Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्याचं त्याचं नंदनवन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्याचं त्याचं नंदनवन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याचं त्याचं नंदनवन.

Stories related to ज्याचं त्याचं नंदनवन

    LatestPopularVideo

somnath gawade

 तुझ्या भाळी कुंकू माझ्या
नावाचं तू लावशील का?
साथ आयुष्यभर देऊन आपल्या
घराचे नंदनवन करशील का?
 #नंदनवन

Dharmendra Gopatwar

#आयुष्य _जणू नंदनवन #IFPWriting #मराठीकविता

read more
📖 आयुष्य _ जणू नंदनवन . .✍️

_जगणे असावे असे
आयुष्याचे नंदनवन व्हावे ..
शब्दामध्ये माधुर्य दरवडावा
टिंगलटवाळी ने टाळ्यांचा कडकडाट न व्हावा
ऐसे भाषेने हितगुज व्हावे 
शब्द जाऊन हृदयात बसावे . .

संवादानचे नाते निर्माण व्हावे 
रक्ताच्या नात्यासही नवल वाटावे ,
बोलताना जिभेवर केसर यावा

रामाच्या विरहाने रावण व्याकूळ व्हावा . .
सुदामाच्या भेटीने रिपु ही कृष्ण व्हावे
ऐसे हृदय द्वार कवणासाठी बंद न व्हावे
संकट समयी जाऊन तयाला भेट द्यावे
हृदयांतर उणे व्हावे . .

गगनी उंची भिडताना
पावले जमिनीवर असल्याचा भान यावा
गुढगे खाली ठेकुन मुंगिस
साखर रवा तुपात भरून द्यावे ..

आयुष्याची चैन करून झाल्यावर 
थोडे मौन व्हावे 
विज्ञाननिष्ठ पुरुषाने 
कधी ईश्वराचे आभार मानावे . .

    जमिनी ला समुद्र भेटीने 
    अहंकार नष्ट व्हावे
    भगवान बुध्दाच्या भेटीने 
    मानवाचे अहंकार लयास जावे . .

    मानवता पुजताना ईश्वर प्रसन्न झालेले पाहून
    यज्ञ - यज्ञासहित पांडित्यानांसही कौतुक वाटावे
    खडे वेचताना चांदणेही कवेत येण्यास
    उत्सुक व्हावे . .

    मानवतेची ज्योत उजळूनी यावे
    त्यासमोर चंद्रप्रकाश फिके वाटावे ,
    ऐसे मानवतेला शरण जावे 
    मानवतेची मशाल उजळूनी
    सृष्टी प्रकाशमय व्हावे . .
    
    प्रत्येक हृदयी सत्याचा 
    दीप प्रज्वलित बघून ,
    कलिस ही कौतुहल व्हावे . .

 शब्दांप्रती मन मन जुळत जावे
 मोत्यांच्या माळेप्रमाने एकी यावे 
 हे सर्व बघून इंद्रदेव 
 स्वर्ग समवेत धरतीवर पलायन 
 करण्याचे स्वप्नात रंगावे . .

ऐसे संसार नंदनवनमय व्हावे . .✍️
                            कवी _ ध .वि .गोपतवार🔖

©Dharmendra Gopatwar #आयुष्य _जणू नंदनवन

#IFPWriting

__pranali__

त्याचं माझ नात असं असावं....

read more
त्याचं माझ नात असं असावं...

त्याचं माझ नात असं असावं...
सकाळच्या कोवळ्या उन्हात  जसं फूल उमलावं...
मी त्याच्याजवळ बसावं, 
हळूच गालातल्या गालात हसावं,
त्याने एकटक माझ्याकडं बघावं.
त्याचं माझ नात असं असावं...
त्याचं सारं सुखं मी ऐकावं,
माझं दुःखं त्याने आपसूकच जाणून घ्यावं.
हळूच त्याच्या कुशीत शिरावं,
आयुष्यभरासाठी  एकमेकांच सांत्वन करावं.
त्याचं माझ नात असं असावं...
                                      
                                     _प्रणाली_ त्याचं माझ नात असं असावं....

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता वेळ किती आणि कोणाला द्यावा हे ज्याचं त्याने ठरवावे #मराठीकविता

read more

pravin Barawkar

प्रेम आपोआप होतं पण,ते चुकीच्या माणसांबरोबर होतं त्याचं काय? #Shayari

read more

Abhishak Birari

❣️🔥good shayari. 🤙❣️ अन्नाची कींमत त्यांना विचारा ज्याचं लहानपण गरिबीत गेल कसेल??😟😑🙏🙏 #lovebeat

read more

Rashmi Hule

नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन.. #नंदनवन हा विषय PraDeep More यांचा आहे. चला तर मग मस् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
वृद्धाश्रम त्यांच्या साठी नंदनवन
कारण स्वताच्या कष्टाने उभारले
जे घर ते त्याच्यासाठी नरकासम
कुठे मुले दुर परदेशी एकटा वृद्ध
जीव काय काय सोशी
तर मुले सुना नोकरी व्यवसायात
संघर्ष त्यांचा स्वताच्या आयुष्याशी
तर कुठे सासरे सासु नको नकोशी 
अश्या वेळी वृद्धाश्रमाची तुलना
केली जाते स्वर्ग सुखाशी
समवयस्क लोक, समविचारांची
देवाणघेवाण होईल सुखदुःखाची
असेल सोबतीला कोणी, मित्र आणि मैत्रीणी 
वाटून घेतील गतकाळातील आठवणी 
खातील दोनच घास एकमेकाच्या सोबतीनी
म्हणूनच वाटे वृद्धांना राहतो आहे नंदनवनी
पण खरंच का हे वाटणे असेल मनापासूनी
तिथे राहून पण उणीव आप्तस्वकीयांची मनी
नेहमीच येते भरुनी अन अश्रुच असतात लोचनी 

  नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे
वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन..
#नंदनवन
हा विषय PraDeep More यांचा आहे.
चला तर मग मस्

Kunal Salve

काहीपण वाटणं हे प्रेम असतं आणि समोरचा जर काहीपण बोलला तर काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं #storyoflove #marathiquotes #BreakUp #Lines

read more
असाच हातात हात तिचा घेऊन
किनाऱ्यावर फिरतांना
किनाऱ्याची वाळू 
माझ्या पायाला चटके देत होती
सुर्य आग ओकत होता
जणू त्याला समुद्र गारठलेला दिसत होता
समुद्र एकदमच शांत.
पाणी असून तहानेने व्याकुळलेला,
लाटा मेलेल्या पाहून वाराही स्पर्श करू पाहत नव्हता.

मला हे सारं तेव्हा वाटलं जेव्हा तिने
ऐकना बोलून,
प्रेमात जर त्याग असेल आणि तो
मी माझ्या फॅमिलीसाठी केला तर 
कसं विसरणार रे मी एक कुणाल होता ?  काहीपण वाटणं हे प्रेम असतं
आणि समोरचा जर काहीपण बोलला तर 
काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं 

#storyoflove
#marathiquotes 
#breakup 
#lines

shraddha balkrushna khedkar

राधाकृष्णने प्रेम केले पण त्याचं प्रेम अधुरे राहिलें म्हणून काय कुष्णाने राधाला कधी हिणवले नाही आणि नाही कधी राधेच्या चारित्र्य वर डाग लागून #nojotophoto

read more
 राधाकृष्णने प्रेम केले पण त्याचं प्रेम अधुरे राहिलें म्हणून काय कुष्णाने राधाला कधी हिणवले नाही आणि नाही कधी राधेच्या चारित्र्य वर डाग लागून

Shashikant Kendre

#कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आण #वपु_विचार

read more
कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो.
~  वपु #कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile