Jayu

Jayu

काव्य वाचक...

  • Latest
  • Video

#Gulegulzar #jivan #life🔥🔥

10 Love
61 Views

""

"तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा"

तृ लाजतेस तेंव्हा फसण्यास अर्थ येतो तृ बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो

भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो

जेंव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो

मरणास झुंज देउन जन्मास घालते ती आई मुळेच अपुल्या 'असण्यास' अर्थ येतो

नारी तुझ्यामुळे हे अस्तित्व शून्य माझे आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो #अब्दुल लतीफ

माझ्या बेरंग आयुष्याला सौंदर्याचे विविध रंग देणाय्रा प्रत्येक महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

#महिला #कविता

9 Love

""

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य एकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी... आमुच्या मनामानात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी.... आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी, आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी... आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी, येथल्या दिशादिशात दाटते मराठी. येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या नगानगात गति मराठी... येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी... वेथल्या नभामधून वर्षत मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यामधून वाहते मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी... आपल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी... -सुरेश भट"

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य एकतो मराठी.
 धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी...

आमुच्या मनामानात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी....

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी, आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी...

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी, येथल्या दिशादिशात दाटते मराठी. येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या नगानगात गति मराठी... येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी... वेथल्या नभामधून वर्षत मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यामधून वाहते मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी... आपल्या घरात हाल सोसते मराठी,

हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...

-सुरेश भट

#मराठी_राजभाषा_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..
#मराठी #कविता #सुरेश_भट

6 Love

#कविता #म्हातारपन #poem

89 Love
10.2K Views
18 Share

#चारोळी

8 Love
313 Views