Find the Latest Status about सासरी लेक चालली सासरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सासरी लेक चालली सासरी.
Shankar kamble
ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां मायेची भेगां मनांत दाटल्या।१। घालमेल उंबऱ्याची जीव झाला कासावीस सोसवेना होरपळ डोळां चातकाची आस।२। शीळ पाखरांची कानी श्रावणातला हिंदोळा घुटमळ पानोपानी गंध दरवळ वेल्हाळा।३। सये तुटलं माहेर लेकपणाला पारखी माझं फाटलं आभाळ ऊन-सावली सारखी।४। कसा आवरू हुंदका किती निरपावं पाणी कोंब खुडता उमाळा भळभळ दाटे मनी।५। नको कोरडा दिखावा वरवरचं बोलणं अंग पोळलं उन्हांत आता कुठलं शिंपण?।६। ©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण #Childhood
Archana Deshpande-Pol
लेक लाडकी गं माझी.. आज निघाली सासूरा.. दारी थांबते पाऊल, उरी हुंदका गहिरा. काळजाचा तुकडा तो, कसा जपला लाडात, माप ओलांडून आज, जाई परक्या घरात.. माय बापाचं कौतुक, डोळाकाठात सांडलं. भरलेल्या काळजानं प्रेम मिठीत कोंडलं.. लेक मायेचं अंगण.. गंध सासरी सांडतो. ठेच लागता लेकीला, बाप मनात रडतो. लेक असावी मायेची, तीच्यासाठी मोहरावे.. तीच्या हसण्याने पुन्हा, माझे अंगण फुलावे.. ©अर्चू.. #लेक
Shubhada
सूर जुळतात गाठी बांधल्या जातात मंडप हसत असतो काहीतरी मात्र धुमसत असतं आतल्या आत विस्कटत असतं चुडा किंचित थरथरत असतो क्षणांच हळवं शहाणपण जपतो जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी नात्याची खूणगाठ हिच असावी किती काही चालावं आतल्या आत जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट नकळत पाणावणारी डोळ्यांची पात शुभदा सासरी जाताना
Dr Mangesh Kankonkar
दारासमोर अंगणा मध्ये सुबक रांगोळी दिसावी प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी मुलगी असावी मुलगी म्हणजे घरासाठी जीव की प्राण तिला पाहून हरपून जातं सारं देहभान मुलगी घरात असली म्हणजे घर कसं फुलून जातं तिचं असणं घरासाठी चंदनाच लेप होतं मुलगी करते चिवचिवाट म्हणून घर फुलून येतं असो अथवा नसो काही मन कसं भरून जातं आई बाबांच्या म्हातारपणी मुलगीच त्यांची आई घर कितीही मोठं आसो मुली शिवाय श्रीमंती नाही मुलीसाठी देवासमोर हात जोडून बसलं पाहिजे प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीच रोप असलं पाहिजे माझी लेक
somnath gawade
सावित्रीची लेक तु सावित्रीची लेक तु, अभाळात मुक्त भरारी घे. स्त्री शक्तीची चुणूक दाखवून अवघं विश्व मुठीत घे. अडथळे कितीही आले तरी, माघार घेऊ नकोस. आपल्याला जिंकायचं आहे, हे कधी विसरू नकोस. प्रवास खडतर असणार, याची जाणीव ठेव. यशाला गवसणी घालायची, यासाठी रोजचा सराव सुरू ठेव. अपयश आले तरी खचू नकोस, पुन्हा बळ एकवटून तयार हो. थोडी उसंत घेऊन, यशाची भरारी घेण्यास सज्ज हो. टोमणे-टचके चालू राहतील तु रीतसर कानाडोळा कर. सावित्रीची लेक तू यशाचा एव्हरेस्ट सर कर. स्त्री, पुरुष समानतेचा जागर सर्वत्र घुमतोय. तुझं अस्तित्व सिद्ध करण्या तो तुला खुणावतोय. #सावित्रीची लेक तु