Find the Latest Status about गर्दीत माणूस शोधतो मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्दीत माणूस शोधतो मी.
yogesh atmaram ambawale
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो, तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो. गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो, माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय, तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय. पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही
कवी दिपक सोनवणे
विचार शुद्ध आणि चांगले असतील ना , तेव्हा अनोळखी लोक सुद्धा आपले होऊन जातात !! शब्दांत तुला शोधतो मी
Vilas Bhoir
माझ्या मनाच्या किनारी एक नाव थांबलेली जिथे तिथे आठवांची गर्द वाट दाटलेली कसा करावा प्रवास भय मनात वावरे पुढे नसताना कुणी एकट्यात मी सावरे किती समजावे मीच मन नाजुक मौनाला आता जगण्याची वाट पुढे चालतो एकला नको नको रे दुरावा जपलेल्या या नात्यांचा मार्ग निवडला आहे मी माझ्या आयुष्याचा कितीही येवो संकटे सारे झेलुन मी घेईल जाता क्षणी पुढे पुढे वाट मोकळी होईल ~विलास भोईर ( अजूनही वाट शोधतो मी ) ©Vilas Bhoir ( अजूनही वाट शोधतो मी )
yogesh atmaram ambawale
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो, गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो, तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो. झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो, तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो. पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो, ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह
मंगेश मोहोड
भावानेच्या भरा सुरात कवितेच्या विलुप्त दारात शोधतो मी तुला दिस्-रात लपलीस तू कुठल्या अंधारात... -मंगेश आरश्यात दिसतेस तू तरी मी शोधतो शब्दांत...
अल्पेश सोलकर
वाचेन मी..वाचेल मी.. तरच इथे टिकेन मी.. स्पर्धात्मक, आव्हाने उपाय शोधतो शब्दाशब्दात मी... वाचेन मी..वाचेल मी.. तरच इथे टिकेन मी.. स्पर्धात्मक, आव्हाने उपाय शोधतो शब्दाशब्दात मी... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqtaaimarathi #reading #yq
Gaurav Pramod Deshpande
कलयुगातला कृष्ण शोधतो , भरकटलेला अर्जुन मी! नात्यांच्या बंधात गुंतलो , कर्तव्यला चुकलो मी! आयुष्य पटावर सर्व हारलो! शून्य झालेला युधिष्ठिर मी ! धर्म पथावर पुन्हा चालण्या, कलयूगातला कृष्ण शोधतो! कलयुगातला कृष्ण शोधते, अपमानित द्रोपदी मी! पुत्र मोहात बलिदानित! गमावून बसली अस्तित्व मी! कलयुगातला कृष्ण शोधतो, दुर्लक्षित कर्ण मी! जाती- पातीच्या मोहात अडकलो! अधिकारा पासून वंचित मी! # गौरव कृष्ण शोधतो..... #Krishna
Nagesh Ballal
कोणी आहे का...? ज्यांना माझ्या अश्रु ची किंमत कळेल.. आज माझे दिवस वाईट आहे.. पण उद्याला जगाला कळेल..!! ©Nagesh Ballal #GoldenHour #कलाकार माणूस #मी असा मजबूर का..?#true experience #love❤ #ExamsOfLife