Nojoto: Largest Storytelling Platform

New जानेवारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जानेवारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जानेवारी.

    LatestPopularVideo

Mahesh Lokhande

सव्वीस जानेवारी #poem

read more
सव्वीस जानेवारी

सव्वीस जानेवारी 
हा मंगलदिन हो भारी॥धृ॥

तिरंगी ध्वजाला सलाम करण्या
जमली दुनिया सारी॥1॥

सडा टाकूनी रांगोळी सुंदर
काढली दारोदारी॥2॥

सकाळी सकाळी अंघोळ करूनी
नटली पोरंपोरी॥3॥

स्वच्छ कपडे घालुनी घोषणा देऊनी
काढली प्रभातफेरी॥4॥

राष्ट्रगीत गाऊनी ध्वजगीत गाऊनी
ध्वजा सलाम करती सारी॥5॥

भाषण ऐकून खाऊ खाऊन
होऊ संविधानाचे पुजारी॥6॥

कवी=महेश लोखंडे सव्वीस जानेवारी

AnishaDodke

3 जानेवारी #Stars #मराठीकविता

read more
शीर्षक:माता सावित्री

क्रांती जोती सावित्री तू आम्हा 
मुलींची आई झालीस.!
महात्मा फुलेंना साथ देणारी
अख्या जगाची माऊली झालीस.!
समाजासाठी कसली बाळगलीस
कसली तमा 
या विषम रुढीत जोतिबांची
जोत उजळलीस...!
खरं सांगू सावित्री माता 
तुला जोतिबा पेक्षा ही
जास्त बलिदान द्यावं लागेल!
समाजासाठी तुला मान
सन्मान ही गमवावा लागला..!
संगर्षं नायकाची खरी नायिका
तूच आहेस
आणि क्रांती सूर्य महात्मा जोतिबा
फुलेंनी क्रांती जोती सावित्रीबाई तूच आहेस...!
समाजासाठी शेण गोटे चिखल अंगावर झेलणारी माय माऊली
तू आहेस 
रांडा ,वाडा, उष्टी, काडा हे सूत्र 
बाजूला सारून
शिक्षणाच महत्व पटवून देणारी
आमची माय माऊली
खरं सांगते 
तुझ्या या त्यागाला मी
कोणत्याच शब्दात मांडू
शकत नाही...!
आमच्या कातड्याचे जोडे 
तुझ्या पायात रुजवलेन
तरी देखील तुझे पांग फाटणार नाही....!

कवयित्री; कु अनिषा दिलीप दोडके8080175160
नांदेड

©AnishaDodke 3 जानेवारी
#Stars

Vijaykumar Khune

*🇮🇳 26 जानेवारी 🇮🇳* *🇮🇳 प्रजासत्ताक दिन 🇮🇳* 🏆 VIJUDADA 🏆 #RepublicDay #Society

read more

Ravendra Kumar

divine angle narendra bhakuni Bhardwaj Only Budana Avin Dsouza Alexander Francis रोहीत वेमुला अमर रहे... 17 जानेवारी 2016 #Sports

read more

Omkar Ranveerkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #writingresolution #365days365quotes #भटकंती #आजचायुवा

read more
भटकंती करतोय. आयुष्याचा उद्देश शोधतोय. अर्थार्जन करताना प्रेम, करुणा यांच्याशी संबंध  जोडतोय. ताणतणावाशी झुंजताना जसा झिजतोय तसा तो रमतोय देखील. या जीवनपटावर शिकतोय तसा स्वतःला स्मरतोय.  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस

Jai Bhim

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने तयार केलेले संविधान ( 26 नोव्हेंबर 1949 )स #समाज

read more

S

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वतंत्र0

read more
Mantat ki to swatantra ahe 
Pn swatantrata nhi tila 
Ti uncha bharari bhrel 
Mnun tiche pnkha kapun detat
Dakhvlya jato tila sundar asa akash 
Pn bhiti chya pinjryat bnd krun dilya jate 
Goshti tr khup krtat swatantrata and brobarichi 
Pn mariyada cha arsa pn tilas ka dakhvla jato ???? लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच

Sujata Darekar

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #YourQuoteAndMine #स्वतंत्र #ती #स्वतंत्र0

read more
स्वातंत्र मिळानं ना सगळ्यांनाच
मग हा प्रश्न का येतो आहे वारंवार? 
ते ही तिच्याच बाबतीत?
माणसं सगळी सारखीच ना आपण
या भूतलावरचा प्राणी म्हणून
तरीही हा प्रश्न ठासून ठासून का?
याचाच अर्थ ती अजुनही 
परिपूर्ण स्वतंत्र नाहीच
एव्हाना ती स्वतंत्र नाहीच मुळी
पण का? स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही?
कशाचं बंधन आहे तिला?
रूढींचं, परंपरेचं, रितीभातीचं 
कि आणखी कशाचं?
अह... हे साफ चुकतंय
बंधन आहे ते मानसिक गुलामीचं
विरोधात बंड पुकारण्याचं
आणि सगळ्यात मोठं बंधन
तिच्या बाईपणाच्या लाघवीपणाचं
म्हणूनच भरतेय ना ती हातात बांगड्या
गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे
भांगेत सिंदूर वगैरे....वगैरे
कुठल्याही बेड्या चालतात तिला
संस्कृतीच्या, रिवाजाच्या नावाखाली
तिचं अस्तित्व हे परिघच
तिला कसोशी अजरामर बाईपणाची
तिचं सामर्थ्य, धैर्य, शीलता आणि
पराकोटीची सहनशीलता
याचा खूप मोठा गाजावाजा हवाय तिला
संस्कृतीच्या ठेकेदारांनी पश्चात काही
बोलायला नको 
तिची सोज्वळ मूर्ती डागाळायला नको
स्त्रीची हीच अमर कहानी लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच

vaishali

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वतंत्र0

read more
जन्मा आधीच गर्भात मारली जाते ती
जन्मा नंतर मुलगी म्हणून हिनवली जाते ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

फुल होण्याआधीच कुस्करली जाते ती
बलात्कारानंतर ही निर्दयी मारली जाते ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

माहेरी परक्याचे धन समजली जाते ती
हुंड्यासाठी सासरच्या घरात  छळली जाते ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

प्रत्येक वेळी आपल्या स्वप्नांचा बळी देते ती
इतरांच्या सुखाससाठी स्व सुखाचा त्याग करते ती 
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

सगळ्यांसाठी चंदनापरी कायम झीजते ती
अजूनही स्वतःच अस्तित्व शोधत आहे ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ? लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile