Find the Latest Status about चिमण्यांची शाळा मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिमण्यांची शाळा मराठी चित्रपट.
Priya Tambde
#2YearsOfNojoto कोणी आलं होतं रडत तर कोणी आलं हसत सगळेच आलो होतो शिकायला ...!! हीच ती शाळा जिथून सुरुवात केली आपण आपलं आयुष्य जगायला.........!!!! पहिली ते सातवी पर्यंत आहे आपली मराठी शाळा....!! लावलाय लळा तिने जशी माऊली लावते आपल्या बाळा. ......!!! मुलांचं न मुलींचं कधीच नाही एकमेकांशी पटलं....!! चिडवाचिडवी न भांडण ह्याशिवाय दुसरं कोणालाच नाही काही सुचलं........!! नाही कोणताही इथे भेदभाव न जातपात...!! आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी मिळते इथे गुरूंची साथ........!! Insta@priyatambde मराठी शाळेचे संपत चाललंय अस्तित्व याचीच वाटतेय मोठी खंत ..!! आता सतत भीती वाटतेय माझी मराठी शाळा होणार नाही ना बंद......!! प्रिया तांबडे माझी मराठी शाळा 😘😘
माझी मराठी शाळा 😘😘 #poem #2YearsOfNojoto
read moreSuyash Ananda Gulig
बघ जमलच कधी तर तयारीसाठी तुझा syllabus मला दाखवशील ? एकदा सांग तरी नक्की शाळा बंद असताना सुद्धा आयुष्या किती गोष्टी मला शिकवशील?-सुयश; ©Suyash Ananda Gulig #आयुष्या #शाळा #बंद #मराठी #विद्यार्थी #Hopeless
Ramdas Narwade
निरोप शाळेचा निरोप घेतांना वळून शेवटचे पाहतांना स्मृती दाटतात हृदयात उठतो प्रश्न एकच मनात का हे विसरतील आपल्याला की आपण विसरूत यांना गावची आणी अहमदपूरची ही शाळा राहील ही सदैव इतकाच जिव्हाळा कापसे हॉस्टेलचा हा मित्रांचा मेळा अतूट स्नेहनाती जाणवेल प्रत्येक वेळा लातूर पॅटर्नचा हा अभ्यास आणी शिस्त क्लासेस ची पळापळ गती अविरक्त सोडवण्या सीईटी चे प्रश्न अति किल्ष्ट वेळेचा आहे अभाव कॅर्रीयर चा आहे प्रभाव तरी प्रेमळ सर्वांचे स्वभाव जेव्हा पण आठवतील हे क्षण होईल अश्रूंचा घाव नियतीचा हा खेळ सारा प्रेम जिव्हाळा अन मोज पसारा जीवनातील पुढच्या वाटेवर यशाच्या उंबरठ्यावर गुरुजनांची असेल अमाप देणी शाळेच्या संस्काराची असेल शिदोरी नाद येइल शाळेच्या घंटीचा कानी अधुरी इथं राजाची कहाणी गाईल मन विरहाची गाणी पण लपणार नाही शाळेच्या या आठवणींचे डोळ्यातील पाणी ®रामदास नरवाडे पाटील Dedicated to my all school teachers and friends🙏🙏 #School #friends #teachers #शाळा #मराठी #kavita
Durga Deshmukh
सुमे चल माझ्या शाळेला जाऊ ज्ञानोपासक पाहुण येऊ शाळा माझं गाव ज्ञानोपासक त्याच नाव ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1 ज्ञानोपासक माझी शाळा ज्ञानान भरलेला मळा नका रिकाम्या हातान जाऊ 2 पहा विज्ञानाचे रंग मुल रसायनात दंग थोडा जीवाचा रंग घेऊ (3 विद्वान विद्वत्तेची खाण गुरुजनाची प्रतिमा महान चला ज्ञानाची गाणी गाऊ 4 चित्रकला, रांगोळी, ध्यान दंगामस्ती, अनापान कला सा-या जगाला दावु 5 शाळा गुणवत्तेचा सागर अंधश्रध्देवर फिरवी नांगर उघड्या डोळ्यानं विज्ञान पाहु(6) दुर्गा देशमुख, परभणी ©Durga Deshmukh शाळा
शाळा #मराठीकविता
read moresomnath gawade
शाळेत रस नसणारी टवाळमंडळी इतरांची 'शाळा'घ्यायला मात्र पटाईत असतात. 🤣😂 #शाळा
somnath gawade
आयुष्याची शाळा झाली आहे. शाळेत असताना आम्ही घरून 'होम वर्क' करायचो आता नोकरीत असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय. 😂🤣 #शाळा
Philoshayar
काळाच्या ओघात बरच पाणी गेलं पुलाखालून वाहून आणि जुने सगळे आठवले शाळेतल्या मित्रांना पाहून #शाळा
गोरक्ष अशोक उंबरकर
शाळेत बसून जेवणाचा आनंद आज मिळत नाही... आठवताना क्षण सारे घास घशाखाली गिळत नाही.. चपाती सोबत गुळाचा खडा किती भारी लागायचा.. भाजी नसते म्हणून गूळ डब्यात नेहमी आणायचा.. एकमेकांना सोबत घेऊन घोळका गोल करायचा.. चटणी भाकर वाटत वाटत एक एक घास मिळायचा.. उच्च नीच लहान मोठा भेद मुळीच नसायचा.. शाळेतल्या प्रत्येक दिवसात खरा आनंद असायचा.. शाळेतल्या प्रत्येक दिवसात खरा आनंद असायचा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर शाळा
शाळा #मराठीकविता
read more