Find the Best बालपण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबालपण quotes, बालपणीचा काळ सुखाचा मराठी कविता, रम्य ते बालपण कविता, हरवलेले बालपण कविता, बालपणीच्या आठवणी कविता,
अदनासा-
hemlata mandle
बचपन क़ी वों ख़्वाईशे आज़ भी , ख़त लिखतीं हैं हमें....! शायद बेख़बर हैं , इस बात सें क़ि , वों ज़िन्दग़ी अब ईस , पतें पऱ नहीं रहतीं....! 😊😊 ©hemlata mandle #snowfall #बालपण #बालपणमाझे #friendsforever #friend❤
#snowfall #बालपण #बालपणमाझे #friendsforever friend❤
read moreHarsh
रम्य ते बालपण कधी इकडे कधी तिकडे भिरभिरणारे मन, कधी दुखी कधी आनंदी कधी मजेचे क्षण. असंच लहानपण आज येऊन गेल मनात, रमून गेलो कसं आलंच नाही ध्यानात. रम्य ते बालपण रम्य त्या आठवणी, सुंदर माझं गाव येऊन गेल मनी. लहानपणीचे विविध खेळ मोकळा असायचा वेळ, कोणी बनायचं धोनी,कोणी बनायचं गेल. खेळायचो क्रिकेट,लगोरी,विटीदांडू, लोक म्हणायचे पोरांनो नका तुम्ही भांडू. कधी जायचो जांभळांना, कधी जायचो बोरांना, काजू-आंबे भरपूर आवडत असत पोरांना. जिथे असायची धमाल मस्ती ती आमची शाळा, खेळ असो अभ्यास सगळे व्हायचो गोळा. मुलगा-मुलगी,धर्म -जात नव्हता भेदभाव. शाळेतील गुणी मुले म्हणत असायचं गाव. टायर चालवणे,पोहायला जाणे नेहमीचेच आमचे उद्योग, गोटया खेळणे, पत्ते खेळण्याचा होता वेगळाच रोग. कधी जायची सहल कधी वनभोजन, वाट पाहायचो आम्ही कधी येतात सण. आता मात्र चित्र बदललं आहे सारं, लोकांच्या कानात शिरलंय पैशाच वारं. आता मात्र कोणाकडे राहिला नाही वेळ, लहानमुले गेम्समुळे विसरलेत आता खेळ. असे होते माझे रम्य ते बालपण, पुन्हा-पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन. - हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #childhood #childhood_memories #बालपण #Life_experience
kavi Dhananjay (dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. जबाबदारी चे ओझे बालपण हिरावून घेते.... ©Dhananjay(dhanuj) Sankpal #बालपण #धनूज #शायरी
kavi Dhananjay (dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. ~बालपण~ बालपण ना जाणे कोठे हरवले कोठे हरवली ती शाळा.. चिखला-मातीतल ते आयुष्य हरवला तो रानमाळा.. इवल्याशा पावलांनी आसमंत होता वेचला.. खळखळ वाजत होता पायामध्ये वाळा.. छोट्या-छोट्या हाता-पायांची धडपड आता ओसरली, हलवलेल्या पत्रांचा खेळ अन् आईच्या पदरांचा ठेवा.. जबाबदरीच्या साखळीचा जमला कसा घेरा, भातुकलीच्या खेळामधला हरवला रानमेवा, बालपण ना जाणे कोठे हरवले कोठे हरवली ती शाळा, चिखला-मातीतल ते आयुष्य हरवला तो रानमाळा, -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #बालपण
अश्लेष माडे (प्रीत कवी )
आधी कोणत्याही गावाला जायचं म्हंटल की, एक वेगळीच उत्सुकता असायची, ते मामाच असो किंवा मावशी च की, इतर कोणत्याही नातेवाईकाच्या गावाला असो. आणि त्यावर बऱ्याच कविता बालगीत तयार झाले. कारण, त्यावेळेसच्या सुट्ट्या घालवायला वेगळीच मज्जा यायची. जी आता कुठेतरी हरवली आहे. कारण, आता सगळे खूप व्यस्त झाले आहेत. आणि वेळ मिळालं तरी मोबाईल, टीव्ही मध्ये व्यस्त असतात. आणि ह्या विज्ञानयुगी जगात कुठंतरी बालपण आणि मोकळीक हरवली आहे. आता तर असंच म्हणावं लागेल -विडिओ कॉलिंग लावूया, मामाच्या गावाला पाहूया... कारण आताची हीच खरी बाब आहे. एकट-एकट राहून मुलांना नैराश्य येते. आणि ते एकलकोंडे होतात. हरवलं ते बालपण आणि आणि हरवली ती माणसे. आता फक्त रोबोट उरले. बरोबर ना.. (प्रीत ) हरवलं ते बालपण
हरवलं ते बालपण
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited