Nojoto: Largest Storytelling Platform

Best मृत्यू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मृत्यू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमृत्यू कविता मराठी, मृत्यू कविता, मृत्यू पर्यंत जीवन, मृत्यू समानार्थी शब्द मराठी, माता मृत्यू,

  • 15 Followers
  • 22 Stories

Jayu

Shankar Kamble

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो
आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो

दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी
लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो

जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला
माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो

पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा
पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो

विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा
पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो

डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले
खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो

चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती
चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो

पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी
धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो

©Shankar Kamble #Parchhai #गझल #मराठीप्रेम #मराठीविचार #मरण #चीता #भस्म #जीवन #मृत्यू

sanjay gavhane

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
फ़क़त मृत्यू हि है
जो आखिर तक़ साथ चलता है

©Dhananjay(dhanuj) Sankpal #मृत्यू

sandeep wagh

Alone  प्रत्येक क्षण आयुष्यातला निसटत आहे..
काल असलेला सोबतीला आज अचानक,
साथ या दुनियेची सोडत आहे..
कदाचित उद्या मी ही असेल नसेल..
भीती नाही वाटत मरण्याची पण..
जगण्याचा अर्थ कुठ कळत आहे..!
sandeep wagh #मृत्यू #Dosti #दुःख #जीवन 

#alone

Rajeshwari Ghume

रोज नव्याने दुखतं काही,
पण आता त्याचे दुःख नाही...
कळता मृत्यू समय,
दुःखासाठीही वेळ नाही..
- वीणा #मृत्यू #waitingfordeath

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile