Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वप्नात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वप्नात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

टाळलं दिवसभर तिला
घ्यायची नव्हती तिची भेट।
ती पण जिद्दी भेटण्यासाठी
रात्री स्वप्नातचं आली थेट। #yqtaai #yqmarathi #भेट #थेट #स्वप्नात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे स्वप्नात जे पाहिले सारे... #स्वप्नात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट मध्ये कळवा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मी स्वप्नात जे पाहिले सारे,
इच्छा एकच स्वप्न व्हावे ते खरे.
ना कुठे लुटपाट ना कुठे अत्याचार,
स्वच्छता अभियानाचा ज्यास मिळाला पुरस्कार.
नेहमीच नवनवीन घडवित असतात  अविष्कार,
असे महाराष्ट्र राज्य माझे,ह्याचा मला अभिमान फार.
सर्वांनी ठरविले तरच होईल हे खरे
मी स्वप्नात जे पाहिले सारे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे 
स्वप्नात जे पाहिले सारे...
#स्वप्नात 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
तुमचे विषय कमेंट मध्ये कळवा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखिकानों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काल स्वप्नात... #काल #स्वप्नात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine #collabwithme #काल्पनिक

read more
काल जे स्वप्नात पाहिले
ते सत्यात उतरवायचे आहे..
मी काय चीज आहे ते
साऱ्या जगाला दाखवायचे आहे.. सुप्रभात लेखक आणि लेखिकानों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काल स्वप्नात...
#काल #स्वप्नात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

Suyash Ananda Gulig

स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात #मराठीकविता

read more
स्वप्न-पिपासु

कसा आहेस ? कुठे आहेस ?
स्वप्नात.
 
भरदिवसा काय करतोस स्वप्नात ?
स्वप्नात रात्र असते
रात्री मी झोपेत
झोपेत मी स्वप्नात असतो,

स्वप्नात दिवसा मी स्वप्न बघत असतो
स्वप्नात रात्र असते 
आणि रात्री बसलेलो असतो मी
चांदण्याच्या सावलीत विचार करत;

कश्याचा ?
तोच नक्की कसा आहे मी ?-सुयश;

©Suyash Ananda Gulig स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात

संतोष गव्हले

bapu #कविता

read more
बापू
        
काल माझ्या स्वप्नात बापू आले
हळूच मला गोंजारले
लाडाने माझ्या टपलीत मारले
तसा मीही ताडकन उठलो
बापूंना पुढ्यात पाहून दचकलो
क्षणात त्यांच्या चरणी नतमस्तक झालो
मला बापू दिसले...
आमची चिंता असलेले, तरीही थकलेले
भिंतीवरील त्यांच्या फोटोकडे ते पाहत राहिले
मनातल्या मनात हसत राहिले..
बापूंचा चेहरा सुकलेला दिसला
आमच्या दुःखाचा त्यावर जणू डोंगर दाटला
त्यांचा चष्माही आता काळवंडला
आणि आमचे 'खरे' चेहरे ओळखण्यास फसला
आणि हे काय ,बापूंच्या हातात काठी दिसली
पण मळकट, आणि पूर्ण थकलेली
आम्हाला सरळ करता करता स्वतःच  वाकली
बापूला तिने सत्य मार्ग दाखवला
आम्ही त्या काठीने सत्याचा गळा घोटला
बापूंचा पंचा ही पार झिजला
गोळामोळा झाला , धागा धागा विरला
त्यातला शुभ्र पांढरा रंग तर कधीच उडाला
त्यावर आम्ही आता काळा रंग फासला
आता मीही क्षणभर बावरलो
श्वास रोखून पाहू लागलो
मनातच  बापूला शोधू लागलो
खरे बापू कोणते?? 
आपण नोटांमध्ये बंद केलेले
भिंतीवर धूळ खात पडलेले
पुस्तकांच्या पानात हरवलेले की आता स्वप्नात आलेले... bapu


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile