Nojoto: Largest Storytelling Platform

New अनोळखी एक भयकथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनोळखी एक भयकथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनोळखी एक भयकथा.

    PopularLatestVideo

Babu Banarasi

बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो.
दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही.
तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं.
म्हातारी गेली, तर मग तेही बंद...
संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो.
रात्र झालेली, भरपूर पाऊस....
कलूआजीचं दार उघडं दिसलं...
कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला.
कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात.
चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते.

©Babu Banarasi #भयकथा

Babu Banarasi

कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता

©Babu Banarasi #भयकथा

Ruii music

अनोळखी

read more
अनोळखी आहेस तू
माझासाठी

pavan अनोळखी

Jugal Madwal

horrorstories alone भयकथा अश्वत्थामा Novel

read more
mute video

mukesh patil

अनोळखी नाती

read more
mute video

Sneha Gujrathi

अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण 
पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते.

- Sneha Gujrathi #अनोळखी  #वाटा

Sanket

# अनोळखी भेट

read more
कधी कशी झाली भेट

परकी जागा आपली वेळ

वक्ता श्रोता गुंतला एवढा

घडली जेव्हा अनोळखी भेट # अनोळखी भेट

Mohini

#अनोळखी वाट# #poem

read more
अनोळखी वाटेवर ओळखीची नजर,
ओळखीच्या नजरेत शब्द मात्र अबोल....
अबोल शब्दांचे सुंदर अर्थ नजरेला कळू लागले,
अन् त्या अर्थातच तुझे प्रेम उमलून आले....
लांबचा रस्ता सुद्धा खूप जवळ वाटू लागला,
जेव्हा हाती माझ्या हात तुझा आला.....😍 #अनोळखी वाट#

Avinash Lad

अनोळखी #Hopeless

read more
अनोळखी...
==================
सुखदुःखाच्या खेळामध्ये
जगता जगता मरून गेलो,
आनंदाच्या खेळामध्ये
डाव मांडताना हरून गेलो...

क्षणभर दिखाव्याचे सारे
निजल्यावर अश्रू गाळती,
दुःखात सुख समजती
सोयऱ्यांच्या बसून पंगती...

प्रकटलो जेंव्हा अनोळखी 
साऱ्या नात्याला बिलगलो,
श्वास घेऊनिया पदोपदी 
सुखाच्या शोधात जगलो...

खेळलो,पडलो, रडलोही
घेतांना गोंजारून वेदनेला,
कळले जेंव्हा मलाच सारे
मी गंध लावला काळजाला...

घेऊनिया ओझं शरीराचं
चाललो दुनिया एकट्याने,
भावनांच्या त्या वावटळी
समजून घेतल्या स्पर्शाने...

कोणीही नव्हतं जवळी
क्षणभंगुर खेळ मांडल्यावर,
कौतुकाची थाप मारुती
सरणावर मी निजल्यावर...

नकोय मजला दिखावा
कोरड्या अश्रूंच्या थेंबांचा,
मी गेल्यावर उरेले मागे
पुरावा माझ्याच शब्दांचा...
=================
विठूपुत्र:अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad अनोळखी

#Hopeless

Vin's Bansode

#अनोळखी वाट

read more
अनोळखी वाटेवर स्तब्ध माझे बोल झाले

बेकारणाचे वाद झाले

अबोल राहून ही तुझा सवांद झाले

मुक्याशब्दांना तू पुन्हाबोलके केले

 नजरेच्या नजरेत कवितेत यमक मी जोळले. #अनोळखी वाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile