Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi kavita Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kavita.

Stories related to marathi kavita

    LatestPopularVideo

Varpe Pandhari

#.... marathi kavita

read more
✍️✍️काहीतरी लिहावंसं वाटलं....✍️✍️

खूप काही लिहायचं होतं
पण नेमका विषयचं सापडेना,
शांत मिटले नयन तरी
डोळ्यासमोरील काळोख हटेना.
उदास , बेचैन , एकट मन
असंख्य विचारांच्या जाळ्यात अडकलं,
कितीतरी दिवसांनी आज
काहीतरी लिहासवं वाटलं....😊

कोणावर ? कश्यासाठी ?आणि का लिहू ?
याचंच प्रशचिन्ह समोर दिसत होतं,
पण काहीतरी नवीनच लिहू
अस मात्र सारखं वाटायचं.
घेतला कागद काढली लेखणी
अक्षरांनीही शब्दांचं घर गाठलं,
का ? कुणास ठाऊक ? पण 
आज काहीतरी लिहासवं वाटलं....😊

क्षणिक सुखावर की 
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या दुःखावर लिहावं,
हरवलेल्या माणसातल्या माणुसकीपणावर की
पिसाळलेल्या जनावारांकडं पाहावं.
प्रेम , मैत्री ,कुटुंब की आणखी काही
अनेक विचारांचं घरटं मनी साठलं ,
विषयांच्या चक्रव्यूहात अडकलो खरा
पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं....😊

अबोल मनाचे झाकलेले दरवाजे
कधीतरी उघडावेचं लागतील,
समजुतीनेचं शब्दांनी शब्द मांडावे
तेच काहीतरी मार्ग दाखवतील.
झाडांचं दुःख मांडाव तर
आत्महतेने शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं,
कुठून तरी सुरवात व्हावी
म्हणून आज काहीतरी लिहावंसं वाटलं....😊

फक्त लिहीत चाललो होतो
कशावर लिहतो कळतंच नव्हतं ,
मनातील भावना आणि पेनाच्या शाईने
कागदावर मात्र कवितेचं ठसं उमटलं .
वाटलं होतं मनाचं ओझं कवितेद्वारे हलके करू
पण मनी विषयाचं बारीक धुकं दाटलं,
काही खास तर लिहलं नव्हतं
पण काहीतरी लिहल्याचं समाधान मात्र मनी दिसत होतं..☺️
                                       Pandhari Varpe
                                          8698361992

©Varpe Pandhari #.... marathi kavita

shailesh bade

Marathi Kavita #मराठीकविता

read more
नभ दाटून आले 
मोसमी वारे वाहिले
वसंताचे पान सरले 
मेघ ऋतु चे आगमन  झाले 

रिमझिम सरीत भिजले
अंगणी मोर नाचु लागले
चातकाचे प्राण सुखावले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

थेंबा थेंबातुन भिजले
गंध मातीचे दरवळून गेले
इंद्रधनू नभात दाटले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

बीज अंकुर पेरले
ओल्या मातीच्या कुशीत रुजले
हिरव्या शालूत सजले
मेघ ऋतु चे आगमन झाले

©shailesh bade Marathi Kavita

prem patil

।।।। रंग नव्या प्रेमाचा।।।।
रंग नव्या प्रेमाचा तिच्या हातावर रचत आहे....
विसरून जुने पुरण्या गोष्टी सुरुवात नवी होत आहे.....
हसणं त्या गालावरच आता हळुवार मिटत आहे....
प्रत्येक गोष्ट तिची आता आठवण होत आहे....
फुलणं त्या पाकळीचं आता कोमजलं आहे....
स्पर्श तिचा आता नुसताच भास होत आहे.....
तिने पाहिलेल्या स्वप्नांचं रान आता पेटत आहे.....
अंधारलेल्या हृदयात तिच्या आता मन तीच निजत आहे....
आयुष्य तीच आता फक्त सुख दुःख मोजत आहे....
बोलणं तिच्या नजरेचं आता अबोल होत आहे...
रुजणं त्या अंकुराच गर्भात तिच्या आता जगणं तिच होत आहे....
सोडलेल्या गर्दीत नातं ते माझं आता गुदमरत आहे.... #marathi #kavita

shailesh bade

Marathi Kavita #मराठीकविता

read more
मैत्री

जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव
चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव

नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव
चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव

भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव
उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा

वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव
मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव

लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव
लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा

येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव
राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव

©shailesh bade Marathi Kavita

AC

marathi kavita

read more

प्रशिक लखमापूरकर

Marathi kavita

read more
युगांत  
अस्थितवाच्या किनाऱ्यावर उगवतो असा सूर्य ...!
गांभीर्याचें प्रतीक नसलेला आणि आणि मानवांची हेटाळणी करणारा...!
विसरून जातो तो जात , धर्म , पंथ ,भाषा , प्रांत ...! 
आणि मिटवायला निघतो 
संस्कृती , परंपरा आणि मानवी अस्थित्व ...!
संघर्षाची मशाल चेतविली तर सरसावतात...!!    
आणि निपचित पडल्या तर होतो युगांत...
--  प्रशिक सोनवणे Marathi kavita

Amol Wakure

Marathi Kavita

read more

Pooja Chahande

marathi kavita # marathi kavita..#nojota..#Prem #Love #MainAgarKahu #कविता

read more

worldofpoetry__

कधी कधी काही गोष्टींच्या अस्पष्टतेतही 
एक अनोखं सौंदर्य दडलेलं असतं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #poem #marathi #kavita

sachin

जगणे उद्याचे आपले
फार उधार आहे
हा मोह लाभ कसला
जाण्यास भाग आहे
देह हा नाशिवंत
प्राणातूनी अपार 
शोधू कुठे मी स्वतःला
अस्तित्व  कुणाचे आहे
जगणे आजचे आपले 
सत्यास साथ आहे!!!!

©sachin marathi kavita

#BookLife
loader
Home
Explore
Events
Notification
Profile