Find the Latest Status about पावसाळा मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाळा मराठी.
संतोष विजय उईके
■ पावसाळा दावून पाठ पळतो बापास पावसाळा पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..! झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..! दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..! शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..! देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या.. मग मारतो दडी का हमखास पावसाळा..! दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला करतो असा तसाही उपहास पावसाळा..! आहेस तूच त्याचा आधार पावसा रे देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..! ©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा
Deepak Kambli
लाटा उधाणल्या या गेल्या वरी अशा त्या आल्या धरेवरी मग जिंकून या जगाला - डिके लाटा#पावसाळा
लाटापावसाळा #poem
read moreits.vedee
शाळा नी पावसाळा Combination च किती भारी वाटतं ना पावसाळ्यात शाळेत जायचं खास कारण म्हणजे नवीन छत्री आणि नवीन रेनकोट घालायला भेटायचं😁..आणि त्याहून खास म्हणजे शाळेची अर्धी सुट्टी व्हायची ज्याने आपल्या सवंगडीला ही भेटायला मिलायचं आणि शाळेचा कंटाळा ही नाही यायचा.. 😄 कधी पाऊस आला तर वर्गात सरांना "सर पाणी येतंय,खिडक्या बंद करू का??"😂 अस म्हणत खेळायच्या मैदानावर भिजण्याची मज्जाच वेगळी😁😌 ते दिवस च किती भारी होते जेव्हा शाळा सुटायचा वेळेला नेमकी पाऊस यायचा आणि कोणाकडे छत्री नसली की एकाच छत्रीतून दोघं तिघं जायचो आणि जर चुकून जोराचा मग तर मज्जाच मज्जा.. 🤦🏻♀️😂 आपल्या मित्रांसोबत मज्जा मस्ती ..अगदी धम्माल!! आयुष्य किती सोप्पं असायचं! भेटतील का पुन्हा ते दिवस??🥺 येईल का ती मज्जा पुन्हा??🥰 खरच पुन्हा एकदा ते क्षण जगता आले तर..🤞❤️ ©Vedanti Nimbre शाळा आणि पावसाळा
शाळा आणि पावसाळा
read moreumesh prakash salunke
आला आला पावसाळा ढगाळ वातावरण लागले होईला रस्त्याला पाणी लागले जमायला लोकं लागले आनंदाने भिजायला....! शेतकरी मनातून लागला हसायला पेरणीची तयारी लागला करायला सुजलाम सुफलाम लागला बघायला....! गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला वादळं वारा बसलाय फटका देईला....! सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला सगळे लागले डागडुजी घेतली बुजवायला.....! आपल्या अंगणात एक झाडं घ्या लावायला उदयाची सावली नको वाटती का कुणाला फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....! शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला रेनकोट छत्री चाललोय आणायला पावसामुळे आजारी नको पडायला आला आला पावसाळा कधीं संपला उन्हाळा सुरू झाला पावसाळा.....! आला आला पावसाळा.....
आला आला पावसाळा.....
read morePratik Patil Patu
पावसाळा.. येता पावसाचे ढग मिळे धरणीला सावली, मयूर नृत्य करतो गातो गोड केकवली. येता पावसाच्या धारा संगे येतो गार वारा, होते नवनिर्मिती निसर्गात- श्रावणात. पूर्ण निसर्ग स्वच्छ होतो मातीलाही सुगंध येतो, ओल्या मातीचा सुगंध मन प्रफुल्लीत करतो. होते पेरणी रानात नव्या पालव्या येतात, हिरवगार राणा दिसत होतो आनंद मनात. दुष्काळ संपून जातो पाण्याचा वर्षाव होतो, पाण्याचे महत्व सुद्धा पाऊस सांगून जातो.. पावसाळा.. #yqtaai #पाऊस #पावसाळा0618
पावसाळा.. #yqtaai #पाऊस #पावसाळा0618
read moreumesh prakash salunke
आला आला पावसाळा काळे ढंग लागले रडायला रस्त्याला पाणी लागले जमायला लोकं लागले आनंदाने भिजायला....! शेतकरी मनातून लागला हसायला पेरणीची तयारी लागला करायला सुजलाम सुफलाम लागला बघायला....! गावांत नदी नाले घेतले गाळ काढायला पुराचं पाणी नको कुणाच्या घरात शिरायला वादळं वारा फटका बसलाय देईला....! सगळयांनी पावसाची कामे घेतली करायला दुकानदारांनी दाडपत्री आणली विकायला सगळे लोकानीं डागडुजी घेतली बुजवायला.....! आपल्या आजूबाजूला एक झाडं घ्या लावायला उदयाची सावली नको वाटती का कुणाला फळं येतील झाडाला दुसरे घेऊन जातील स्वतःला....! शाळेच्या मुलांची तयारी घेतली करायला रेनकोट छत्री बाजारात निघालो आणायला पावसामुळे आजारी नको वाटतं पडायला..... आला आला पावसाळा कधीं संपला उन्हाळा सुरू झाला पावसाळा.....! उमेश साळुंके पिंपरी गावं १९/०६/२०२० #solace आला आला पावसाळा
#solace आला आला पावसाळा
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी