Find the Latest Status about मराठी लावणी गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी लावणी गीत.
Sandeep A More
लावणी... *घायाळ मी...* ना माणुसकी इथे मवळ सुखाची ही भुरळ दारिद्रयाचे हे दुःख जवळ वेदनेची कवळ चटक्यांचे फोड फुटले नाचून घायाळ मी झाले..।।धृ।। हा सुना दरबार भावनांचा आधार अश्रूचं हे उदार सोसती मनी भार जिवनी ना कोडे सुटले नाचून घायाळ मी झाले..।।१।। स्वप्न हे पायंदळी आहुती वेळोवेळी देह माझा हा जळी करपे जशी पोळी अश्रूही हे टपटपले नाचून घायाळ मी झाले..।।२।। रक्त मंची सांडले सुख मृदी गाडले आयुष्य ही रूसले नाटक हे संपले ताल कानी गुणगुणले नाचून घायाळ मी झाले..।।३।। -संदीप मोरे, नाशिक आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी... #करूणरस #लावणी #मराठी
vaishali
जीवन गीत येती जाती संकटे धैर्याने सामोरे जावे किती असो दुःख जीवनी हसत हसत जगावे आठवणींना ठेवुनी मनात नवे सूर शोधावे झाले गेले विसरुनी आपण पुढे पुढे चालावे एकमेका साथ देऊनी माणुसकीने वागावे नवी नवी स्वप्न सजवुनी जीवन गीत गातच रहावे -------------------------- जीवन गीत#मराठी कविता#
Rajendrakumar Shelke
*मोहरली लेखणी साहित्य समुह आयोजित लावणी कार्यशाळा उपक्रम* *विषय:-घुंगरू* ********************************************************** वयात आली, अंगानं भरली,उपवर मी झाली, अंगापिंडान भरली काया, मुखावर पांगली लाली.!!धृ!! नाजूक पायी चाळ बांधले,थिरकत आले जवळी, प्रितीत घेऊन गोंजरा राया,भरल्या कातरवेळी घालवू नका वेळ,आता सांज बघा झाली.!!१!! अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली..।।१।। चला सोबतीने जाऊ,ठसक्यात लावणी गाऊ, घुंगराची सारी माया,मनात भरून पाहू आस तुमच्या संगतीची लागली!!२!! अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली. थयथय करता घुंगरू वाजे,शब्दांच्या तालात काळजाचा ठाव वाया जाई,मन वेडे घुंगराच्या नादात सख्या मला तुमची भुरळ ही पडली!!३!! अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली....! ------------------------------------------------------ *✍️ प्रा.राजेंद्रकुमार शेळके* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke लावणी #feellove