
गर्जे म्हणूनी माझी मराठी

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde माझी मराठी

Vilas Bhoir

माझी मराठी

read more
माझ्या मराठी भाषेची
किती वर्णावी महती
काना मात्रा वेलांटीने
येते शब्दांनाही गती

शब्द शब्द गुंफुनिया
माझी मराठी सजते
काव्यमय होऊनिया  
ओवी जात्यावर दंगते

बोलण्यात कधी गोड
कधी असे धारदार 
लेखनात मराठी माझी 
पहा भासे टोकदार

माझ्या मराठीची चव
घ्यावी थोडी थोडी 
मधावाणी गोड आहे 
माझ्या भाषेतील गोडी

माझ्या मराठीचा छंद 
मज लावितसे लळा
मराठी माझी आई 
अन् मायेचा जिव्हाळा

                                           ~ विलास भोईर
                                           ( माझी मराठी )

©Vilas Bhoir माझी मराठी

Ramdas Narwade

मायेचा डोंगर 

कोण्या त्रासनं त्रासनं..माय ग्रासली  ग्रासली
कोण्या प्रेमानं प्रेमानं..माय डोंगर चढली ||धृ ||

माझ्या मायेची हो महती 
तेथी देव ही नाहती 
दुःखं स्वतः हो भोगूनि 
सुखं जगाला या देती 
घराघरात घरात..प्रेम माया हो भरली 
त्या प्रेमाची प्रेमाची..चव आम्ही हो चाखली 
कोण्या प्रेमानं प्रेमानं..माय दाटून भरली||1||

ह्या मायेची पाखरं 
उडती आकाशी भरभरं 
त्यांच्या तेजाचा उजेड 
करती अंधार हो दूर 
या पाखरांना पाखरांना..पंख मायेनी लावली 
का ही लेकरं लेकरं.. आज मायेला विसरली 
त्यांच्या बुद्धीची बुद्धीची..का मती हो खुंटली
कोण्या क्रोधानं क्रोधानं..माय रागीट जाहली 
कोण्या जोरानं जोरानं..माय पेटून उठली 
कोण्या न्यायाला न्यायाला..माय कसून लढली ||2||

किती मायेच्या ह्या दशा 
सांगू तुम्हा हो कशा 
हिरव्या पिकाच्या त्या मुळ्या 
उनाड जमिनी रुतल्या 
जरी मायेचा सागर 
पाण्याने हो भरला 
तिच्या हृदयाचा किनारा
तहानलेला हो राहिला 
तरी आसू दुःखाचा दुःखाचा..तिने हसरा हो बनविला 
तिच्या भावनेचा भावनेचा..का हा दसरा हो चालला 
आज या किनाऱ्याला किनाऱ्याला..गरज लाटेची भासली 
कोण्या तान्हेने तान्हेने..माय कासली कासली  ||3||

माझी माय हो माऊली 
उभ्या जगाची साऊली 
तिच्या विना हो येथी 
नाही कोणीच हो सुखी 
या दिन दुःखितांची  दुःखितांची..तिने पिढा हो हारली 
कोण्या तेजानं तेजानं..माय जागली जागली 
कोण्या त्यागानं त्यागानं..माय समृद्ध ठरली ||4||

कोण्या त्रासनं त्रासनं..माय ग्रासली  ग्रासली..
कोण्या प्रेमानं प्रेमानं..माय डोंगर चढली..

®रामदास नरवाडे पाटील #MothersDay #Mother #आई #कविता #मराठी #India

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile