Nojoto: Largest Storytelling Platform
yashvantkcarvi9560
  • 11Stories
  • 1.2KFollowers
  • 3.4KLove
    38.2KViews

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

🏰⃝⃚⃧⃡͢🇲a͛🅈υͫ ͓ℜ ⃪༎͢ 𝆺𝅥😍 फक्त मैत्री जिवलगाची

www.yashvantkc.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨

अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास,
गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास,
तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते,
गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते…

देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे,
अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे,
मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे,
विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे...

बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात,
माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात,
चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो,
सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो…

सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो,
संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो,
रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा,
मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा…

पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते,
स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते,
या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे,
कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे…

अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे,
प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे,
ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे,
अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे...

©मयुर लवटे #citylife #amravatikar #Life #Love #Poetry #maharashtra #marathi
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

Unsplash *ती...*

एक वेडी पोर ती,
नाहीये जवळ माझ्या आता,
दिवसा मागून दिवस जातो,
तिची वाट पाहता पाहता…

तिच्याशी न बोलता माझं
मन हे राहील का?
पण कधी कधी वाटतं,
जबरदस्ती करून तिला प्रेम होईल का?

आयुष्य एकदाच मिळत असतं,
म्हणून थोडा विचार केला,
आपलं प्रेम लादण्यापेक्षा,
तिचं तिचं जगू दे तिला…

आता मात्र शब्दही मी
बोलत नाही तिच्याशी,
कितीही काहीही झालं तरी,
रडतो एकटाच उशाशी…

तिला आठवत असेल का मी?
की मी फक्त एक क्षण होतो?
तिच्या स्वप्नांच्या गावीही नसेन कदाचित,
पण माझ्या स्वप्नांत तिचाच भास होतो…

चंद्राशी बोलतो रात्री मी,
तिचं नाव पुटपुटत असतो,
तो पण कधीतरी ढगाआड जातो,
पण मी मात्र तिथंच अडकून बसतो…

कदाचित तिचं सुख माझ्या प्रेमाहून मोठं असेल,
म्हणून देवासमोर मागणं सोडलंय तिला आता,
फक्त मनातल्या त्या कोपऱ्यात,
तिला हळूच अजूनही जपतो मी आता…

ती खुश असेल तिथं कुठेतरी,
आणि मी इथं तिच्या आठवणींमध्ये,
एक वेडं प्रेम, एक अपूर्ण कहाणी,
जगतो रोज, तिला आठवता आठवता…

कारण प्रेम हे असंच असतं,
यात तिला मिळवण्याचा हट्ट नाही,
तिला सुखी पाहण्यातच माझं जगणं आहे,
कारण तिच्या प्रेमाशिवाय माझं जगणं नाही…

©मयुर लवटे #library #Love #Life #Poetry

#library Love Life #Poetry

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *✨ कला शाखेतलं प्रेम...✨*

तिच्या डोळ्यांतला गहिरा इतिहास मला रोज भूतकाळात घेऊन जातो,
त्या नजरेच्या सामर्थ्यात पराक्रमी लढवैय्यांचं जीवन मला दाखवितो...
तिच्या हसण्यातलं पेशवाईचं वैभव आजही मनात दरवळतं,
आणि माझं प्रेम, त्या इतिहासा सारखं तिच्या प्रेमात अडकतं…

भूगोलाच्या वर्गात  जेव्हा ती सुंदर नकाशा काढायची,
माझ्या हृदयाचा केंद्रबिंदू नेहमी तिच्याभोवती फिरायचा,
तिच्या अस्तित्वाच्या अक्षवृत्तावर माझं मन कधी थांबायचं नाही,
पण तीच माझा सूर्योदय, आणि तिच्यातच माझा सूर्य मावळायचा…

समाजशास्त्राच्या तासाला ती नेहमी समाज बदलायचं स्वप्न पाहायची,
आणि मी मात्र तिच्या मनात फक्त एक छोटंसं घर माझं बघायचो,
तिचं तत्त्वज्ञान, तिच्या विचारांची जडणघडण मला कळायचं नाही,
माझ्या प्रेमाच्या संविधानात तिच्या होकाराची एकच कलम मी शोधायचो…

नागरिकशास्त्र शिकताना ती म्हणायची, "प्रत्येकाला हक्क मिळायलाच हवेत,"
माझा एकच हक्क होता, तिच्या हृदयातली जागा आपण मिळवायची,
आणि तिनं तो हक्क मला दिला, न बोलता, न मागता, न घाबरता,
प्रेमाच्या संविधानात तो न्याय लिहिला गेला, आणि ती झाली माझी कायमची…

मराठीच्या वर्गात ती ज्या ओळी मनापासून गुणगुणायची,
त्या शब्दांच्या सरीत चोरट्या नजरेने मी चिंब भिजायचो,
आणि इंग्रजीच्या कवितांमध्येही तिचंच रूप दिसायचं,
‘You are the reason my heart still beats’  मनात तिचं वाक्य घोळायचं…

कला शाखेतले सगळे विषय आता सहज सोपे वाटत आहे,
पण प्रेमाचं गणित अजूनही सुटलं नाही, बहुतेक तीच उत्तर, तीच प्रश्न आहे,
शाळेच्या त्या पुस्तकांत कितीही डोकं जरी मी खुपसलं,
आयुष्याचं एकच सत्य कळलं, माझ्या अभ्यासाचा विषय फक्त तीच आहे…

 कारण प्रेम म्हणजे सर्व विषयांचं एक एकत्रित पाठ्यपुस्तक आहे,
ज्यात *‘ती’* हे शीर्षक, आणि *‘मी’* त्याचा अभ्यासक आहे...

©मयुर लवटे #Sad_Status #Love #Life #arts #college #Life
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White ⚫ खरा व्हॅलेंटाईन – १४ फेब्रुवारी २०१९ ⚫

सगळीकडे पसरला होता लाल लाल रंग,
समदं जग साजरा करत होता व्हॅलेंटाईन,
इकडे मात्र लाल गळद रक्तानं,
शौर्याने पेटून उठलाय भारताचा सैनिकवाइन...

प्रेमाच्या गोड गोड वचनांना,
तो फुलांचा साज चढवत होता,
इथे मात्र रणभूमीवरती,
माझा वीर रक्त सांडवत होता...

कुणी प्रेमाच्या गोड शब्दांत,
आपलं प्रेम व्यक्त करत होता,
इथे मात्र या मातृभूमीसाठी,
सैनिक स्वतःचं जीवन अर्पण करत होता...

प्रियकर गुलाबाच्या नाजुक पाकळ्यांत,
त्याच्या प्रेयसीचं नाव कोरत होता,
इथे मात्र पेटत्या चितेवर पडून,
एक वीर तिरंग्याशी गोंजारत होता...

शत्रूने आत्मघाती धोका करून,
पाठीतून त्यांनी वार केला होता,
धरतीपुत्र वीरांनी मरण स्वीकारून,
देशासाठी आज बलिदान दिला होता...

स्वतःचं रक्त सांडवून या धरणी साठी,
त्यांनी त्यांच्या प्रेमाचा नजराणा दिला होता,
प्रेम म्हणजे त्याग, सन्मान आणि बलिदान,
असा व्हॅलेंटाईन त्यांनी साजरा केला होता...

सलाम त्या अमर शूरवीरांना
कारण त्यांनीच दाखवलं,
काय असतं खरं प्रेम,
काय असतं खरं बलिदान! 

🇮🇳 जय हिंद! 🇮🇳

©मयुर लवटे #Thinking #BlackDay #India #Poetry #Nojoto  poetry sad poetry

#Thinking #BlackDay #India #Poetry poetry sad poetry

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *⚔️ शिवजयंती — स्वराज्याचा सोहळा ⚔️*

फाल्गुन वद्य तृतीयेला उगवला एक तेजाचा दिवा,
शिवनेरीच्या मातीतून स्वराज्याचं स्वप्न जागं झालं देवा...

जिजाऊंच्या पदरातलं सोनं, या सह्याद्रीचा अभिमान,
जन्मला सिंहपुरुष घेऊन, हिंदवी स्वराज्याचा प्रण महान...

पालखीत नाही, ना गुलाब, कमळात नाही,
तर या मातीच्या सुगंधात जन्मला तो सिंह शाही...

त्याच्या पहिल्या रडण्यात रणसंग्रामाचा नाद होता,
त्याच्या पहिल्या पावलात स्वराज्याचा निनाद होता...

बालपणापासून तलवारीशी सख्य केलं ज्याने,
अन्यायाशी दोन हात करण्याचं बाळकडू प्यालं त्याने...

जिजाऊंच्या मंत्रात बळ, स्वयं भवानीचं त्याला वरदान होतं,
स्वराज्य घडवणाऱ्या मावळ्यांसाठी राजे जीव की प्राण होतं...

दुर्गदुर्गेश्वराला वाट पाहत होती ती अनमोल घडी,
सह्याद्रीच्या कड्यांत सिंहगर्जना ऐकायची होती खडी...

आणि त्या गर्जनेनं मुघलांचं काळीज थर थर कापलं होतं,
मराठी मनात स्वातंत्र्याचं वादळ उफाळून उठलं होतं...

शिवजयंती म्हणजे फक्त एक जन्मदिन नाही,
तो पराक्रमाचा सोहळा, आहे मराठी मनाचा शाही...

छत्रपती शिवाजी महाराज नावानं रक्त जणू सळसळतं,
“जय भवानी, जय शिवाजी!” आवाजात अखंड आभाळ हे गडगडतं...

शिवजयंती म्हणजे स्वराज्याचा आहे उज्ज्वल प्रकाश,
जो काळाच्या कप्प्यातही कधीच होणार नाही नाश!

©मयुर लवटे #life_quotes #ShivajiMaharajJayanti #marathi #Poetry #Life
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️*

सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली,
स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली...

जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल,
तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल...

मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला,
रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला...

दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी,
त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी...

वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा,
बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा...

मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते,
असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते...

शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून,
मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून...

तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल,
त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल...

त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा,
गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा...

⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे,
स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️

©मयुर लवटे #ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry #Life
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

Unsplash *रमाई – भीमरावांची आधारछाया...*

ती सावली होती, पण सूर्यापेक्षा तेजस्वी,
ती अबोल होती, पण त्यागाने कणखर होती…

भीमरावांच्या स्वप्नांना सत्याचं रूप देणारी,
ती रमाई होती, त्यागाची मूर्ती होती…

घराच्या चूलवीर शांत बसणारी रमाई,
पण मनानं तीही झुंजार, धीट आणि सहनशील होती...

दु:खाच्या वादळातही कधी ना डगमगणारी,
भीमरावांसाठी ती स्वतःला संपूर्ण विसरली होती…

दिवस एक एक जात होते संघर्षांच्या वाटेवर,
रमाई प्रत्येक पावलावर सावली सारखी धावणारी होती...

धन कमी, पण मोठ्या स्वप्नांची तिची श्रीमंती,
कारण तिच्या सोबत डॉ. बाबासाहेबांची जिद्द होती…

स्वतःच्या आयुष्याला तिनं कधीच विसरलं,
फक्त बाबासाहेबांचं मिशनच पूर्ण व्हावं तिची इच्छा होती...

रात्री-अपरात्री त्यांनी उपाशी राहू नये म्हणून जेवू घालणारी,
बाबासाहेबांच्या चिंतेत स्वतःला पूर्ण हरवलेली होती …

ती पतिव्रता होती, पण त्याहूनही अधिक,
ती समाजमाता हर एकासाठी दैवी कृपेक होती…

तिनं सोसलं, तिनं सहन केलं, इतर कुणीच तसं नव्हतं,
पण बाबासाहेबांना कधी मागं वळून पाहू द्यायचं नाही, अशी ती होती…

आजही बाबासाहेबांचा इतिहास जिथं जिथं बोलला जातो,
तिथं तिथं रमाईचा त्याग अन् प्रेम आठवलं जातं, माझी रमाई कशी होती…

ती होती भीमरावांची वटवृक्षासारखी आधारछाया, 
सत्य, समता आणि संघर्षाची मूक साक्षीदार, माझी रमाई होती…!

©मयुर लवटे #library #jaybhim #Love #Poetry #Life #BhimraoRamjiAmbedkar
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White देव्हाऱ्यातल्या दिव्याने देवाला
हळूच हाक दिली आणि विचारलं.
देवा माझ्या वाचून तुझ्या देव्हाऱ्यात
का अंधार असतो सर्वत्र ?
तु स्वतः एवढा तेजोमय आहे, तर तुला
माझ्या प्रकाशाची गरज का भासते ?
देव हसत हसत त्या दिव्याला म्हणाला,
माझा प्रकाश हे ब्रह्मांड प्रकाशमय करेल तर
तुझ्या प्रकाशाला सुद्धा किंमत असावी
म्हणून तु माझ्या देव्हाऱ्यात
उजेड पसरवतोय...

©मयुर लवटे #Ganesh_chaturthi  motivational thoughts in marathi #Life #Quote #Love #God #lord #GaneshChaturthi

#Ganesh_chaturthi motivational thoughts in marathi Life #Quote Love #God #lord #GaneshChaturthi #Motivational

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

* स्व-लग्न – स्वतःशी स्वतःचा विवाहबंध...* (Sologamy)

स्वतःशीच लग्न… ऐकायला खुप भारी वाटतं,
पण खरंच का ते सुखाचं गीत आयुष्यभर गातं?
ना हळदीचा रंग, ना मंगलाष्टकांचा गजर,
मनाच्या खोलवर फुटतो एकटेपणाचा जागर...

शपथ घेतली स्वतःशी, स्वतःला साथ देण्याची,
पण वळणावर गरज भासते एक जोडीदार होण्याची,
अश्रू पुसायला स्वतःचाच पदर पुरतो म्हणे कित्येकजण,
पण कधीतरी दुसऱ्याच्या मिठीत हरवायला भाग पाडतं एकटेपण...

स्वतःचं आयुष्य सुंदर असतं, हे नक्कीच खरं आहे,
पण शेवटच्या घासाला साथ नसली, तर गोडी उरत नाही,
हसण्याचे लाख क्षण स्वतःलाच स्वतः दिले तरी,
दु:ख वाटण्यासाठी माणूस लागतो, तेव्हा कुणीच मिळत नाही...

संध्याकाळी दमून, आशेने घरी परतल्यावर,
दारात वाट पाहणारं नसलं कुणी तर, घराची ओढ लागत नाही,
पांघरूण लाख रुपयांचे मखमली घेऊ शकलो तरी,
जोडीदाराच्या कुशीतले क्षण, कधी विकत घेऊ शकत नाही...

स्वतःशी लग्न म्हणजे स्वतंत्र आयुष्य वाटत असतं क्षणाला,
पण गहिऱ्या रात्रींची ती एकांत शांतता, सहज कळत नाही,
मनाच्या खोल गर्तेत, कुठेतरी प्रश्न पडतोच कधी तरी,
"एकटेपणाच्या सोहळ्याला उत्सव म्हणावं की मरण" तेव्हा कळत नाही...

उगाच स्वतःचं प्रेम, स्वतःची सोबत, अहंकार असतो मनाचा,
पण माणूस शेवटी माणसातच जिवंत असतो, त्याला एकटेपणा भावत नाही,
आपल्यासाठी कुणी झुरावं, कुणी हाक मारावी, याची तमा कधी नसते,
तरी हीच खरी जगण्याची चव असते, बाकी सगळं फसवं. हे माणसाला समजत नाही...

हे माणसाला समजत नाही...

©मयुर लवटे #Self #Love #Life #Heart #Nojoto #Poetry

#Self Love Life #Heart #Poetry

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *एक वॅलेनटाईन असा...*

तिचा तो गुलाब नको मला
तिचा होकार सुद्धा नको मला,
एकटाच सुखी आहे आयुष्यात.
तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला...

तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला
तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला,
स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच.
तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला...

तिचे आणा - भाका देणे नको मला
तिचे साथ देणे सुद्धा नको मला,
मी मलाच साथ देईन सदैव.
तिच्या ओठांचा स्पर्श नको मला...

तिच्या सोबतीची मिठी नको मला
तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला,
स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन.
तिची प्रेम स्वप्ने नको मला...

तिची आठवण परत नको मला
तिची मनात साठवण सुद्धा नको मला,
एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन.
तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला...

काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे
आर्वी वर्धा, महाराष्ट्र
मो. नं.:- 7028426669

©मयुर लवटे #Sad_Status  मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

#Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile