Find the Best आईवडील Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआईवडील कविता, आई वडील समासाचे नाव, आई वडील आठवण, आई वडील गुरू, आई वडील काळजी,
Shankar Kamble
बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा ©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम
Rashmi Hule
आईवडील जे सांगायचे ते तेव्हा पटत नसले तरी वय वाढते तसे अनुभवास येते मग त्याच गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगतो...आणी ते मुलांना पटतेच असे नाही... जब माँ-बाप कुछ कहते हैतब नहीं समझता लेकिन बढती उम्र के साथ अनुभव होता है. फिर वो बाते बच्चों को कहते हैं. और बच्चे नहीं समझते #आईवडील #मुले #yqtaa#yqbaba #yqdidi #bestmarathiquote
Shankar Kamble
*गोधडी* .... *सुखं_दुःखाची ठिगळं* *कर्म बंधनाचा धागा* *माय गोधडी सांधते* *उब मिळो साऱ्या जगा..* *एका एका चिंधीमधी* *आठवणींचा फुलोरा* *हात फिरता अलवार* *लख्ख दर्पण सामोरा..* *आज पावलो पावली* *उन्हं सलतं विखारी* *उबदार गोधडीची* *वीण जुळते अंतरी..* *खोल मनाच्या कुपीत* *भाव पोरका तरतो* *गोधडीला बिलगून* *डोळां श्रावण झरतो..* *माय तुझ्याच कुशीचा* *भांबावल्या जीवां आंस* *किती हंबरं वासरू* *आता नुसताच भास..* *तुझं स्नेह पांघरून* *गोधडीचं हे चांदणं* *काट्या _कुटेरी जगात* *मऊ मखमली शिंपण..* ©Shankar Kamble #गोधडी #उब #आई #प्रेम #आईवडील #पांघरून #लेकरू # #maa
Shankar kamble
देशील का देवा माझी आई परत…? दाटला उरी हुंदका डोळ्यात पाणी साठले स्वार्थपरायण दुनियेत या असें कोण आपुलें? मायेची ओल संपली ओसाड रंग फाकला अंगणीची तुळस सुकली देव देव्हाऱ्यातूनी निघाला तुझंवीण माय आता जगावे तरी कसें? स्नेहाचे उमटलेले कसें पुसावे ठसे? येता कुशीत तुझिया आश्वस्त जीव होता चुकलेल्या वासराया वाट दावी कोण आता? चिंता भार माझा आज कोण तो वाहतो? प्रकाशण्या मजं नितं काजव्यासम जागतो न बोलताही भाव माझें अंतरीयां तुझीयां ठावें नितं स्मरावे माय तुजला मी रोज रोज गावे कोसतो मी स्वतःला कमनशिबी असा अभागा उबदार गोधडीचा आज उसवलासे धागा सरली हयांत माझी आठवे रडत रडत देशील का देवा माझी आई परत…..? ©Shankar kamble #आई #आईवडील #हुंदका #मातृदिवस #मातृदिन #माँ #अनाथ
शुभम दि. कांबळे
जेव्हा आपण एखादं चांगलं किंवा वाईट काम करतो ना, तेव्हा कौतुक किंवा निंदा, फक्त आई वडिलांनी दिलेल्या, संस्कारांचीच होते... ©शुभम दि. कांबळे #आईवडील #देवमाझ
Pooja Bagal
मुलगा असो वा मुलगी, माझं एकच मत आहे . 4 दिवसाच्या प्रेमासाठी, 20 वर्षे काळजाच्या तुकड्यासारखे सांभाळ करणाऱ्या 40 वर्षांच्या आईवडीलांना कधी सोडू नका. ©Pooja Bagal #प्रेम #आईवडील #HeartBook
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited