Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेम_हे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेम_हे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#प्रित तुझी माझी..
प्रित तुझी माझी सख्या फुलापरी फुलावी
प्रितित तुझ्या मी दुनिया सारी भुलावी 
अनमोल प्रित तुझी मनास माझ्या भाळली
कळले ना मज कशी कधी ही अतुट बंधसरीता जुळली 
मनी भास सदा तुझा डोळ्यात माझिया तुझेच रुप साठले
कोणता अल्लड अवखळ हा किनारा
वादळ हे कोणते माझ्या मनी उठले 
घे सावरून मजला सख्या तु माझा तोल जाण्याआधी
नको वादळात ह्या सोडु मज एकटीला कधी 
विश्वासाने मी तुझ्यात माझ्या
जीवाचं सप्तरंगी इंद्रधनू ओतलं
सात जन्मासाठी मी माझं पाऊल
तुझिया साथीनं बोहल्यावर टाकलं....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #प्रेम_हे

शब्दवेडा किशोर

प्रेमात वाद नाही संवाद असावा प्रत्येक क्षणांचा सुखआस्वाद अन् राग नाही अनुराग असावा..एकमेकांसाठी जीव देण नसावं तर एकमेकांना जीव लावणं असावं..एकमेकां विषयी नेहमी आदर असावा एकमेकांच्या बाबतीत सन्मान असावा अन् मी व माझं असं काही नसावं आपण व आपलं हे असावं....
असं म्हणतात की घर - प्रॉपर्टी व चांगल्या पगाराची नोकरी असलेला मुलगा जर कोणत्याही मुलीला मिळाला तर तिचं आयुष्य खूप सुखद होईल व तसं हे योग्यच पण सर्व सुख असून कणभरही प्रेम जर तो मुलगा तिला देऊ शकला नाही तर अशा सुखद आयुष्याला काय बरं अर्थ आहे....?? आता हेच पहा ना कृष्णासाठी राधाही रडली अन् मीरा म्हणजे रूक्मिणीही रडली पण दोघींनीही त्याच्यावर सारखंच प्रेम केलं ना..??
प्रेम आंधळंही नसावं व स्वार्थीपणाही नसावा..
प्रेम म्हणजे नक्की आहे तरी काय..??
एकमेकांची ओढ की फक्त मोकळ्या वेळातला टाइमपास..
प्रेम म्हणजे नक्की आहे तरी काय ??
एकमेकांची असलेली ओढ की फक्त शारीरिक आकर्षण..
अनेक प्रश्नचिन्ह आहेत ना..
माझ्याकडून तर ही अनेक प्रश्नचिन्ह मिटेना..
तुमच्याकडून मिटले तर मलाही सांगा..
मी तुमचा शब्दवेडा किशोर वाट बघतोय तुमच्या उत्तराची..
नक्की माझी प्रश्न मिटण्यासाठी मला मदत करा.

©शब्दवेडा किशोर #प्रेम_हे

yogesh atmaram ambawale

प्रेम आंधळे असते,जग नसते.. #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर प्रेम करणारे प्रेमी ते.. म्हणे प्रेम आंधळे असते. उनाड फिरतात हातात हात टाकून... विसरतात जग हे आंधळे नसते.

read more
प्रेम करणारे प्रेमी ते..
म्हणे प्रेम आंधळे असते.
उनाड फिरतात हातात हात टाकून...
विसरतात जग हे आंधळे नसते. प्रेम आंधळे असते,जग नसते..
#yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर 
प्रेम करणारे प्रेमी ते..
म्हणे प्रेम आंधळे असते.
उनाड फिरतात हातात हात टाकून...
विसरतात जग हे आंधळे नसते.

शब्दवेडा किशोर

अबोल तु अस्वस्थ मी
भाव तु मौन मी
विद्या तु वैभव मी
प्रेम तु पारिजातक मी
सुर तु लय मी
गीत तु ताल मी
अक्षर तु शब्द मी
साधना तु संपदा मी
प्रीत तु रीत मी
अक्षदा तु आयुष्य मी
श्वास तु साद मी
समोर तु आनंदी मी
साथ तु पाऊल मी
सोबत तु संपूर्ण मी

©शब्दवेडा किशोर #प्रेम_हे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile