Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधू मी कुठे काशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधू मी कुठे काशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधू मी कुठे काशी.

    PopularLatestVideo

Avinash Lad

शोधू कुठे मी #ShiningInDark #शोधू_कुठे_मी

read more
#शोधू_कुठे_मी
=======================
गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी?
सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी?

प्रिय होती सखी,सोडून मजला गेली
जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी?

सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले
स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी?

शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली
खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी?

बाहुपाशात निजता, भाळलो देहावर
हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी?

उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो
श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी?
=======================
विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad शोधू कुठे मी

#ShiningInDark

Rasika Chalke

कुठे शोधू मी तुला #ganesha

read more
स्मृतिगंध कविता संग्रह 

कुठे शोधू मी तुला 

कुठे शोधू मी तुला असे तीने मला विचारले 
सांगितले मी तिला बघ तुझ्या जवळच आहे मी
 ती म्हणते मला जवळच आहेस 
मग मला का नाही दिसत 
तेव्हा सांगितले तीला 
अग वेडे डोळे उघडे ठेवशील तर दिसेन का मी तुला
 डोळे बंद करून बघ 
तिथेच दिसेन मी तुझ्या अवती भोवती 
एकाग्र मन कर नी पहा मला 
निसर्गाच्या सानिध्यात, पाना, फुलात 
उंचावरून पडणाऱ्या धबधब्यात 
पक्षांच्या मंजुळ आवाजात 
खळखळ वाहणाऱ्या वाहत्या पाण्याच्या झर्यात 
बघ तिथेच दिसेन मी तुला मी 
शरीराच्या रोमारोमात आहे मी
ओठावरच्या हास्यात आहे मी
 हातांच्या स्पर्शात आहे मी
 डोळ्यात साठवलेल्या प्रतिमेत आहे 
चराचरात बघ मला तिथेच आहे मी 
तुझ्या अवती भोवती शोध मला 
नजरेच्या समोर आहे मी 

            सौ. रसिका चाळके कुठे शोधू मी तुला 

#ganesha

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधू कुठे मी,कुठे सापडतील ते शब्द मला,
उतरवता काव्यात,जे भावतील प्रत्येक मनाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात???
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे
आताचा विषय आहे
शोधू कुठे मी...
#शोधूकुठेमी

चला तर मग लिहूया

Sandeep Kalambe

लपूनही असा कुठे लपेन मी

read more
mute video

Swapnतरंग

मी कुठे म्हणालो परी मिळावी #poem

read more
mute video

Abhishek Gaikwad

मी कुठे म्हणालो परी मिळावी #MyPoetry

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधू कुठे मी,असा सापडेल का कुणी मला,
भूतलावरी आहे का कुणी असा,चिंता सतावत नसेल ज्याला.
लोभ नसेल मनी ज्याच्या,नसेल मनी कसली हाव,
शोधू कुठे मी,असेल कुणी असा तर देवा तूच मला दाव.
सुख असते अनंत जीवनी,तरी त्यास कमी वाटत असते
स्वतःचे सुख दिसत नसता,इतरत्र सर्वत्र सुख दिसत असते,
शोधू कुठे मी,आहे का कुणी असा वागणारा,
स्वतःचे दुःख विसरून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात???
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे
आताचा विषय आहे
शोधू कुठे मी...
#शोधूकुठेमी

चला तर मग लिहूया

जयदीप शरद जोशी

मराठी गझल कुठे मी घेतली माघार आधी #Shayari

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

read more
mute video

Sulabh Bagde

सखे ग साजणी माझी ग तु प्रिये शोधू मि तुला कुठे... जीव माझा तुझा विना लागे ना ग इथे... सखे ग साजणी... माझी प्रिये... शोधू मि तुला इथे कुठे. #poem #गीत #Searching #मराठी #Loveone #मनातील_भावना #सुलभ

read more
सखे ग साजणी 
माझी ग तु प्रिये
शोधू मि तुला कुठे...
जीव माझा तुझा विना 
लागे ना ग इथे...
सखे ग साजणी... माझी प्रिये...
शोधू मि तुला इथे कुठे.. सखे ग साजणी 
माझी ग तु प्रिये
शोधू मि तुला कुठे...
जीव माझा तुझा विना 
लागे ना ग इथे...
सखे ग साजणी... माझी प्रिये...
शोधू मि तुला इथे कुठे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile