Find the Latest Status about दोनच राजे इथे गाजले कोकण भूमीवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोनच राजे इथे गाजले कोकण भूमीवर.
Avinash Lad
स्पर्श मातीचा... ---------------------------- माझ्या हसोळ गावात वाहे पाणी झुळझुळ चव अवीट लागते पाट बोले खळखळ वनराई रुबाबात दरी खोऱ्याच्या संगती फुलवेली चहूकडे तनमन हासवती घर कौलारू बाबांचं तेथे शोभे आजीबाई घर सारवी जोशात माझी मालकीण आई शेणा मुताच्या वासाने ओढ लागते गावाची गोट्यामध्ये गाई म्हशी साद घालती सुखाची गंध कपाळी लावूनी स्पर्श मातीचा करतो माळरानं हिंडताना थवा पक्षांचा पाहतो चिऊताई, मैनाबाई सूर आनंदी लावती सांज अंगणी दिसता घरा परतून जाती चहूकडे हिरवळ स्वर्ग सुखाचे कोकण झाडवेली फुलवेली करी आनंदित मन अभिमान वाटे मज जन्म झाला कोकणात ओढ मनात रुजली गावं दिसता डोळ्यात __________________ श्री.अविनाश लाड, राजापूर-हसोळ ©Avinash Lad स्वर्ग सुखाचे कोकण...
Durva Swapnil Tawade
माझं कोकण कोकण म्हणजे सागर निळाई पाचूच्या रानातील गर्द वनराई शहाळ्याचं गोड गोड पाणी भजनांची सुमधुर गाणी नारळी पोफळीची वेगळीच शान ताडा माडांचा मोठा मान अबोली, चाफा, जास्वंदी फुलांची दाटी सारे मिळून सजवू देवघरातील माटी फणस, आंबे, काजू, जांभळी साजिऱ्या कोकणाची रूपं ती आगळी शुभ्र वाळूतील पाऊलखुणा आपल्या चांदण चुऱ्यातील शंख नी शिंपल्या इथला निसर्ग घेतो मनाचा ठावं स्वर्गाहून सुंदर माझं कोकणचं गाव.. सौ. दुर्वा स्वप्निल तावडे ©Durva Swapnil Tawade # माझं कोकण ❤️
आशिष गंगाधरजी चोले
एक दिवस सुंदर अशी पहाट उगवली भल्या पहाटेच शिवनेरी ची तोफ गरजली वाऱ्याची झुळूक ही सह्याद्रिच्या कुशीत डोलावली गुलामीत स्वातंत्र्याची चाहूल पहाट घेऊन आली जिजाऊ पोटी शिवा जन्मला सांगत मुके पाखरेही किलबलली राजमाता जिजाऊ चा इवलासा अंश होता तो सिंहाचा छावा ज्यांनी शिकवले मावळ्यांना गनिमी कावा पुरून उरले मर्द मराठे असंख्य मुघलांना जेव्हा उफाळला मावळ्यांच्या रक्तातील लाव्हा मस्तकी जिरेटोप न हाती भवानी तलवार फडकविला भगवा झेंडा छातीवर शोषुन वार जिकून घेतले असाध्य असे दुर्ग अफाट सागरालाही केले बंदिस्त राजेंनी बांधून किल्ले सिंधुदुर्ग परस्त्री असते माते समान या विचाराने शत्रूराज्यांच्या स्त्रियांसही दर्जा स्वतःच्या आई-बहिणींचा देई जगातील एकमेव माझे राजे असे ज्यांच्या दरबारात नाचली नाही कधीच नर्तकी बाई पराक्रमी शिवाजी महाराष्ट्री अवतरला मूठभर मावळे घेऊन शत्रूंच्या तोफांसमोर तलवार घेऊनि एकटाच उभा ठाकला ना भूतो ना भविष्य एक राजा साऱ्या जगाचा छत्रपती शिवाजी महाराज जाहला ज्याला माज होता दिल्लीच्या तख्ताचा तोच पळाला जिवाच्या आकांताने पाहून वाघ भगव्या रक्ताचा अभिमान आम्हांस आमच्या राजेंचा रक्षणास ठायी राही सदा रयतेच्या रक्षणास ठायी राही सदा रयतेच्या लेखन:- आशिष गंगाधरजी चोले. राजे